कल्पनाशक्तीला प्रचंड वाव, करिअरच्या विविध संधी आणि परिसराचे रूप पालटून टाकण्याचे सामथ्र्य असलेल्या लॅण्डस्केप आर्किटेक्चर या आगळ्यावेगळ्या करिअरविषयी आणि त्यातील कामाच्या वेगवेगळ्या संधींविषयी जाणून घेऊयात –
पर्यटनाच्या निमित्ताने आपण अनेकदा वेगवेगळ्या शहरांमध्ये अथवा परदेशांमध्ये जात असतो. अशा वेळी नेहमीच्या प्रसिद्ध ठिकाणांपेक्षा अनेक गोष्टी असतात, ज्या आपल्या मनात घर करून राहतात. मग ती एखादी बाग असते किंवा मंदिराचा परिसर असतो किंवा इतर काहीही असू शकते. इतकेच कशाला, आपण राहात असलेल्या शहरातदेखील एखादी जागा अशी असते की, तिथे सर्व प्रकारच्या आवश्यक त्या सोयी असूनदेखील, मनाला एकप्रकारचा निवांतपणा लाभत असतो. किंबहुना ती जागा गर्दीच्या कोलाहलात असली तरी तिथे स्वस्थता लाभत असते. हे सारे कशामुळे होते, तर त्या जागेचे योग्य रीतीने लॅण्डस्केपिंग करून घेतल्यामुळे.
लॅण्डस्केप आर्किटेक्चर हे असे क्षेत्र आहे, ज्यामुळे एखाद्या ठिकाणाला किंवा इमारतीच्या परिसराला एक वेगळेच परिमाण लाभते. इतकेच नाही तर त्या जागेला एक सौंदर्य प्राप्त होते. तेव्हा जाणून घेऊया, या क्षेत्राविषयी-
जर तुमच्याजवळ लॅण्डस्केप आर्किटेक्चरमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर ती तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत जमेची अशी बाब असते. याचे कारण या पदवीच्या जोरावर संधीची अनेक कवाडे तुमच्यासाठी खुली होतात. याशिवाय, ड्राफ्टिंग, थ्रीडी मॉडेलिंग, लॅण्डस्केप डिझाइन अशा स्वरूपाच्या प्रमाणपत्रित अभ्यासक्रमाद्वारे देखील व्यवसायाच्या अथवा नोकरीच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होतात. कारण या शिक्षणक्रमामध्ये पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष व्यावसायिक कौशल्यांवर अधिक भर दिलेला असतो. एकदा का तुम्ही या क्षेत्रात प्रवेश केलात की, तुमच्यासमोर अनेक खास आणि विविध पर्याय उपलब्ध होतात आणि समजा, काम करता करता त्यात तुम्हाला आवड निर्माण झाल्यास तुम्ही अगदी स्पेशलायजेशनदेखील करू शकतात. काही लॅण्डस्केप आर्किटेक्चर तांत्रिक पाश्र्वभूमीचे ज्ञान घेऊन येतात नि त्यांना सैद्धांतिक काम करण्याची आवड निर्माण होते. तर जे शैक्षणिक पाश्र्वभूमी घेऊन या क्षेत्रात येतात, त्यांचा प्रामुख्याने तांत्रिक स्वरूपाचे काम करण्याकडे अधिक कल असतो. थोडक्यात काय तर, तुमची या क्षेत्रातील ज्ञानाविषयीची कोणतीही पाश्र्वभूमी असो, या क्षेत्रात करून दाखविण्यासारखे खूप काही आहे .
लॅण्डस्केप आर्किटेक्चर म्हणून तुम्ही जेव्हा दिवसभर काम करता, तेव्हा एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे या कामात असलेली विविधता. त्यामुळे या स्वरूपाचे नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे काम करताना कामात नेहमीच उत्साह जाणवत राहतो.
ज्याप्रमाणे इतर क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकास या विभागांत काम करताना एक प्रकारचा उत्साह जाणवत असतो, त्याचप्रमाणे डिझाइन हा या क्षेत्रातील मनाला तसेच डोक्याला तजेला प्राप्त करून देणारा असा विभाग आहे. प्रत्यक्ष एखाद्या डिझाइनचा आराखडा तयार करीत असताना, तुम्हाला अनेक तंत्रे विकसित करता येतात. जसे, एखादे डिझाइन तयार करीत असताना, समजा एखादी अडचण जाणवली तर लगेच त्यावर पर्याय शोधून काढता येतो किंवा एकाच डिझाइनमार्फत वेगवेगळे पर्याय निर्माण करता येतात. कारण हे डिझाइन कुठल्याही एका गोष्टीशी निगडित नसते, तर त्यात सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय, पर्यावरणात्मक अशा विविध बाबींचा समावेश असतो. एखाद्या जमिनीच्या तुकडय़ात बदल आणि विकास घडवून आणणे हे वरवर सहजसोपे काम वाटत असले तरीही त्यात बजेट, क्लायंट्सच्या अपेक्षा, ज्या कारणांसाठी लॅण्डस्केप तयार केले जात आहे ते आणि प्रत्यक्ष त्यांचा वापर ज्या घटकांद्वारे केला जाणार आहे त्यांच्या गरजा आदी सर्व गोष्टी ध्यानात ठेवूनच डिझाइन तयार करावे लागते. त्यामुळेच डिझाइन तयार करणे ही तांत्रिकदृष्टय़ा किचकट प्रक्रिया असली, तरीही ते तयार करण्याचे प्रशिक्षण योग्य रीतीने आत्मसात केल्यास एकाच वेळी अनेक तऱ्हेने डिझाइन निर्माण करणे तुम्हाला सहजसाध्य होते.
