लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) कडुन असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (AAO) पदासाठी रेजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार licindia.in. या अधिकृत वेबसाईटवर रेजिस्टर करू शकतात. रेजिस्टर करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे.

या पदासाठी रेजिस्टर करण्यासाठी एप्लीकेशन फी ७०० रुपये आहे. तर SC/ST वर्गातील उमेदवारांसाठी ८५ रुपये फी आकारण्यात येईल. ही भरती प्रक्रिया असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (AAO) च्या ३०० रिक्त पदांसाठी केली जात आहे. या परीक्षेनंतर प्रीरिक्रुटमेंट मेडिकल एक्झाम घेतली जाईल.

आणखी वाचा: SBI PO Prelims 2022 निकाल जाहीर; जाणून घ्या कुठे पाहायचा निकाल

या परीक्षेचे हॉल तिकीट प्रिलिमिनरी परीक्षेच्या ७ ते १० दिवस आधी उपलब्ध केले जाईल. प्रिलिमिनरी परीक्षा १७ फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा १८ मार्चला घेतली जाईल. परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय किमान २१ आणि कमाल ३० वर्ष असावे.

Story img Loader