JEE Main Session 1 Answer Key 2022 released : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य सत्र १ साठी उत्तरपत्रिका जारी केली आहे. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर उत्तरपत्रिका तपासू शकतात.
एनटीएने पेपर १ आणि पेपर २ साठी प्रोव्हिजनल उत्तरपत्रिका जारी केल्या आहेत. उमेदवाराला कोणत्याही प्रश्न किंवा उत्तरावर काही आक्षेप असल्यास ते ४ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला आक्षेप नोंदवू शकतात. प्रत्येक प्रश्नासाठी २०० रुपये देखील द्यावे लागतील. सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइटवर या स्टेप्सच्या मदतीने उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात.
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
- त्यानंतर होम पेजवरील ‘Click here for QP / Responses and Provisional Answer Keys of JEE(Main) 2022 Session 1 for Challenge’ या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख द्वारे येथे लॉग इन करा.
- आता उमेदवार जेईई मुख्य सत्र १ उत्तरपत्रिका २०२२ तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे २३ जून ते २९ जून २०२२ या कालावधीत जेईई मेन्स ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यावर्षी ही परीक्षा देशभरातील ५०१ शहरांमध्ये आणि देशाबाहेरील २२ केंद्रांवर घेण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार या परीक्षेचा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय जेईई मुख्य सत्र ३ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. तपशीलवार माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट पाहू शकता.