Mahavitaran Jalna Bharti 2022: जालना येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अर्थात महावितरण येथे १३३ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात घ्या ही भरती फक्त जालना जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर जिल्हातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जाची शेवटची तारीख आणि अन्य तपशील जाणून घ्या.
पदाचे नाव: अप्रेंटीस (वीजतंत्री, तारतंत्री).
रिक्त पदे: १३३ पदे.
(हे ही वाचा: KDMC Recruitment 2022: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या तपशील)
नोकरीचे ठिकाण: जालना</p>
शैक्षणिक पात्रता: दहावी पास आणि ITI पास (इलेक्ट्रिशियन/ वायरमन)
(हे ही वाचा: MPA Nashik Recruitment: महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे विविध पदांची भरती; ‘असा’ करा अर्ज)
वयोमर्यादा: १८ ते २१ वर्षे.
अर्जपद्धती: ऑफलाईन पद्धतीने आर्ज आणि कागदपत्र जमा करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने http://www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
(हे ही वाचा: Reliance Recruitment 2022: अभियांत्रिकी पदवी धारकांसाठी नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक तपशील)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ एप्रिल २०२२
अर्ज करण्यासाठी पत्ता: अधिकक्ष अभियंता, म. रा. वि. वि. कंपनी मर्यादित, जालना मंडळ कार्यालय.