सध्या व्यवस्थापन शाखेतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी धामधूम सुरू झाली आहे. व्यवस्थापनातील विविध अभ्यासक्रम करिअर करण्यासाठी उत्तम आहेत. मात्र काही संस्थांचे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने एक पाऊल आघाडीवर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. असे काही अभ्यासक्रम आणि हे अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांचा हा परिचय-
अॅॅग्री बिझिनेस अॅण्ड प्लान्टेशन मॅनेजमेंट
बंगलोर येथे असलेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ प्लान्टेशन मॅनेजमेंट ही संस्था केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था होय. या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट- अॅग्री बिझनेस अॅण्ड प्लान्टेशन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे.
हा निवासी पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. अर्हता- कृषी किंवा फलोद्यान किंवा पशुवैद्यक किंवा फॉरेस्ट्री किंवा सेरिकल्चर या विषयांसह कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण आवश्यक. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिटय़ूूट ऑफ मॅनेजमेन्टमार्फत घेण्यात येणारी कॉमन अॅडमिशन टेस्ट – सीएटी किंवा मॅनेजमेन्ट अॅप्टिटय़ूड टेस्ट – एमएटी, किंवा कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट- सीएमएटी या परीक्षा देऊन योग्य गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. या गुणांचा आधार प्रवेशासाठी घेतला जातो.
या संस्थेकडे अत्याधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा आहेत. उमेदवारांना परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये अनुभवासाठी पाठवले जाते. या संस्थेकडे डिजिटल लँग्वेज आणि कम्युनिकेशन स्किल्स लॅब आहे. संबंधित उद्योगासोबत या संस्थेने सहकार्य केले आहे. कृषी- उद्योग क्षेत्रातील नव्या उदयोन्मुख प्रवाहांशी सुसंगत असा अभ्यासक्रम आहे.
पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ प्लॅन्टेशन मॅनेजमेंट, ज्ञान भारती कॅम्पस, पोस्ट ऑफिस मालाथल्ली, बंगलोर- ५६००५६,
ईमेल- admissions_iipmb@vsnl.net, admissions@iipmb.edu.in
http://www.iipmb.edu.in
बिझनेस डिझाइन, ई-बिझनेस, हेल्थ केअर
वेिलगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट अॅण्ड रिसर्च ही मुंबईस्थित संस्था व्यवस्थापन शाखेतील विविध विषयांमध्ये नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम चालविणारी खासगी संस्था होय. या संस्थेने दोन वर्षे कालावधीचे पुढील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
१. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट इन बिझनेस डिझाइन
२. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट इन ई-बिझनेस
३. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट इन रिटेल मॅनेजमेंट
४. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट इन हेल्थ केअर मॅनेजमेंट
५. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट इन रुरल मॅनेजमेंट.
या सर्व अभ्यासक्रमांना ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेची मान्यता आहे.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट- २०१३, झेवियर अॅप्टिटय़ूड टेस्ट- २०१३, महाराष्ट्र- कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (एमएच-सीईटी)- २०१३, कॉमन मॅनेजमेन्ट अॅडमिशन टेस्ट- २०१४ यापकी कोणत्याही एका परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो.
पत्ता- प्रि. एल. एन. वेिलगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट डेव्हलपमेन्ट अॅण्ड रिसर्च, दादर, मुंबई.
ईमेल- admissions@wellingkar.org
वेबसाइट- http://www.wellingkar.org
मॅनेजमेंट- आय कनेक्ट
इन्स्टिटय़ूट फॉर टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट- आय कनेक्ट हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा नव्या पद्धतीचा अभ्यासक्रम असून सद्यस्थितीतील जागतिक बिझनेस प्रक्रिया आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. अननुभवी प्रशिक्षणार्थी ते अनुभवी कार्पोरट नेतृत्वापर्यंतचा विकास साध्य होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सर्व शैक्षणिक आणि प्रात्यक्षिक कौशल्यांचा समावेश या अभासक्रमामध्ये करण्यात आला आहे. आजच्या स्पर्धात्मक काळात विद्यार्थ्यांला कोणत्याही प्रकारचे आव्हान यशस्वीपणे स्वीकारता येणे शक्य व्हावे, या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील पदवी.
या संस्थेने फार्मा मॅनेजमेंट आणि डिजिटल मीडिया या क्षेत्रातील स्पेशलायझेशन सुरू केले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट- २०१३, झेवियर अॅप्टिटय़ूड टेस्ट २०१३, मॅनजमेन्ट अॅॅप्टिटय़ूड टेस्ट- २०१३२०१३ या परीक्षांमधील गुणांचा आधार घेतला जातो.
हे अभ्यासक्रम बेंगळुरु, चेन्नई, मुंबई, नवी मुंबई, नॉयडा आणि वरंगल येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये शिकवले जातात.
पत्ता- अॅडमिशन ऑफिस १००१, प्लॅटिनम टेक्नो पार्क, वाशी, नवी मुंबई- ४००७०३,
ईमेल- pgdm.admissions@itm.edu education.itm.edu
वेबसाइट- http://www.itm.edu/pgdm
एमबीए इन इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी
सिम्बॉयसिस इन्टरनॅशनल युनिव्हर्सटिीच्या अंतर्गत येणाऱ्या सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अॅण्ड रिसर्चमार्फत मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत सॉफ्टवेअर प्रोसेस मॅनेजमेंट आणि डाटावेअर हाऊस अॅण्ड बिझनेस इंटेलिजन्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.
अर्हता- कोणत्याही शाखेची विषयातील पदवी परीक्षा ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची किमान मर्यादा ४५ टक्के. प्रवेशजागा : ९० विद्यार्थी.
