मुलाखत या शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द आहे इंटरव्ह्य़ू. इंटरव्ह्य़ू या शब्दाची व्युत्पत्ती Entervoir या फ्रेंच शब्दापासून झाली आहे. याचा शब्दश: इंग्रजी अर्थ होतो Glimpse. Glimpse चा मराठीतील अर्थ म्हणजे ओझरते दर्शन, एक झलक!
मुलाखती अनेक प्रकारच्या असतात, आपण या लेखात स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित मुलाखत प्रकाराविषयी जाणून घेऊयात.
उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे पलू लेखी परीक्षेच्या माध्यमातून तपासले जाऊ शकत नाहीत ते पलू तपासण्याच्या हेतूने मुलाखत घेतली जाते. स्पर्धात्मक मुलाखतीद्वारे उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन केले जाते. या क्षमतांचे आकलन वस्तुनिष्ठ किंवा लेखी परीक्षेच्या माध्यमातून शक्य होत नाही. म्हणूनच पूर्व आणि मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीचे आयोजन आयोगामार्फत केले जाते. मुलाखत म्हणजे उमेदवारांसाठी परीक्षांच्या टप्प्यांपकी शेवटची आणि यशस्वी भविष्याची पहिली पायरी असते. स्पर्धात्मक परीक्षांच्या प्रक्रियेत मुलाखतीचे म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व आहे. उमेदवाराची योग्यता, पात्रता तपासण्याची मुलाखत ही अशी प्रक्रिया आहे, ज्यातून प्रत्येक यशस्वी उमेदवाराला प्रवास करावाच लागतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा, अभियांत्रिकी सेवा, आíथक / सांख्यिकी सेवा / विशेष श्रेणी रेल्वे प्रशिक्षणार्थी (अॅप्रेन्टिसशिप), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि संयुक्त सुरक्षा दल यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. याशिवाय आयोगाकडून केंद्र शासन आणि केंद्रशासित प्रदेशांतील काही विशेष पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट सेवा भरतीचेसुद्धा आयोजन केले जाते.
उमेदवाराच्या कारकीर्दीचा सर्व तपशील तपासून मुलाखत मंडळाकडून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. सक्षम तसेच निष्पक्ष निरीक्षकांचा समावेश असलेल्या या मंडळाकडून उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व प्रशासकीय सेवा क्षेत्रामध्ये काम करण्यायोग्य आहे की नाही हे मुलाखतीद्वारे पाहिले जाते. उमेदवाराचा बौद्धिक कस व सर्वसाधारण महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबतची सजगता येथे तपासली जाते.
एकूणच मुलाखत ही उमेदवाराच्या केवळ बौद्धिक गुणवत्तेचीच नव्हे तर त्याच्या सामाजिक जाणिवा आणि प्रचलित घडामोडींमधील त्याच्या स्वारस्याची चाचणी ठरते. मुलाखतीचे तंत्र उलट तपासणीचे नसते. उमेदवाराचा बौद्धिक व भावनिक कस तपासण्यासाठी नसíगक आणि थेट अशा सहेतूक संवादाच्या स्वरूपात मुलाखत पार पडते.
मुलाखतीच्या दोन महत्त्वाच्या बाजू आहेत- भाषिक (Verbal) आणि अभाषिक (Non-Verbal). मुलाखतीद्वारे अभिव्यक्त होण्यात या दोन्ही बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. उमेदवाराचे सादरीकरणसारखी बाब अभाषिक पलूंमध्ये येते. उमेदवाराचा पेहराव, चेहऱ्याचे हावभाव, देहबोली, त्याची उठण्या-बसण्याची पद्धत, वाक्चातुर्य, आत्मविश्वास, मानसिक सतर्कता, मानसिक दृढता, निर्णयक्षमता या बाबी तपासल्या जातात. यासाठी मनोवैज्ञानिकांची व्यवस्था करण्यात येते. भाषिक पलूमध्ये प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उमेदवाराची ‘मुलाखत परीक्षा’ घेतली जाते. याविषयी पुढील लेखात विस्ताराने चर्चा करूयात.
बहुतांश वेळा लेखी परीक्षेत चांगले गुण असणारे उमेदवारसुद्धा मुलाखतीदरम्यान तणावात असतात. सर्वप्रथम उमेदवारांनी समजून घ्यायला हवे की मुलाखत ही कुठली भीतीदायक प्रक्रिया नाही. मुलाखत घेणाऱ्यांमध्ये आणि मुलाखत देणाऱ्यांमध्ये फरक इतकाच की, मुलाखत घेणारे आपापल्या विषयांतले तज्ज्ञ आणि अनुभवसंपन्न असतात. म्हणूनच मुलाखतीला केवळ सामान्य परीक्षाप्रक्रियेचा भाग मानावा आणि मुलाखतीचा अवाजवी तणाव न घेता त्याची उत्साहाने तयारी करावी.
मुलाखत पॅनल किंवा मंडळाच्या माध्यमातून उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. मुलाखतीच्या पॅनलचा अध्यक्ष असतो आणि पॅनल सदस्यांची संख्या चार ते सहा असते. मुलाखतीद्वारे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सदस्यांसमोर आपली योग्यता, श्रेष्ठता आणि प्रतिमा सिद्ध करण्याची एक सुवर्णसंधी उमेदवाराला उपलब्ध असते. अनेक उमेदवारांसाठी आयुष्याचा ‘टìनग पॉइंट’ ठरणारी मुलाखत, अनेक उमेदवारांच्या मर्यादा उघड करणारी ‘परीक्षा’सुद्धा ठरू शकते. मुलाखतीच्या तयारीशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांबाबत पुढील काही लेखांत चर्चा करूयात.
मुलाखतीद्वारे उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वातील पुढील बाबी जाणून घेतल्या जातात-
* ज्ञानाचा स्तर
* बौद्धिक सतर्कता
* सुसंगत विचार करण्याची क्षमता
* भूमिका व युक्तिवादातील सुस्पष्टता
* तर्कसंगत विचार
* समतोल निर्णय निश्चिती
* बौद्धिक व नतिक प्रामाणिकपणा
* रूची, अभिरूची
* राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रचलित घडामोडींची जाण
* व्यक्तिगत परिचय आणि पदासाठीची प्रशासनिक योग्यता
मुलाखत-भाषिक आणि भाषेपलीकडची..
मुलाखत या शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द आहे इंटरव्ह्य़ू. इंटरव्ह्य़ू या शब्दाची व्युत्पत्ती Entervoir या फ्रेंच शब्दापासून झाली आहे. याचा शब्दश: इंग्रजी अर्थ होतो Glimpse. Glimpse चा मराठीतील अर्थ म्हणजे ओझरते दर्शन, एक झलक!
Written by चैताली गुरवguravchaitali
आणखी वाचा
First published on: 21-09-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview linguistic and beyond the language