डिझाइन तयार करताना तुमच्या मनातील कल्पनाशक्तीला वाव तर मिळतोच, पण त्याचबरोबर मुद्देसूद मांडणी, कल्पनाशक्तीची योग्य आलेखाद्वारे मांडणी आणि मनातील भावना उत्तमरीतीने बोलून दाखविण्याची हातोटी या गोष्टीदेखील तितक्याच आवश्यक ठरतात.   थोडक्यात काय तर या क्षेत्रात शिरल्यानंतर तुम्ही तुमच्या मनातील भावना अथवा विचार नेमकेपणाने व्यक्त करायला शिकता.
इतकेच नाही तर, या कामाच्या निमित्ताने तुम्हाला तऱ्हेतऱ्हेच्या लोकांना भेटावे लागते. मग ही मंडळी शहररचनेतील तज्ज्ञ, विभागातील कुटुंबे किंवा एखादी पर्यावरणासंदर्भात काम करणारी संघटना यांपकी कुणीही असू शकते. या लोकांबरोबर बोलताना तुम्ही तयार करीत असलेल्या डिझाइनला कोणकोणत्या अडचणी जाणवू शकतात, याचा एक अंदाज तुम्हांला येतो.
या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला हॉर्टिकल्चरल (बागाईत कामाचे शास्त्र), बांधकामासाठी लागणारे साहित्य, काँक्रिटीकरण, लॅण्डस्केप लाइटिंग, बांधणी, कामाची नियमावली यांसारख्या अनेक तांत्रिक गोष्टींचे ज्ञान होते. यावरूनच तुम्हाला कल्पना करता येईल की, या क्षेत्रात करिअरच्या दृष्टीने किती विविध पर्याय उपलब्ध आहेत.
या क्षेत्राची एक खासियत म्हणजे- इथे तुम्हाला निर्मितीक्षम असे काम करायला मिळते, अन्यथा रटाळ आणि कंटाळवाणी कामेदेखील करण्याचीही वेळ ओढवते. म्हणजेच जेव्हा एखाद्या कामाचा तुम्हाला मोबदला मिळतो, त्या वेळी जर छोटीशी चूक जरी तुमच्याकडून झाली तरी ते काम गमाविण्याची तुमच्यावर वेळ येऊ शकते.  
लॅण्डस्केप आर्किटेक्चर म्हणून तुम्ही जेव्हा काम करता, तेव्हा त्या कामाच्या यशापयशाची जबाबदारी ही सर्वस्वी तुमच्यावर असते. त्यासाठी वेळोवेळी लोकांना अथवा तुमच्या क्लायंट्सच्या निर्मितीक्षमतेला दोष देण्याची गरज नसते.
एक काळ असा होता, जेव्हा राजे-महाराजे स्वत:च्या चनीसाठी आपल्या महालांसमोर विविध आकारांतील बागा बांधत अथवा अशा काही जागा तयार करत, ज्यामुळे तिथल्या परिसराला एक वेगळेच सौंदर्य लाभत असे. पण अलीकडच्या काळात मात्र लॅण्डस्केपिंग ही केवळ चनीची बाब राहिली नसून ती एक सामाजिक गरज बनत चालली आहे.  
लॅण्डस्केप या शब्दाची उत्पत्ती खूप मजेशीर आहे. मजेशीर यासाठी की, काळानुसार याच्या संकल्पनेत बदल होत गेले. जसे आधुनिक इंग्रजीनुसार, याचा अर्थ ‘भूगोलानुसार’ असा होतो, तर जुन्या इंग्रजीनुसार ‘प्रदेश’ या संकल्पनेसाठी हा शब्द वापरला जात असे. पुढे सतराव्या शतकात ‘चित्रकार’ तर अठराव्या शतकात ‘डिझायनर’ या अर्थाने रूढ झाला. ‘रमणीय भूप्रदेश किंवा त्याचे चित्र रेखाटणारा चित्रकार’ हा अपेक्षित अर्थ एकोणिसाव्या शतकात त्याला प्राप्त झाला. तेव्हापासून हाच अर्थ प्रचलित झाला आहे आणि तो पूरकदेखील आहे. कारण जमिनीचा एखादा तुकडा किंवा छोटय़ाशा विभागाला जेव्हा नवनिर्मितीची जोड देऊन, त्यावर योग्य ते डिझाइन करून तो जेव्हा सजविण्यात येतो, तेव्हा त्याचा झालेला कायापालट निव्वळ नजरेलाच नाही तर मनालादेखील तजेला देतो.   
