IOCL Western Region Recruitment 2022: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पश्चिम क्षेत्र मार्केटिंग विभागात टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल शिकाऊ (अप्रेंटिस) उमेवारांच्या ५७० पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवार १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवड प्रक्रिया

iocl.com वर जाऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. १०० गुणांची लेखी परीक्षेसह कागदपत्र पडताळणीनंतर एकूण ५७० उमेदवारांची निवड केली जाईल. इंडियन ऑइल द्वारे २१ मार्च २०२२ रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल.

पात्रता काय?

ट्रेड अप्रेंटिस- NCVT/SCVT द्वारे नोंदणीकृत ITI पदवी.

तंत्रज्ञ शिकाऊ – नोंदणीकृत विद्यापीठ आणि संस्थेतून ५०% गुणांसह ३ वर्षांचा डिप्लोमा SC/ST उमेदवारांसाठी ४५% प्रमाणपत्र वैध असेल

ट्रेड अप्रेंटिस अकाउंटंट – ५०% गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी. राखीव श्रेणीतील उमेदवार ४५% दराने अर्ज करू शकतात.

ट्रेड अप्रेंटिस – डेटा एंट्री ऑपरेटर ज्याकडे डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरचे कौशल्य प्रमाणपत्र आणि १२ वी पास आहे. ते उमेदवार अर्ज करू शकतात.

ट्रेड अप्रेंटिस- रिटेल सेल्स असोसिएट (कुशल प्रमाणपत्र धारक) अर्ज करू शकतात. तसेच बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती?

१८ ते २४ वर्षे वयोगटातील उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

‘असा’ करा अर्ज

१. iocl.com वर जा

२. ‘अप्रेंटिस’ वर क्लिक करा

३. भरती अधिसूचना पहा

४. अधिसूचना वाचून अर्जासाठी नोंदणी करा

५. अर्ज भरा

६. अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करा

७.अर्ज फी भरा आणि सबमिट करा

८.अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iocl recruitment 2022 for 570 posts learn the application process ttg