सुहास पाटील suhassitaram@yahoo.com
भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी (DAE), भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) ट्रेनिंग स्कूल्स इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स आणि सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्स यांना ‘सायंटिफिक ऑफिसर (ग्रुप-ए)’ पदांच्या भरतीसाठी OCES-2022 आणि DGFS-2022 हे दोन शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणार आहे. (I) OCES -२०२२ – ‘ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर’ (TSO) १ वर्षांच्या ओरिएंटेशन कोर्स फॉर इंजिनीअरिंरग ग्रॅज्युएट्स अँड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्स (OCES२०२२) (सन २०२२-२३) प्रशिक्षणाकरिता पुढील BARC ट्रेनिंग स्कूल्समध्ये प्रवेश दिला जातो. BARC, मुंबई; इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च (IGCAR), कल्पक्कम; न्यूक्लियर फ्यूएल कॉम्प्लेक्स (NFC), हैद्राबाद; राजा रामन्ना सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड् टेक्नॉलॉजी (RRCAT), इंदौर; अॅटॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्पलोरेशन अॅण्ड रिसर्च (AMD), हैद्राबाद.
पात्रता – (अ) इंजिनीअरिंरग विद्याशाखा – पुढील नऊपैकी एका विद्याशाखेतून इंजिनीअरिंरगमधील पदवी (B. E./ B. Tech..) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.
(१) मेकॅनिकल (ME-२१), (२) केमिकल (CH-२२), (३) मेटॅलर्जी (MT-२३), (४) इलेक्ट्रिकल (EE-२४), (५) इलेक्ट्रॉनिक्स (EC-२५), (६) कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंरग (CS -२६), (७) इन्स्ट्रमेंटेशन (IN-२७), (८) सिव्हिल (CE-२८), (९) न्यूक्लियर इंजिनीअरिंग (NE-२९), (१०) फास्ट रिअॅक्टर टेक्नॉलॉजी-एम् (ही एक वेगळी विद्याशाखा नसून मेकॅनिकल आणि केमिकल इंजिनीअर्ससाठी असलेली एक ट्रेनिंग स्कीम आहे) (FRT- M-३०), (११) फास्ट रिअॅक्टर टेक्नॉलॉजी-ई (FRT- E–३१) (ही एक वेगळी विद्या शाखा नसून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्ससाठी असलेली एक ट्रेनिंग स्कीम आहे.) (१२) क्वॉलिटी अॅश्युरन्स अॅण्ड क्वॉलिटी कंट्रोल (QA & QC-३२) (ही एक वेगळी विद्याशाखा नसून मेकॅनिकल आणि मेटॅलर्जी इंजिनीअर्ससाठी असलेली एक ट्रेनिंग स्कीम आहे.)
(ब) शास्त्र विद्याशाखा – संबंधित विद्याशाखेतून (एम.एस्सी.) पदव्युत्तर पदवी किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण. बी.एस्सी.लासुद्धा किमान सरासरी ६०% गुण आवश्यक. (१) फिजिक्स (PH-४१), (२) केमिस्ट्री (CY-४२), (३) रेडिओलॉजिकल सेफ्टी अॅण्ड एन्व्हिरॉनमेंटल सायन्स (RSES) (RSES (फिजिक्स, केमिस्ट्री आणि न्यूक्लियर इंजिनीअर्ससाठी असलेली एक ट्रेनिंग स्कीम), (४) जीऑलॉजी (GE-४५).
GATE स्कोअर आधारित निवडीसाठी ऑप्शन दिलेल्या उमेदवारांकडे GATE -२०२१/ GATE-२०२२ चा संबंधित विषयातील व्हॅलिड स्कोअर असणे आवश्यक. एम.एस्सी. (बाय रिसर्च) किंवा पीएच.डी. उमेदवार पात्र नाहीत.
ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर (TSO) ट्रेनिंग पूर्ण करताना किमान ५०% गुण मिळवतील अशा उमेदवारांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे जाहीर केले जाईल. यशस्वी TSO s’ना ‘सायंटिफिक ऑफिसर ग्रेड-सी’ पदावर पुढीलपैकी एका DAE युनिटमध्ये तैनात केले जाईल. (१) BARC, मुंबई; (२) IGCAR कल्पक्कम; (३) RRCAT, कल्पक्कम; (४) VECC कोलकाता; (५) HWB, मुंबई; (६) NFC, हैद्राबाद; (७) BRIT,, मुंबई; (८) NPCIL, मुंबई; (९) BHAVINI,, कल्पक्कम; (१०) AMD, हैद्राबाद; (११) UCIL, जादूगुडा, (१२) DCS & EM, मुंबई.
प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा रु. ५५,०००/- स्टायपेंड दिले जाईल. शिवाय पुस्तकांसाठी एका वेळेला रु. १८,०००/- दिले जातील.
वेतन – प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड-सी पदावर रु. १,०५,०००/- दरमहा वेतन दिले जाईल.
प्रशिक्षणामधील कामगिरीवर आधारित ट्रेनीजना पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा दिला जाईल. शिवाय ट्रेनिंग दरम्यानच्या गुणवत्तेच्या आधारे त्यांना होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट (ऌइठक) मध्ये एम.टेक./ पीएच.डी.साठी प्रवेश दिला जाईल.
