भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी इच्छुक उमेदवारांना महाव्यवस्थापक मार्केटिंग व्यावसायिक (general manager – marketing & commercial) पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. हे पद बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात असेल.

पात्रता काय?

बीसीसीआयने त्यांच्या आवश्यकतेबद्दल ट्विट केले आहे. त्यानुसार

PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
NIACL Recruitment 2024: Notice Out For 500 Assistant Vacancies; Check Salary, Eligibility & More
NIACL Bharti 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ५०० जागांसाठी भरती; ४० हजारांपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास
Revenue Secretary Sanjay Malhotra to be the new RBI Governor for a period of 3 years!
RBI Governer : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर, पुढील तीन वर्षे असेल कार्यकाळ
Central Electronics Limited Recruitment 2024: Application Begins For Junior Technical Assistant And Technician Posts, Check Details
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती, मिळणार ७५ हजारपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

उमेदवाराने यशस्वीरित्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम, शक्यतो एमबीए पास केलेला असावा.

नामांकित कंपनीच्या मार्केटिंग प्रमुख म्हणून किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.

( हे ही वाचा: Central Bank SO Recruitment 2021: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती, पगार एक लाखांपर्यंत )

“बोर्ड आणि त्याचे ध्येय, कार्यक्रम आणि सेवा सातत्याने मजबूत आणि सकारात्मक मार्गाने सादर केल्या जातील याची खात्री करण्यासाठी उमेदवार सर्व मार्केटिंग आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी जबाबदार असेल. उमेदवाराने नाविन्यपूर्ण मार्केटिंग धोरणे आणि व्यावसायिक कार्यक्रम ओळखण्यास सक्षम असावे जे प्रायोजक आणि इतर व्यावसायिक भागीदारांसाठी आकर्षक असताना खेळाचा विकास करतील, ”बीसीसीआयने त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केले.

अर्जाची शेवटची तारीख काय?

अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी १६ डिसेंबरपर्यंत recruitment@bcci.tv या ईमेल आयडीवर संध्याकाळ ५ वाजेपर्यंत पाठवावेत. संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader