रेल्वे क्षेत्रात नोकरी शोधणार्या उमेदवारांना आता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक/ वाहतूक नियंत्रक/ आगार नियंत्रक/ ट्रेन ऑपरेटर, वरिष्ठ पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी १४ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यातून पदांसाठी अर्ज करू शकतात. अधिकृत अधिसूचनेनुसार ९६ पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया mahametro.org या अधिकृत वेबसाईटवर सुरू करण्यात आली आहे.
रिक्त पदाचा तपशील
अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – १ पद
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – १ पद
उपमहाव्यवस्थापक – १ पद
सहाय्यक व्यवस्थापक – १ पद
वरिष्ठ स्टेशन नियंत्रक/वाहतूक नियंत्रक/आगार नियंत्रक/ट्रेन ऑपरेटर – २३ पदे
वरिष्ठ विभाग अभियंता – ३ पदे
विभाग अभियंता – १ पद
कनिष्ठ अभियंता – १८ पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ – ४३ पदे
खाते सहाय्यक – ४ पदे
शैक्षणिक पात्रता
अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्णवेळ B.E. / B.Tech पदवी प्राप्त केलेली असावी. सिव्हिल इंजिनीअर पदासाठी अर्ज करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.E. / B.Tech असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहा.
वयोमर्यादा
अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ५३ वर्षे
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक- ४८ वर्षे
उपमहाव्यवस्थापक – ४५ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक – ३५ वर्षे
वरिष्ठ स्टेशन नियंत्रक/वाहतूक नियंत्रक/आगार नियंत्रक/ट्रेन ऑपरेटर- UR- ४० वर्षे, OBC- ४३ वर्षे, SC/ST- ४५ वर्षे
वरिष्ठ विभाग अभियंता- ४० वर्षे
विभाग अभियंता – ४० वर्षे
कनिष्ठ अभियंता – ४० वर्षे
वरिष्ठ तंत्रज्ञ – ४० वर्षे
खाते सहाय्यक – ३२ वर्षे
तसेच उमेदवारांनी वयोमर्यादेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना पहावे.
वेतन तपशील
अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना १,००,००० ते २,६०,००० रुपये वेतनश्रेणी दिली जाणार आहे. वरिष्ठ उप महाव्यवस्थापक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ८०,००० ते २,२०,००० रुपये वेतनश्रेणी दिली जाणार आहे. उपमहाव्यवस्थापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७०,००० ते २,००,००० रुपये वेतनश्रेणी दिली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी १४ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा तारखेच्या आधी ऑनलाइन अर्ज करू शकतात. महा मेट्रो पुणे महानगर वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. दरम्यान अर्जाच्या संपूर्ण कालावधीत कोणत्याही कारणास्तव ऑनलाइन अर्ज सादर करण्यात कोणत्याही नेटवर्क समस्या/व्यत्ययासाठी जबाबदार राहणार नाही.