कस्टम्स, एक्साइज व सव्र्हिस टॅक्स न्यायालयात कोर्ट मास्टरच्या ३ जागा
उमेदवार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांना न्यायालयीन कामकाजाचा दोन वर्षांचा अनुभव असावा. विधी विषयातील पात्रताधारकांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २१ ते २७ मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोग – पश्चिम क्षेत्र, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.sscwr.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक, कर्मचारी निवड आयोग- पश्चिम क्षेत्र, पहिला मजला, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर २१ एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.
वस्त्रोद्योग मंत्रालयात टेक्निकल सुपरिटेंडंट (विव्हिंग)च्या ३ जागा
उमेदवारांनी टेक्स्टाइल टेक्नॉलॉजीमधील पदवी अथवा हँडलूम टेक्नॉलॉजीमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोग- पश्चिम क्षेत्र, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.sscwr.net या संकेतस्थळाना भेट द्यावी.
विहित नमुन्यातील आवश्यक तो तपशील भरलेले आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक, कर्मचारी निवड आयोग- पश्चिम क्षेत्र, पहिला मजला, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई ४०००२० या पत्त्यावर २१ एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.
सेंट्रल सॉल्ट अॅण्ड मरिन केमिकल्स रिसर्च इन्स्टिटय़ूट, भावनगर येथे स्टेनोग्राफर्सच्या ५ जागा
उमेदवार बारावी उत्तीण असावा. त्यांनी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द व हिंदी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट पात्रता प्राप्त केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ मार्च- ३ एप्रिल २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल सॉल्ट अॅण्ड मरिन केमिकल्स रिसर्च इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.csmcri.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
भरलेले अर्ज सेक्शन ऑफिसर (आर अँड ए), सेंट्रल सॉल्ट अॅण्ड मरिन केमिकल्स रिसर्च इन्स्टिटय़ूट, गिजुभाई भडेका मार्ग, भावनगर, गुजरात- ३६४००२ या पत्त्यावर २५ एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.
सिक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सेक्रेटरियल असिस्टंटच्या ६ जागा
अर्जदारांनी पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट तर टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रता प्राप्त केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ मार्च ते ३ एप्रिल २०१५च्या अंकातील सिक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह मॅनेजर (एचआर), सिक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, १६ वा मजला, जवाहर व्यापार भवन, जनपथ, नवी दिल्ली ११० ००१ या पत्त्यावर २५ एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.
‘गेल’ इंडिया लिमिटेडमध्ये वरिष्ठ अधिकारी (विपणन) १३ जागा
उमेदवारांनी इंजिनीअरिंगमधील पदवी व त्यानंतर एमबीए पदवी किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० एप्रिल २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली गेल (इंडिया) लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा गेलच्या http://www.gailonline.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील अर्ज सीनियर मॅनेजर (एचआरडी), ‘गेल’ इंडिया लिमिटेड, गेल भवन, १६, भिकाजी कामा प्लेस, आर. के. पूरम, नवी दिल्ली ११००६६ या पत्त्यावर २५ एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात कनिष्ठ कारकुनांच्या १२ जागा
अर्जदार पदवीधर असावेत. इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट पात्रता असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ मार्च २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील अर्ज अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, (रिक्रुटमेंट), सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, परिवेश भवन, ईस्ट अर्जुन नगर, शाहदरा, दिल्ली ११००३२ या पत्त्यावर २५ एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.