मी एस.वाय बी.कॉम.ला आहे. ते केल्यानंतर करिअरच्या कोणत्या संधी आहेत? मला पुढे एमपीएससीची परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी कोणती पुस्तके वाचणे आवश्यक आहे? – सुजित मुगुडकर सुजित, सध्या वित्तीय क्षेत्र इतक्या झपाटय़ाने वाढत आहे की वाणिज्य शाखेचे उत्तम ज्ञान संपादन केलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला मार्केटमध्ये करिअर संधी मिळू शकते. पण दुर्दैवाने फार कमी विद्यार्थी या शाखेचा अभ्यास समजून उमजून करतात. विद्यापीठीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापलीकडे तीन वर्षे याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

वाणिज्य शाखेला उपयुक्त ठरतील असे काही संगणकीय अभ्यासक्रमसुद्धा आता करता येतात, त्याकडे लक्ष दिले जात नाही, गणिताचा पाया भक्कम करण्याकडेही विशेष लक्ष दिले जात नाही. तू मात्र वेळीच या बाबींकडे लक्ष द्यावेस असे वाटते. एमपीएससीच्या तयारीसाठी दर्जेदार इंग्रजी/ मराठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन, विविध विषयांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी राज्य शिक्षण मंडळ वा एनसीईआरटीच्या १२वीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन हे प्रारंभ करण्यासाठी पुरेसे आहे.

मी यावर्षी १०वीची परीक्षा दिली आहे, पुढे जेईई द्यायची आहे. सीबीएससी की राज्य शिक्षण मंडळ, कोणता पर्याय लाभदायक ठरेल? – विरेन भोसले

विरेन, जेईई परीक्षेला बसण्यासाठी दोन्ही बोर्डाचा अभ्यासक्रम आता जवळपास समान झाला आहे. शिवाय कोणत्या बोर्डाचा अभ्यासक्रम शिकता यापेक्षा तो कसा शिकता हे महत्त्वाचे आहे. राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम केलेले शेकडो विद्यार्थी जेईई मेन आणि अ‍ॅडव्हान्स्ड या परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळे तू कोणतेही बोर्ड निश्चिंतपणे निवडू शकतोस.

मी भौतिकशास्त्रात बीएस्सी केले आहे. मला एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये जायचे आहे. मी काय करावे?

कय्यूम काद्री कय्यूम, तुला एव्हिएशन इंडस्ट्रीत काम करायचे आहे, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. या क्षेत्रात जाण्यासाठी पुढीलप्रमाणे मार्ग आहेत.

(१) ग्राऊंड स्टाफ/ चेक इन/ स्टिवार्ड- यासाठी तू पुणे किंवा मुंबईतील नामांकित संस्थांमधून सहा ते एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम करणे उपयुक्त ठरू शकेल.

(२) एअर क्राफ्ट मेंटेनन्स- यासाठी तू तीन वर्षे कालावधीचा एअर क्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग अथवा बी.एस्सी. एव्हिएशन अभ्यासक्रम शिकू शकतोस.

संकेतस्थळ- http://www.thebombayflyingclub.com/

 

 

Story img Loader