MSBSHSE 12th Result 2022 Live Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल आज बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. निकालासंदर्भातील सर्व अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra 12th Result 2022 Live Updates: निकालासंदर्भातील सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी .
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९६.३४ टक्के लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभाग तिसऱ्या स्थानी आहे.
मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण १ लाख ५१ हजार २६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ लाख ५० हजार ११० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण १ लाख ४४ हजार ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.३४ इतकी आहे. गेल्या वर्षी बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९९.३७ टक्के लागला होता, पण निकालाच्या टक्केवारीत अमरावती विभागाची घसरण आठव्या स्थानी झाली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या असून अयशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचं मनोबल वाढवलं आहे.
वाणिज्य:
मुली- ९३.०४%
मुलं – ९०.४७%
विज्ञान:
मुली- ९८.५५%
मुले- ९८.१०%
कला:
मुली- ९२.७३%
मुले- ८८.६४%
एचआरएस Voc:
मुली- ९४.१५%
मुले- ९१.८३%
आय.टी.आय.
मुली- ६७'.९२%
मुले- ६६.३२%
यावर्षी एकूण १४४९६६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली, त्यापैकी १४३९७३१ विद्यार्थी बसले आणि १३५६६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.२२ झाली आहे.
जर विद्यार्थी त्यांच्या गुणांवर नाखूष असतील, तर ते त्यांचे वैयक्तिक विषयानुसार गुण पुन्हा मोजू शकतात (गुणांची पडताळणी) किंवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवू शकतात किंवा उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज १० जून नंतर वेबसाइटवर, पडताळणी करू शकतात. mh-hsc.ac.in. या वेबसाईटवर अर्जाचा विहित नमुना उपलब्ध आहे.
बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९६.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर, ९३.२९ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.
maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in या वेबसाईटवर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मार्कशीट उपलब्ध झाले आहे.
अनेक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला बारावी परीक्षेचा निकाल आज १ वाजता जाहीर झाला आहे. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून निकाल ९७.२१ टक्के लागला आहे. राज्यात यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली आहे.
राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत ५.३१ टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल ९९.५३ टक्के लागला होता. २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आसन क्रमांक अर्थात सीट नंबर माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सीट नंबर/रोल नंबर माहित नसेल तर आत्ताच शोधून ठेवा. महाराष्ट्र बोर्ड बारावीचा रोल नंबर/आसन क्रमांक कसा शोधायचा हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वरती पाहू शकता.
नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखातील एकूण १४४९६६४ नियमित विद्यार्थांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४३९७३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३५६६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि निकालाची टक्केवारी ९४.२२ आहे.
पुणे: ९३.६१%
नागपुर: ९६.५२%
औरंगाबाद: ९४.९७%
मुंबई: ९०.९१%
कोल्हापूर: ९६.०७%
अमरावती: ९६.३४ %
नाशिक: ९५.०३%
लातूर: ९५.२५%
कोकण: ९७.२१%
कोकण विभागानंतर नागपूर विभागाचा निकाल हा ९६.५२ टक्के लागला आहे. नागपूर विभागातून एक लाख ६० हजार २८ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील एक लाख ५९ हजार १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यातील १ लाख ५३ हजार ५८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९६.५२ टक्के इतकी आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आज जाहीर झाला असून यामध्ये नागपूर विभागाने यंदा राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.२१ टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९०.९१ टक्के निकाल आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या पुरवणी आणि श्रेणीसुधार परीक्षेचे अर्ज १० जूनपासून भरून घेतले जाणार असल्याचेही प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातर्फे १७ जूनला गुणपत्रिका दिल्या जातील.
विद्यार्थी आणि पालकांना maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येईल, त्याची प्रतही (पिंट्र आऊट ) घेता येईल.
राज्यातील १४ लाख ८५ हजार १९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या परीक्षेबाबतही साशंकता होती. मात्र, यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने यंदा मार्च-एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली.
दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येईल. राज्य मंडळाचे सचिव माणिक बांगर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
निकालासंदर्भातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर वाचू शकता.