इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने असिस्टेंट क्वालिटी कंट्रोल अधिकारी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट iocl.com वर २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रक्रियेद्वारे असिस्टेंट क्वालिटी कंट्रोल अधिकारी यांच्या एकूण ७१ पदांची भरती केली जाईल. ज्यात अनारक्षित श्रेणीची २८ पदे, एससी श्रेणीची १० पदे, एसटी श्रेणीची ७ पदे, ओबीसी श्रेणीची १९ पदे, ईडब्ल्यूएस श्रेणीची ७ पदे आणि पीडब्ल्यूबीडी श्रेणीची ६ पदे समाविष्ट आहेत. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४०,००० ते १,४०,००० रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

(हे ही वाचा: Railway Recruitment 2021: नोकरीची सुवर्ण संधी; १६०० पेक्षा जास्त रिक्त पदे )

अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र किंवा समकक्ष विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२१ रोजी उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वरच्या वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

( हे ही वाचा: विप्रोमध्ये मेगाभरती; आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १७,००० फ्रेशर्सला मिळणार नोकरीची संधी )

निवड प्रक्रियेबद्दल बोलताना, उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, गट चर्चा/ गट कार्य आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा ७ नोहेंबर २०२१ रोजी होण्याची शक्यता आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अधिकृत वेबसाइट iocl.com वर या पदांवर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

( हे ही वाचा: Pune Jobs: भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची संधी; जाणून घ्या तपशील)

याशिवाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या पाइपलाइन विभागाने अलीकडेच अॅप्रेंटिस कायदा १९६१ अंतर्गत तांत्रिक आणि गैर-तांत्रिक व्यापारातील अप्रेन्टिसच्या विविध पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर IOCL अपरेंटिस भरती २०२१ साठी अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइट तपासा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iocl recruitment 2021 for a total of 71 posts salary up to rs 140000 ttg