ज्याप्रमाणे रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर झटत असतो, त्याचप्रमाणे जमिनीच्या एखाद्या विभागाला आवश्यक ते सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी लॅण्डस्केप आर्किटेक्चर झटत असतो. एखाद्या जागेचे महत्त्व लक्षात घेऊन, त्या जागेला सुंदर बनवणे, जेणेकरून सभोवतालच्या वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होऊन तिथे वावरणाऱ्या लोकांच्या मनाला एक मानसिक स्वास्थ्य लाभावे, या हेतूनेच लॅण्डस्केपिंग केले जाते. मग ती जागा एखाद्या इमारतीचे आवार असू शकते किंवा रस्त्याच्या दुतर्फा बाजू, पाण्याची अथवा जमिनीची जागा किंवा छोटेसे अरण्य यांपकी काहीही असू शकते. जागा कोणतीही असो तिला सुशोभित करणे हे लॅण्डस्केप आíकटेक्चरचे काम असते.  
लॅण्डस्केप विषयात प्रावीण्य मिळविण्यासाठी सैद्धान्तिक ज्ञान तसेच प्रत्यक्ष ज्ञान या दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. एखाद्या जागेचे सुशोभिकरण करण्यासाठी नुसतीच कल्पनाशक्ती पुरेशी नाही, तर ती कल्पना प्रत्यक्षात कशा पद्धतीने आणता येईल याचेदेखील नेमके ज्ञान असणे आवश्यक आहे. जसे रुग्णाला बरे करायचे असेल तर डॉक्टरला शरीरशास्त्राचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे ठरते. त्याचप्रमाणे एखाद्या जागेचे देखण्या जागेत रूपांतर करावयाचे असेल तर त्या जागेबाबत म्हणजे त्या जागेची नैसर्गिकस्थिती, तिथे कोणकोणत्या गोष्टी तग धरू शकतील, कोणत्या गोष्टींमुळे त्या जागेला हानी पोहोचेल या सर्व बाबींचे ज्ञान या लॅण्डस्केप आर्किटेक्चरला असणे आवश्यक ठरते. त्यामुळेच हल्ली या प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात विश्लेषण, निर्मितीपूरक लेखन, चित्रांकन, कॉस्टिंग, संवाद आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर, अडचणींवर कशा पद्धतीने मात करावी असे विविध विषय शिकविले जातात. तर काही ठिकाणच्या अभ्यासक्रमात कला, विज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान यांची आवश्यक ती सांगड घालून अभ्यासक्रम शिकवला जातो. जेणेकरून या स्वरूपाचे प्रशिक्षण घेऊन भावी जीवनात व्यवसाय सुरू केल्यास, त्यात अमुक एखाद्या गोष्टीअभावी अडचण निर्माण होऊ नये.
लॅण्डस्केप आर्किटेक्चर या क्षेत्राकडे आज म्हणावे तितके गांभीर्याने पाहिले जात नाही. आजही आपल्या देशातल्या अनेक शहरांमधून हिंडताना अनेक गोष्टी दिसून येतात, जिथे लॅण्डस्केप आर्किटेक्चरदृष्टया नियोजन आणि डिझाइन करणे आवश्यक आहे. जसे नद्यांची रचना, जंगलांसाठी लॅण्डस्केपिंग, अनेक बागांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, इमारती, बंदरे, वाहतूक व्यवस्था अशा हरतऱ्हेच्या गोष्टींना एक नियोजनबद्धता प्राप्त होण्यासाठी लॅण्डस्केप डिझाइनची गरज असते. मात्र, एकूणच सद्यस्थिती पाहता अनेक लॅण्डस्केप आर्किटेक्चरांचा साचेबद्ध काम करण्याकडेच अधिक कल असतो. आम्हाला करण्याजोगी कामे मिळत नाही, अशी त्यांची तक्रार असते. त्यामुळेच अशा नुसत्या तक्रारी करीत राहण्यापेक्षा स्वत:च्या व्यवसायातील संधीकडे वेगळ्या नजरेने पाहिल्यास उत्तम संधींना तोटा नाही. शेवटी संधी मिळत नसतील तर त्या कशा निर्माण करता येईल, याचे पर्याय आपल्याच हातात असतात.

artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Mercury Rise in Scorpio
‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार, बुध ग्रहाच्या कृपेने मिळणार अपार संपत्ती
Loksatta kutuhal The journey of artificial intelligence in India
कुतूहल: भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल
Story img Loader