कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिग असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर्स, कनिष्ठ कारकून यांसारख्या पदांवर नेमणूक करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत –
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांच्याजवळ टंकलेखन-संगणकविषयक पात्रता असायला हवी.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्र उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १, १५ व २२ नोव्हेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, अकोला व जळगाव या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना कौशल्य चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व भत्ते : निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या सेवेत दरमहा ५२००-२०२०० + २४०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.
या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व लाभ देय असतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १०० रु.ची टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी रिक्रुटमेंट टपाल तिकिटे लावणे आवश्यक आहे.
अर्जाचा तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ जून २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची मुदत : राज्यातील विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील भरलेले व आवश्यक तो तपशील आणि रिक्रुटमेंट टपाल तिकिटांसह असणारे अर्ज क्षेत्रीय संचालक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर १३ जुलै २०१५ पर्यंत पाठवावेत.
बारावी उत्तीर्णासाठी संधी
कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिग असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर्स, कनिष्ठ कारकून यांसारख्या पदांवर नेमणूक करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज
First published on: 06-07-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opporunities for hsc passers