हे जीवन म्हणजे जणू एक खेळ आहे, अशी कल्पना करा. या खेळात तुम्ही आकाशात ५ चेंडू एकामागोमाग एक असे उडवत आहात. तुम्ही त्या चेंडूंना नावे द्या – स्वत:चे काम, स्वत:चे कुटुंब, स्वत:चे आरोग्य किंवा स्वास्थ्य, मित्र व चतन्य आणि हे सर्व चेंडू तुम्ही एकामागोमाग असे आकाशामध्ये उडवत आहात व ते कायम हवेतच राहतील (म्हणजे जमिनीवर खाली पडणार नाहीत) याची काळजी घेत आहात. तुमच्या लगेच लक्षात येईल की, तुमचे नियत काम हे रबरी चेंडूसारखे आहे. रबरी चेंडू तुमच्याकडून खाली पडला की तो उसळी मारून परत वर येईल. तसेच काहीसे कामाच्या बाबतीत म्हणता येईल. पण उरलेले चार चेंडू – कुटुंब, स्वास्थ्य, मित्र व चतन्य हे काचेच्या चेंडूसारखे आहेत. त्यातील एक गोष्ट जरी तुमच्याकडून खाली पडली तर काचेच्या चेंडूप्रमाणे एकतर तिला कायमचा चरा तरी पडेल, नाहीतर तडा तरी जाईल, पोचा येईल, काहीतरी कायमचे नुकसान होईल किंवा अगदी चक्काचूरदेखील होईल. म्हणजे पूर्वीसारखी ती गोष्ट राहणार नाही. तुम्ही ही बाब समजून घ्यायला हवी आणि जीवनात त्यादृष्टीने समतोल राखण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. हे प्रयत्न कशा प्रकारे करता येतील?

इतरांशी तुलना करून तुम्ही स्वत:ची किंमत कधीही कमी करू नका, स्वत:ला कधीही कमी लेखू नका. याचे कारण असे की, आपण सर्वच जण परस्परांपेक्षा वेगळे आहोत व आपल्यातील प्रत्येक जण एक विशेष व्यक्ती आहे.
इतरांच्या मते काय महत्त्वाचे आहे, हे बघून तुम्ही तुमचे ध्येय / उद्दिष्ट ठरवू नका. केवळ तुम्हालाच हे ठाऊक असते की, तुमच्यासाठी सर्वोत्तम असे काय आहे!
तुमच्या हृदयाच्या / मनाच्या अगदी निकट असणाऱ्या गोष्टींना / व्यक्तींना तुम्ही गृहीत धरू नका. तुम्ही तुमच्या जीवनाला जसे घट्ट चिकटून राहता, तसे त्या गोष्टींनाही घट्ट चिकटून राहा. कारण त्यांच्याशिवाय जीवन अर्थशून्य आहे.
भूतकाळात दंग होऊन वा भविष्यकाळात रमून, तुमचे वर्तमानातले जीवन तुमच्या बोटांमधून व्यर्थ ओघळून जाऊ देऊ नका. एकावेळी एक दिवस जगायचा अशा पद्धतीने जीवन जगत तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस
व्यवस्थित जगू शकाल.
तुम्ही कोणतीही गोष्ट तोपर्यंत पूर्णपणे सोडून देऊ नका, जोपर्यंत तुमच्याकडे अजूनही काही तरी असते की, जे तुम्ही देऊ शकता. तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करण्याचे थांबवत नाही, त्या क्षणापर्यंत कोणतीही गोष्ट कधीच संपून जात नाही.
तुम्ही अपूर्ण आहात, ही गोष्ट स्वीकारायला वा मान्य करायला कधीच भिऊ नका. हा नाजूक धागाच आपण सर्वाना एकमेकांशी जोडून ठेवत असतो.
तुम्ही जीवनात जोखीम घ्यायला / धोके पत्करायला कधीच घाबरू नका. अशा संधी घेण्यानेच आपण आपली स्वतंत्र वाट तयार करायला शिकत असतो.
प्रेमभावनेसाठी वेळ काढणे अशक्य आहे, असे सांगत तुमच्या जीवनातून प्रेम-भावनेला हद्दपार करू नका. प्रेम मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे प्रेम देणे हा होय; प्रेम गमावण्याचा सर्वात गतिमान मार्ग म्हणजे त्या प्रेमाला घट्ट धरून ठेवणे हा होय आणि प्रेमाला जपून कायम ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या प्रेमाला पंख प्राप्त करून देणे हा होय.
जीवनात इतक्या वेगाने धावू नका की, ज्यामुळे तुम्हाला तुम्ही कोठे आहात हेही विसरायला होईल; इतकेच नव्हे तर कुठे जायचे आहे हेसुद्धा विसरायला होईल.
कधीही हे विसरू नका की, प्रत्येक व्यक्तीला आपली कदर व्हावी, आपल्या कामाचे कौतुक व्हावे असे वाटत असते. ती त्याची एक भावनिक गरजच असते.
नव्याने काही शिकण्याची भीती बाळगू नका. ज्ञान हे हलके, वजनरहित असे असते. कुठेही बरोबर सहज घेऊन जावे असा तो एक प्रकारचा खजिनाच असतो.
वेळ किंवा शब्द निष्काळजीपणे वा बेफिकिरीने वापरू नका. दोन्हीपकी काहीही परत मिळवता येत नाही.
जीवन म्हणजे आपण निवडलेल्या मार्गावरील प्रत्येक पावलाचा आस्वाद घेत- घेत केलेला प्रवास आहे. कालचा दिवस हा इतिहास असतो. उद्याचा दिवस हा गूढ रहस्यासारखा असतो आणि आजचा दिवस ही देणगी असते. म्हणूनच त्याला आपण ‘प्रेझेंट’ म्हणतो.
   snn1952@gmail.com

Story img Loader