(II) २ वर्ष कालावधीची DAE ग्रॅज्युएट फेलोशिप स्कीम फॉर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अॅण्ड फिजिक्स पोस्ट ग्रॅज्युएट्स फॉर द इयर २०२२-२०२४ (DGFS २०२२)
पात्रता – इंजिनीअरिंरग ग्रॅज्युएट्स आणि फिजिक्स पोस्ट ग्रॅज्युएट्स (डिसिप्लिन्स २१ ते २८ आणि ४१) ज्यांनी BARC ट्रेनिंग स्कूल्स प्रोग्रामसाठीच्या सिलेक्शन इंटरव्ह्यूमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि ज्यांनी IIT Bombay, IIT Delhi, IIT Guwahati, IIT Kanpur, IIT Kharagpur, IIT Madras, IIT Rourkee, IIT BHU ( Varanasi), ICT Mumbai, NIT Rourkela या इन्स्टिटय़ूशन्समध्ये स्वत M. Tech./ M. Chem. Engg. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविलेला आहे.
DGFS फेलोजना एन्रॉलमेंटनंतर DAE च्या BARC मुंबई किंवा IGCAR, कल्पक्कम येथे नेमणूक दिली जाईल. DGFS फेलोजना ट्रेनिंग दरम्यान रु. ५५,०००/- स्टायपेंड दिले जाईल. त्यांची एम.ई./ एम.टेक.साठीची टय़ूशन फी BARC कडून दिली जाईल. १ वर्ष कालावधीचा कोर्स वर्क पूर्ण झाल्यावर फेलोजना DAE ने दिलेल्या प्रोजेक्ट वर्कवर DAE आणि इन्स्टिटय़ूटचे गाईड यांच्या संयुक्त देखरेखीखाली काम करावे लागेल. एम.ई./एम.टेक. यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांना DAE मध्ये ‘सायंटिफिक ऑफिसर’ पदावर नेमले जाईल. त्यानंतर फेलोजना चार महिन्यांच्या ओरिएंटेशन कोर्स फॉर DGFS फेलोज OCDF कोर्ससाठी BARC ट्रेनिंग स्कूल, मुंबई येथे पाठविले जाईल.
वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी २६ वर्षे (खुला गट), २९ वर्षे (इमाव), ३१ वर्षे (अजा/अज), ३६ वर्षे (विकलांग).
अर्जाचे शुल्क – रु. ५००/-. (महिला/ अजा/ अज/ विकलांग यांना शुल्क माफ आहे.)
निवड पद्धती – सिलेक्शन इंटरव्ह्यूसाठी निवड दोन पद्धतीने केली जाते.
(१) ऑनलाइन निवड चाचणी (OCES) (९ इंजिनीअरिंगच्या शाखा (कोड क्र. २१ ते २९) आणि चार सायन्समधील शाखांमधील प्रवेशासाठी (कोड क्र. ४१, ४२, ४४ आणि ४५)). देशभरातील ४० केंद्रांवर ७ ते १३ एप्रिल २०२२ दरम्यान घेतली जाईल.
(२) GATE स्कोअर – GATE -२०२१/ GATE -२०२२ स्कोअरवर आधारित उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील.
उमेदवारांना एम.एस्सी. (इंटिग्रेटेड) चा स्कोअर ७.५/१० च्या स्केलवर पेक्षा जास्तीचा असेल असे वट- DAE- CBS, मुंबई आणि NISER,भुवनेश्वरचे विद्यार्थी यांना निवड मुलाखतीसाठी सरळ निवडले जाईल.
GATE चा कट ऑफ स्कोअर सिलेक्शन मुलाखतीसाठी ऑनलाइन चाचणी झाल्यानंतरच जाहीर केला जाईल.
सिलेक्शन इंटरव्ह्यू – शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखत १४ जून ते ३१ जुलै २०२२ दरम्यान (जीऑलॉजी वगळता सर्व विद्याशाखांसाठी) BARC, मुंबई येथे होतील. जीऑलॉजीसाठी या मुलाखती हैद्राबादला होतील.
अंतिम निवड सिलेक्शन इंटरव्ह्यूमधील कामगिरीवर आधारित केली जाईल.
इतर संधी – OCES-२०२२ साठी अर्ज करणारे उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) आणि इन्स्टिटय़ूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च (IPR) मध्ये सरळ भरतीकरिता पात्र असतील. सिलेक्शन इंटरव्ह्यूच्या मेरिट लिस्टमधील उमेदवार एम.एस्सी. (इंजिनीअरिंग)/ पीएच.डी. किंवा रेडिओलॉजिकल फिजिक्स या कोर्सेससाठी BARC च्या HBNI मध्ये २०२२-२३ करिता निवडले जाऊ शकतात.
BARC ट्रेनिंग स्कूल, मुंबई येथे विद्याशाखा कोड क्र. २१ ते २८ आणि ४१, ४२ व ४४ चे प्रोग्रॅम चालतात.
ऑनलाइन एक्झामिनेशन स्लॉट बुकिंग – ४ मार्च ते १८ मार्च २०२२. ऑनलाइन टेस्ट ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०२२. GATE स्कोअर अपलोड करण्याचा अंतिम दिनांक १३ एप्रिल २०२२.
सिलेक्शन इंटरव्ह्यूसाठी शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी दि. २८ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाईल.
सिलेक्शन इंटरव्ह्यूसाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीचा स्लॉट निवडण्याचा दि. ३० एप्रिल ते ४ मे २०२२.
सिलेक्शन इंटरव्ह्यू – १४ जून ते ३१ जुलै २०२२ दरम्यान घेतले जातील. OCES निवड यादी १८ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर होईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचा अंतिम दि. ११ फेब्रुवारी २०२२ आहे.
ऑनलाइन अर्ज
http:// www. barconlineexam.in या संकेतस्थळावर दि. १२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सबमिट करता येतील.