वास्तुशास्त्रीय संघटना निवड समिती, मुंबई येथे वास्तुआरेखकांच्या ४ जागा : उमेदवार वास्तुशास्त्र विद्यालयातील पदवीधर असावेत व त्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर-नवी दिल्ली या संस्थेचे सभासदत्व घेतलेले असावे. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली वास्तुशास्त्रीय संघटना निवड समिती-मुंबईची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि २० x १० सेंटीमीटर्स आकाराचे स्वत:चे नाव आणि पत्ता लिहिलेले व पुरेशा टपाल तिकिटांसह असणारे अर्ज तपासणी अधिकारी तथा सदस्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१२.
‘बेस्ट’मध्ये वाहकांच्या १०६० जागा : अर्जदारांनी मराठीसह शालांत परीक्षा कमीतकमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ४० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ‘बेस्ट’ उपक्रमाची जाहिरात पाहावी.संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज उप-मुख्य कर्मचारीय व्यवस्थापक, मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम, बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०१२.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये चार्टर्ड अकाउंटन्टच्या ४० जागा : अर्जदारांनी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सीची सीए पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यानंतरची उमेदवारीपण पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ ऑक्टोबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी. अथवा एचपीच्या http://www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१२.
मुंबई उच्च न्यायालयात कोर्ट मॅनेजरच्या ४० जागा : अर्जदार एमबीए असावेत व त्यांना प्रशासकीय कामाचा पाच वर्षांचा अनुभव व संगणकाचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा ४० वर्षे.अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात पाहावी अथवा उच्च न्यायालयाच्या http://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०१२.
स्पेशल क्लास रेल्वे अॅपरेंटिस एक्झामिनेशन – २०१३ : उमेदवारांनी बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र यांपैकी एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २१ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ ऑक्टोबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी, अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१२.
रोजगार संधी
वास्तुशास्त्रीय संघटना निवड समिती, मुंबई येथे वास्तुआरेखकांच्या ४ जागा : उमेदवार वास्तुशास्त्र विद्यालयातील पदवीधर असावेत व त्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर-नवी दिल्ली या संस्थेचे सभासदत्व घेतलेले असावे.
First published on: 06-11-2012 at 12:55 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity