JEE 2023 Main Admit Card: जेईई मेन परीक्षेचे हॉल तिकीट लवकरच jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट उपलब्ध करण्यापुर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडुन ‘एक्झाम सिटी स्लिप’ उपलब्ध करण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा कोणत्या शहरात आहे याची माहिती लवकर मिळेल. त्यानुसार विद्यार्थ्यांना नियोजन करण्यास मदत मिळेल.
एनटीएच्या आधीच्या वर्षांच्या ट्रेंडनुसार परीक्षेच्या तीन ते चार दिवस आधी हॉल तिकीट उपलब्ध केले जाते. त्यानुसार यावर्षी जेईई मेन परीक्षेचे हॉल तिकीट २० जानेवारी २०२३ किंवा २१ जानेवारी २०२३ ला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे जाणून घ्या.
जेईई मेन परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स वापरा
- jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
- होमपेजवर ‘जेईई मेन 2023 सेशन 1 एडमिट कार्ड’ या लिंकवर क्लिक करा.
- ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि पासवर्ड सबमिट करा.
- त्यानंतर स्क्रीनवर हॉल तिकीट दिसेल.
- तिथे डाउनलोड पर्यायावर क्लिक करून, हॉल तिकीट डाउनलोड करा आणि याची प्रिंट देखील काढून घ्या.
जे विद्यार्थी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन २.५ लाख रँकमध्ये असतील ते जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरतील. जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरू होणार आहे, तर ही परीक्षा ४ जून रोजी होणार आहे.