सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट (NIPHM) हैद्राबाद (डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रिकल्चर, को-ऑपरेशन अँड फार्मर्स वेल्फेअर, मिनिस्ट्री ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अँड फार्मर्स वेल्फेअर, भारत सरकार)

(क) प्लांट हेल्थ मॅनेजमेंटमधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (PGDPHM) आणि डिप्लोमा इन प्लांट हेल्थ मॅनेजमेंट (DPHM) २०२१-२२ साठी प्रवेश सूचना.

अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट – पर्यावरणीय सस्टेनेबल प्लांट हेल्थ आणि जैविक सुरक्षा व्यवस्थापन यांना बढावा देणारे अत्यंत वचनबद्ध व सक्षम कृषी व्यावसायिक तयार करणे. पुढीलपैकी एका क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ तयार केले जातात. एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम १५ क्रेडिट्स (प्रत्येकी) च्या दोन सेमिस्टर्समध्ये शिकविला जातो.

(१) बायोकंट्रोल इनपुट प्रोडक्शन मॅनेजमेंट, (२) बायोसिक्युरिटी इन्करशन मॅनेजमेंट, (३) पेस्टिसाइड मॅनेजमेंट, (४) व्हर्टब्रिेट अँड स्ट्रक्चरल पेस्ट मॅनेजमेंट, (५) प्लांट हेल्थ इंजिनीअरिंग.

पात्रता – बी.एस्सी. (अ‍ॅग्रि किंवा हॉर्टकिल्चर)/बी.एस्सी. (अ‍ॅग्रि अँड रुरल डेव्हलपमेंट)/बी.टेक्. (अ‍ॅग्रि इंजिनीअरिंग)/एम्.एस्सी. (लाइफ सायन्सेस).

शुल्क – बेरोजगार उमेदवारांसाठी

रु. ६२,५००/- जे दोन हप्त्यांमध्ये भरता येईल. उमेदवारांना NIPHM मध्ये  मोफत निवासाची सोय दिली जाईल. त्यांना जेवणाचे पैसे वेगळे भरावे लागतील. खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना शुल्क असेल रु. २ लाख.

(II) डिप्लोमा इन प्लांट हेल्थ मॅनेजमेंट (DPHM) – कालावधी सहा महिने.

पात्रता – बी.एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर/हॉर्टकिल्चर/लाइफ सायन्सेस/अ‍ॅग्रि अँड रुरल डेव्हलपमेंट) किंवा बी.टेक. (अ‍ॅग्रि इंजिनीअरिंग).

शुल्क – रु. २५,०००/- (दोन हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा) (बोर्डिग चार्जेस वेगळे भरावे लागतील.)

उमेदवारांना NIPHM  वसतीगृह/ वसाहतीमध्ये मोफत राहावयास मिळेल. अधिक माहिती http://niphm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्जाचे शुल्क/नोंदणी शुल्क – रु. १००/-.  हे शुल्क NEFT द्वारे भरावयाचे आहे.

ऑनलाइन अर्ज http://niphm.gov.in या संकेतस्थळावर दि. १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत करावेत.

संपर्क क्र. ०४०-२४०१५३४७. E-mail – registrarniphm@nic.in

लेखी परीक्षा दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी घेतली जाईल. (अंदाजे/ऑनलाइन) निवडलेल्या उमेदवारांची यादी दि. ६ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केली जाईल. कोर्स दि. १५ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होतील.

प्रादेशिक सेने (Territorial Army) मध्ये पुरुष/महिला पदवीधर उमेदवारांची ऑफिसर पदावर भरती. प्रादेशिक सेना अधिकारी बनून राष्ट्राची सेवा करण्यासाठी लाभप्रद रोजगार (Gainfully Employed) (केंद्र/ राज्य/ निमसरकारी/ पीएसयू/ खासगी क्षेत्रामधील कर्मचारी तसेच स्वयंरोजगार/ स्वत:चा व्यवसाय) असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत (त्यांना जाहिरातीमध्ये दिलेल्या विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करावे लागेल.).

