या व्यासपीठावर तुमच्या करिअरविषयक प्रातिनिधिक आणि निवडक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तुमचे अभ्यासक्रमासंदर्भातील  प्रश्न आम्हांला career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर जरूर कळवा.
मला हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझम या विषयात एमबीए अभ्यासक्रम करायचा आहे. संस्थांची नावे सांगाल का?
– जयदीप भागवत
१. एमबीए इन हॉस्पिटॅलिटी हा अभ्यासक्रम पुणे येथील मेट्रोपोलिटन ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन या संस्थेच्या वतीने चालविण्यात येतो.
पत्ता- इंद्रप्रस्थ, आकाशवाणीजवळ, मांजरी फाटा, हडपसर, पुणे-४११०२८.
ईमेल- info@met.edu.in
वेबसाइट- http://www.met.edu.in
२. एमबीए इन टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी हा अभ्यासक्रम लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने सुरू केला आहे. पत्ता- जालंदर-दिल्ली जीटी रोड, एनएच वन, फगवारा, पंजाब- १४४४११. वेबसाइट- http://www.lpu.in
३. मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटेिरग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम महाराष्ट्र स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटेिरग टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत चालविण्यात येतो. पत्ता- शिवाजीनगर, पुणे.
वेबसाइट- http://www.msihmctrs.in हा दोन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम असून तो पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.
४. मास्टर ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड  टुरिझम- हा अभ्यासक्रम सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटमार्फत सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वष्रे. हा अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वष्रे. पत्ता – २०७४, सदाशिव पेठ, विजयनगर कॉलनी, पुणे- ४११०३०,
ईमेल-admisiions@suryadatta.org वेबसाइट- http://www.suryadatta.org

Story img Loader