अणु-ऊर्जा विभागात सायन्टिफिक असिस्टंटच्या ३४ जागा
उमेदवारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका पात्रता कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली अणु-ऊर्जा विभागाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.awd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०१४.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १८३७ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टेट बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी किंवा स्टेट बँकेच्या http://www.sbi.co.in अथवा http://www.statebankofindia.com या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०१४.

संरक्षण मंत्रालयात- ‘डीआरडीओ’अंतर्गत पुणे येथे ३ फेलोशिप
अर्जदारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी कमीत कमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज डायरेक्टर – आर अॅण्ड डीई (इंजिनीअर्स),
आळंदी रोड, कळस, पुणे ४११०१५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०१४.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम, देहराडून येथे संशोधकांच्या १६ जागा
अर्जदार केमिकल इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर पात्रताधारक असायला हवेत. अनुभवी व पीएचडी पात्रताधारकांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ मार्च-
४ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सीएसआयआर- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम, देहराडूनची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम, पोस्ट ऑफिस- आयआयपी, मोटकंपूर, देहराडून २४८००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०१४.

एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन काऊन्सिल ऑफ इंडियामध्ये टेक्निकल ऑफिसरच्या ४ जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादेसाठी एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन ऑफ इंडियाच्या http://www.eicindia.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन काऊन्सिल ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख
२९ एप्रिल २०१४.

संरक्षण मंत्रालयातील डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट लेबॉरेटरी, हैदराबाद येथे  संशोधनपर फेलोशिप
उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन, एरोस्पेस इंजिनीअरिंग यांसारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट लेबॉरेटरी, हैदराबादची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट लेबॉरेटरी, पोस्ट कांचनबाग, हैदराबाद ५०००५८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल २०१४.

मध्य प्रदेशात जिल्हा न्यायाधीशांच्या ७७ जागा
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जासह भरावयाचे शुल्क इ.साठी मप्र उच्च न्यायालयाच्या http://www.mphighcourt.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख
३० एप्रिल २०१४.

भूजल मंत्रालय, भोपाळ येथे टेक्निकल ऑपरेटरच्या १० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, वेल्डर यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भूजल मंत्रालयाची
जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज रिजनल डायरेक्टर, मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोअर्स, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, नॉर्थ सेंट्रल रिजन, चौथा मजला, ब्लॉक-१, पर्यावास भवन, जेल रोड, भोपाळ (मप्र) ४६२०११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०१४.    

Story img Loader