केंद्रीय विद्यालयामध्ये १३ हजारांहून अधिक पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज (२६ डिसेंबर २०२२) शेवटची तारीख आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेकडुन शिक्षक आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यासाठी कुठे अर्ज करायचा जाणून घ्या.
कोणत्या पदांसाठी होत आहे भरती?
- पोस्ट ग्रेजुएट शिक्षक (पीजीटी) – १४०९ पद
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) – ३१७९ पद
- प्राथमिक शिक्षक (पीआरटी) – ६४१४ पद
- पीआरटी (संगीत) – ३०३ पद
शिक्षकेतर कर्मचारी
- असिस्टंट कमिश्नर – ५२ पद
- प्राचार्य – २३९ पद
- उप प्राचार्य – २०३ पद
- ग्रंथपाल – ३५५ पद
- वित्त अधिकारी – ६ पद
- असिस्टंट इंजीनियर (सिव्हिल) – २ पद
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर (एएसओ) – १५६ पद
- सीनियर सेक्रेटेरिअट असिस्टंट (यूडीसी) – ३२२ पद
- जूनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (एलडीसी) – ७०२ पद
- हिंदी ट्रान्सलेटर – ११ पद
- स्टेनोग्राफर ग्रेड- २ – ५४ पद
कुठे करायचा अर्ज
- kvsangathan.nic.in/ या केवीएसच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यावर ‘ऑनलाईन अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा योग्य फोन नंबर सबमिट करून, स्वतःची नोंदणी करा.
- नंतर इतर तपशील माहितीसह लॉग इन करा.
- अधिकृत कागदपत्रानुसार फॉर्म भरा.
- त्यानंतर अर्ज सबमिट करा.
- तुमच्या कॅटेगरीनुसार फी भरा.
- या अर्जाची भविष्यात गरज भासल्यास, तुमच्याकडे या फॉर्मची एक प्रिंट काढून ठेवा.