सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक नोकरीची संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा इथे लवकरच पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक सरकारी वकील हे पद भरले जाणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२१ असणार आहे.
शैक्षणिक पात्रता किती?
सहाय्यक सरकारी वकील या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवारांना उच्च न्यायालयाचा किंवा दुय्यम न्यायालयाचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक असणेही आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती?
उमेदवारांचं वय हे ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पाच वर्ष सूट देण्यात येणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता काय?
जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे अर्ज पाठवावा.