पत्ता- सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अॅण्ड रिसर्च, फर्स्ट फ्लोअर, अतुर सेंटर, मॉडेल कॉलनी, पुणे-१६.
ईमेल- admissions@sicsr.ac.in
वेबसाइट- http://www.sicsr.ac.in
एमबीए इन इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी- बिझनेस मॅनेजमेंट
सिम्बॉयसिस सेंटर फॉर इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वतीने मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी- बिझनेस मॅनेजमेंट) हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत सिस्टिम्स, इन्फम्रेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर सोल्युशन मॅनेजमेंट, इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनजमेंट या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची किमान मर्यादा ४५ टक्के. या अभ्यासक्रमाला १८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. पत्ता- सिम्बॉयसिस सेंटर फॉर इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, प्लॉट क्रमांक १५, फेज वन, िहजेवाडी, पुणे- ५७.
ईमेल- admission@scit.edu
वेबसाइट- http://www.scit.edu
टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट
पुणेस्थित सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट या संस्थेने व्यवस्थापन शाखेतील आधुनिक काळाशी सुसंगत असे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन सप्लाय चेन मॅनेजमेंट, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन फायनान्शिअल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट, मास्टर ऑफ बिझनेस अॅॅडमिनिस्ट्रेशन इन इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन रुरल अॅण्ड अॅग्रिबिझिनेस मॅनेजमेंट, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन इन्फॉम्रेशन मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. पत्ता- स्ट्रीट नंबर- ३४२, चांदनी चौक-पाषाण रोड, बावधन पुणे- २१.
वेबसाइट- http://www.suryadatta.org,
http://www.simmc.org
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट-२०१३, झेवियर अॅप्टिटय़ूड टेस्ट-२०१३, मॅनजमेंट अॅप्टिटय़ूड टेस्ट-२०१३ ,कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट आणि असोसिएशन ऑफ इंडियन मॅनजमेंट स्कूल्स-टेस्ट फॉर मॅनेजमेंट अॅडमिशन (एटीएमए ) या परीक्षांमधील गुणांचा आधार घेतला जातो.
हेल्थ केअर मॅनेजमेंट
टी ए प मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (टीएपीएमआय) या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन हेल्थ केअर मॅनेजमेंट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बँकिंग अॅण्ड बँकिंग फायनान्शियल सíव्हसेस हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन अॅडमिशन टेस्ट- २०१३, झेवियर अॅप्टिटय़ूड टेस्ट-२०१३, मॅनजमेन्ट अॅप्टिटय़ूूड टेस्ट- २०१३ यापकी कोणत्याही परीक्षेमधील गुणांचा आधार घेतला जातो.
अर्ज व माहितीपत्रकाची किंमत- १५०० रुपये. हे माहितीपत्रक अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० जानेवारी २०१४.
पत्ता- प्रेसिडेंट, टीएपीएमआय ट्रस्ट,
मणिपाल- ५७६१०४, कर्नाटक.
वेबसाइट- http://www.tapmi.edu.in
इन्शुरन्स बिझनेस मॅनेजमेंट
बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- १. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन इंटरनॅशनल बिझनेस २.पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन इन्शुरन्स बिझनेस मॅनेजमेंट ३. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन रिटेल मॅनेजमेंट ४. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन सस्टनेबल डेव्हलपमेंट मॅनेजमेंट.
अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ डिसेंबर २०१३, अर्ज ऑनलाइन भरता येतो. हा अर्ज http://www.bimtech.ac.in या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतो. हा अर्ज १०५० रुपयांचा डिमांड ड्रॉफ्टसह संस्थेला पाठवता येतो. हा ड्राफ्ट बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी- न्यू दिल्ली या नावे काढलेला असावा. उमेदवारांची निवड समूह चर्चा, मुलाखत, शैक्षणिक गुणवत्ता, अनुभव याबाबींवर आधारित केली जाते.
पत्ता- प्लॉट क्रमांक ५, नॉलेज पार्क टू, ग्रेटर नॉयडा- २०१३०६, उत्तर प्रदेश.
ईमेल- admission.queries@bimtech.ac.in
वेबसाइट- www. bimtech.ac.in
मीडिया मॅनेजमेंट
लव्हली प्रोफेशन युनिव्हर्सटिीने व्यवस्थापन शाखेतील पुढील वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत- १. मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (ऑनर्स). या अभ्यासक्रमांतर्गत फायनान्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स, इंटरनॅशनल बिझनेस, इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, रिटेल, स्ट्रेटेजी, लॉ, हॉस्पिटल अॅण्ड हेल्थकेअर, एन्टरप्रेन्युरशिप अॅण्ड रिटेल या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. २. मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (इंटरनॅशनल बिझनेस, हॉस्पिटल अॅण्ड हेल्थकेअर, एन्ट्रप्रिन्युरशिप अॅण्ड रिटेल, इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी) ३. मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (वुइथ व्टििनग अरेंजमेंट) ४. मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (वुइथ इंटरनॅशनल एक्झपोजर) ५. मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (टुरिझम मॅनेजमेंट) ६. मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (मीडिया मॅनेजमेंट).
पत्ता- जालंधर- दिल्ली जी. टी. रोड (एन- एच वन), फगवारा- १४४४११, पंजाब.
वेबसाइट- admissions@lup.co.in
वेबसाइट- www. lup.co.in
प्रवेशासाठी अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक किंवा कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या चाळणी परीक्षेत सुयोग्य असे गुण प्राप्त होणे आवश्यक किंवा कॉमन अॅडमिशन टेस्टमध्ये ८० टक्के पर्सेटाइल किंवा जनरल मॅनेजमेंट टेस्टमध्ये ६०० गुण किंवा राज्यस्तरीय मॅनेजमेंट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण.