हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना विदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध विषयांतर्गत उच्च-शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या जे. एन. टाटा कर्जाऊ शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०१३-२०१४ या शैक्षणिक सत्रासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार भारतीय नागरिक व कुठल्याही विषयातील पदवीधर वा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला बसणारे विद्यार्थी असावेत व त्यांचा संबंधित आलेख चांगला असायला हवा आणि त्यांना विदेशातील संबंधित विद्यापीठ वा शिक्षण संस्थेच्या २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात प्रवेश मिळालेला असावा.
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय ४५ वर्षांहून अधिक नसावे व त्यांना विदेशात जाऊन शिक्षण-संशोधनविषयक काम करण्याची आवड असायला हवी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मार्च व जून २०१३ मध्ये मुंबई येथे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
 निवड झालेल्या उमेदवारांना जे. एन. टाटा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विदेशी विद्यापीठ वा शैक्षणिक संस्थांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १०० रु.चा ‘दि जे. एन. टाटा एन्डॉव्हमेंट’च्या नावे असणारा व मुंबई येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी http://www.dorebjitatatrust.org या संकेतस्थळाला भेट द्यावी व अर्जाचा नमुना प्राप्त करावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस ऑफ दि एन्डॉव्हमेंट, मुल्ला हाऊस, ४था मजला, ५१, म. गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०१३.   

Story img Loader