टेरिटोरियल आर्मी हे पूर्ण वेळ करिअर नव्हे, या सेवेसाठी निवृत्तिवेतन दिले जात नाही. निवडलेल्या उमेदवारांना लेफ्टनंट रँकवर कमिशन्ड् ऑफिसर म्हणून तनात केले जाते. त्यांना वेतन, इतर भत्ते आणि इतर सोयीसुविधा  लष्करी अधिकाऱ्यांप्रमाणेच दिल्या जातील. लेफ्टनंट कर्नल पदापर्यंतची बढती ठरलेल्या निकषांनुसार दिली जाईल. ब्रिगेडियर पदापर्यंतची बढती निवड पद्धतीने दिली जाईल.

पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा- दि. १९ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते ४२ वर्षे.

शारीरिक मापदंड- उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त असावा.

वेतन- सातव्या केंद्रीय वेतन आयोगाप्रमाणे पे-लेव्हल- १०, मूळ वेतन रु. ५६,१००/- अधिक मिलिटरी सव्‍‌र्हिसेस पे रु. १५,५००/- अधिक डी.ए. व इतर भत्ते मिळून अंदाजे रु. १,००,०००/-.

निवड पद्धती- पात्रता परीक्षेतील (पदवी) गुणवत्तेनुसार उमेदवार लेखी परीक्षेसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना संबंधित प्रादेशिक सेना ग्रुप मुख्यालय यांच्या प्रीलिमिनरी इंटरव्ह्य़ू बोर्ड (PIB) समोर मुलाखत द्यावी लागेल. यातून यशस्वी उमेदवारांची सव्‍‌र्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) टेस्ट आणि मेडिकल बोर्ड टेस्ट्स घेऊन अंतिम निवड केली जाईल.

लेखी परीक्षा- लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप (OMR  उत्तरपत्रिका) पेपर-१ व पेपर-२ प्रत्येकी २ तासांच्या कालावधीची प्रत्येकी १०० प्रश्न/ १०० गुणांसाठी असेल. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जातील.

पेपर-१- पार्ट-१ रिझिनग– ५० गुण, पार्ट-२ प्राथमिक गणित- ५० गुण.

पेपर-२- पार्ट-१ जनरल नॉलेज- ५० गुण व पार्ट-२- इंग्लिश- ५० गुण.

प्राथमिक गणित विषयातील प्रश्नांचा स्तर १०वी पात्रतेचा असेल. इतर विषयांसाठी पदवी स्तरावरील प्रश्न असतील.

प्रशिक्षण- पहिल्या वर्षी निवडलेल्या उमेदवारांना एक महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल. दरवर्षी उमेदवारांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण शिबीर करावे लागेल (पहिल्या वर्षीसुद्धा). पहिल्या दोन वर्षांत तीन महिन्यांचे पोस्ट कमिशिनग प्रशिक्षण OTA, चेन्नई येथे करावे लागेल.

अर्जाचे शुल्क- रु. २००/-.

लेखी परीक्षा- दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी PIB Cell, TA Group Headquarters Southern Command, Pune – ४११ ००१ साठी पुणे, बेंगळुरू, हैद्राबाद, जयपूर या केंद्रांवर घेतली जाईल.

(संपर्कासाठी फोन नं. ०२०-२६८८१२३)

शंकासमाधानासाठी फोन नं. ०११-२३०९४३६५ किंवा ई-मेल आयडी target.aim@gov.in

ऑनलाइन अर्ज  (IAF (TA)-9 (Revised) Part-1) http://www.jointerritorialarmy.gov.in  या संकेतस्थळावर दि. १९ ऑगस्ट २०२१ पर्यंत करावेत.

लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांनी http://www.jointerritorialarmy.gov.in या संकेतस्थळावरून IAF(TA)- ९ (Revised)Partहा अर्जाचा नमुना डाऊनलोड करून स्वहस्ताने भरावयाचा आहे. जो त्यांना ढकइ  मुलाखतीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावा लागेल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jobs in india job vacancies in india job opportunities in india zws