भारतीय वायुसेनेत ‘कमिशण्ड ऑफिसर’ पदांच्या भरतीसाठी एअरफोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) – कोस्रेस जानेवारी २०१८ पासून सुरू होणार.

पात्रता –

(१) फ्लाईंग ब्रँच – कोणत्याही शाखेतील पदवी किमान  ६०%  गुणांसह अभियांत्रिकी पदवी.

वय – २ जानेवारी १९९४ ते ५ जानेवारी १९९८ दरम्यानचा जन्म असावा.

उंची – १६२.५ सें.मी. वेतन – रु. ८२०५०/-

(२) ग्राऊंड डय़ूटी (टेक्निकल) – (अ) अ‍ॅरोनॉटिकल इंजिनीयर (इलेक्ट्रॉनिक्स)

– आयटी/संगणक शास्त्र/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इ. विषयांतील अभियांत्रिकी पदवी, किमान ६०% गुण. (ब) एरॉनॉटिकल इंजिनीयर (मेकॅनिकल) – मेकॅनिकल/इंडस्ट्रियल/एरोस्पेस इ. विषयांतील अभियांत्रिकी पदवी किमान ६०% गुण.

वेतन – रु. ७१,५५०/-.

(३) ग्राऊंड डय़ूटी (नॉन-टेक्निकल) (अ) अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि (ब) लॉजिस्टिक्स – पदवी किंवा एएमआयई किमान ६०% गुण. (क) अकाऊंट्स – वाणिज्य शाखेतील पदवी किमान ६०% गुण. (ड) एज्युकेशन – एमबीए/एमसीए किंवा इंग्रजी/फिजिक्स/गणित/ केमिस्ट्री इ. विषयांतील पदव्युत्तर पदवी किमान  ५०% गुण. शिवाय पदवीला किमान  ६०% गुणांची अट.

वेतन – रु. ६८,५५०/- १ आणि २साठी.

वय – उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९२

ते १ जानेवारी १९९८ दरम्यानचा असावा.

उंची – १५७.५ सें.मी. (पुरुष) आणि १५२ सें.मी. (महिला). पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांतील उमेदवार एएफसीएटीसाठी पात्र आहेत. ऑनलाइन रजिस्ट्रेशन www.careerairforce.nic.in   या संकेतस्थळावर दि. २९ डिसेंबर २०१६ पर्यंत करावे.

 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) सिंगल गर्ल चाईल्ड गुणवत्ता शिष्यवृत्ती.

पात्रता – पालकांचे एकमेव मूल हे मुलगी असावी. (एकाच वेळेला जन्माला आलेली मुले सिंगल गर्ल चाईल्ड म्हणून समजली जातील.) सीबीएसई दहावीची परीक्षा २०१६ मध्ये किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. मुलगी सीबीएसई बोर्डाच्या शाळेत अकरावीला शिकत असावी. जेथे टय़ूशन फी दरमहा रु. १,५००/- पेक्षा जास्त नसावी. दरमहा रु. ५००/- स्कॉलरशिप दोन वर्षांसाठी दिली जाईल.

विस्तृत जाहिरात आणि अर्जाचा नमुना www.cbse.nic.in या संकेतस्थळावर  scholarship या लिंकवर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज दि. १५ डिसेंबर २०१६ पर्यंत करावेत. शाळेच्या प्रिंसिपलकडून अटेस्ट केलेले अर्ज बोर्डाकडे दि. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

 

भारतीय नौदलात बारावी (विज्ञान) उत्तीर्ण उमेदवारांना ऑगस्ट २०१७ पासून सुरू होणाऱ्या पुढील कोस्रेससाठी प्रवेश (१) सेलर्स सेकंडरी रिक्रूट्स (एसएसआर) बॅच नं. ०२/२०१७ (२) सेलर्स आर्टिफसर अ‍ॅप्रेंटिस (एए) (बॅच क्र. १४२)

पात्रता -बारावी (गणित आणि फिजिक्स विषयांसह) आणि (केमिस्ट्री/बायोलॉजी/संगणक शास्त्र या एका विषयासह) उत्तीर्ण. आर्टिफिसर अ‍ॅप्रेंटिससाठी किमान ६०% गुणांची अट लागू.

वय – (उमेदवाराचा जन्म यादरम्यानचा असावा.) एसएसआर-  १ऑगस्ट १९९६ ते ३१ जुल २०००आणि  एए – १ऑगस्ट १९९७ ते ३१ जुल २००० ऑनलाइन अर्ज www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. १९ डिसेंबर २०१६ पर्यंत करावेत. अर्जाची िपट्रआऊट जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर दि. २६ डिसेंबर २०१६पर्यंत साध्या पोस्टाने पोहोचतील असे पाठवावेत. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ३ डिसेंबर २०१६ च्या अंकात पाहावी.

 

इंडियन बँकेत ३२४ प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांच्या भरतीसाठी एक वर्षांचा कोर्स – ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बॅकिंग अ‍ॅण्ड फायनान्स (पीजीडीबीएफ) इंडियन बँक मणिपाल स्कूल ऑफ बँकिंग, बंगलोर येथे प्रवेश.

पात्रता – पदवी किमान ६०% गुण (अजा/अज/विकलांग ५५%  गुण)

वय – दि. १ जुल २०१६ रोजी २० ते ४३ वष्रे

खुला गट.

परीक्षापूर्व प्रशिक्षण – अजा/ अज/अल्पसंख्याक/ विकलांग यांच्यासाठी दिले जाईल. ऑनलाइन अर्ज www.indianbank.co.in या संकेतस्थळावर दि. २२ डिसेंबर २०१६ पर्यंत करावेत.