व्यवस्थापन शिक्षण
प्रतिवर्षी आय.आय.एम.च्या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या एक कोटी रुपयांहून अधिक वेतनाचे वार्षिक पॅकेज मिळाल्यासंदर्भातील बातम्या वाचल्या, की आपणही एम.बी.ए. करावे, असे सर्व विद्याशाखांच्या पदवीधरांना वाटू लागते. वाणिज्य, विज्ञान, कला, अभियांत्रिकीच्या बरोबरीने अलीकडे वैद्यक, औषध निर्माणशास्त्र (बी.फार्म), आर्किटेक्चर, कृषी अशा सर्वच प्रकारच्या पदवीधरांचा व्यवस्थापन पदवीकडे कल दिसून येतो.
व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम अर्थात एम.बी.ए. करताना व्यवसायाचे सर्वागीण ज्ञान मिळते. नेतृत्वक्षमता विकसित होते. बहुश्रुतता, संपर्क कौशल्य, बाजारपेठेचे ज्ञान, वित्तीय समज, उत्तम नेटवìकग अशा अनेक गुणांमुळे व्यवस्थापन पदव्युतर पदवीधारकांना (एम.बी.ए.) भरघोस वेतन तर मिळतेच, त्याचबरोबर पटकन बढतीही मिळते. अगदी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत वेगाने पोहोचता येते. एमबीए पदवीधारकांना स्वत:चा व्यवसाय करण्याच्या संधीसुद्धा उपलब्ध असतात. त्यांना व्यवसाय करण्यासाठी वित्तसाहाय्य आणि मेन्टरिंग सुलभपणे उपलब्ध होते.
गेल्या काही वर्षांत मात्र व्यवस्थापन शिक्षणाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झालेली दिसतात. ‘दि असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM) च्या गतवर्षीच्या (२०१२) अहवालानुसार, २००८ मध्ये जवळजवळ ५८ टक्के एम.बी.ए. ना कॅम्पस प्लेसमेन्ट मिळत होती. पण २०१२ मध्ये मात्र जेमतेम १० टक्के ते १२ टक्के जणांना कॅम्पस प्लेसमेन्ट मिळाली आणि त्यांचे सरासरी वेतन मासिक १० हजार – १५ हजार रु. इतकेच होते. एम.बी.ए. ना मिळणाऱ्या संधी घटल्यामुळे भरभक्कम वेतनाच्या आशेने फीपोटी चार ते पाच लाख रुपये आणि दोन वष्रे खर्ची घालणाऱ्या तरुणाईच्या आणि त्यांच्या पालकवर्गाच्या मनात संशयाचे ढग दाटू लागले आहेत.
विद्यार्थ्यांच्या झालेल्या भ्रमनिरासाचे चित्र एम.बी.ए.च्या रिक्त प्रवेशजागांमध्ये उमटलेले दिसून येते. २००६-२००७ ते २०१२-२०१३ या कालावधीत देशभरातील उपलब्ध एम.बी.ए. प्रवेशजागांची संख्या ९५ हजारांवरून चार लाखांपर्यंत वाढली. मात्र त्यातील एक लाखांहून अधिक प्रवेशजागा रिक्त आहेत. केवळ महाराष्ट्रातच १८ हजार म्हणजेच ५० टक्क्य़ांहून अधिक प्रवेशजागा रिक्त असलेल्या आढळून येते.
व्यवस्थापन शिक्षणाच्या दुरवस्थेचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शिक्षण संस्थातील बजबजपुरी. अनेक एम.बी.ए. शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षकांची संख्या तुटपुंजी आहे. अल्प वेतनावर नेमलेले कंत्राटी शिक्षक, गेल्या वर्षीच उत्तीर्ण झालेल्या अननुभवी पदवीधरांची शिक्षक म्हणून नेमणूक करणे, ‘गेस्ट लेक्चर्स’चा अर्निबध वापर या गैरप्रकारांमुळे प्राध्यापकांचा दर्जा सुमार बनला आहे. चकचकीत इमारती, ए.सी. वर्गखोल्या, गुळगुळीत कागदावरील आकर्षक रंगसंगतीची माहितीपत्रके, वृत्तपत्रांतून मोठाल्या जाहिराती अशा गुणवत्तेसंबंधीच्या खोटय़ा देखाव्यात व्यवस्थापनाचे शिक्षण- प्रशिक्षण मात्र पुरते हरवून गेले आहे.
काही सुविधा दाखवायच्या व एम.बी.ए. कॉलेजचा मलिदा लाटायचा, हा मार्ग शिक्षणसम्राट वापरू लागले आहेत. अनेक शिक्षणसम्राटांना व्यवस्थापन महाविद्यालय हे अल्पभांडवली आणि अल्पावधीत भरघोस लाभ देणारे दुकानच वाटते. या घसरलेल्या दर्जामुळे एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना मात्र व्यवस्थापकाची सोडा, कारकूनाचीसुद्धा नोकरी मिळणे दुरापास्त ठरणार आहे.
संख्यात्मक सूज आलेल्या एम.बी.ए. महाविद्यालयांतून दर्जेदार महाविद्यालय निवडणे आज प्रवेशेच्छू विद्यार्थ्यांना कठीण जाते. मात्र महाविद्यालयांच्या जाहिरातबाजीला वा समुपदेशनाच्या भुलथापांना बळी न पडता प्रवेशेच्छू विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या अमुक एका संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व ते काम करीत असलेल्या कंपन्या यांच्याकडून फीडबॅक घेणे सयुक्तिक ठरेल.
एम.बी.ए. महाविद्यालय निवडताना प्लेसमेन्ट हा महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. एम.बी.ए. पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेन्टची चौकशी करताना केवळ वेतनच नव्हे तर कामाच्या स्वरूपाचीही चौकशी करावी. तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाविद्यालयातील अध्यापकवर्ग. एम.बी.ए.साठी महाविद्यालय निवडताना तिथल्या प्राध्यापकांची संख्या व गुणवत्ता लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच प्रवेश घेतेवेळी इंडस्ट्री इंटरॅक्शन, लोकेशन, ब्रँड हे मुद्देही महत्त्वाचे ठरतात. त्यामुळेच बहुसंख्य विद्यार्थी मुंबई वा पुण्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे पसंत करतात.
आणखी एक महत्त्वाचा मात्र दुर्लक्षित राहिलेला मुद्दा म्हणजे अभ्यासक्रमाची रचना! अनेक एम.बी.ए. महाविद्यालयांना अभ्यासक्रम ठरवण्याची सवलत असते. उपयुक्त व कालसुसंगत अभ्यासक्रम शिकवले गेले तरच विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आंत्रप्रेन्युअरशिप, इनोव्हेशन यासारख्या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे का, की अभ्यासक्रम केवळ घोकंपट्टीला प्रोत्साहन देणारा आहे हा विद्यार्थ्यांच्या एम्प्लॉय-अॅबिलिटीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. अभ्यासक्रमामध्ये सतत बदल होणे अत्यावश्यक असते. जसे नव्या नव्या विषयांचा अंतर्भाव, नव्या केसस्टडीजचा उपयोग. उदा. २००८ च्या वैश्विक समस्येनंतर अर्थशास्त्र शिकवताना अनेक नवे मुद्दे सांगावे लागतात. पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा भारतातच विकसित झालेल्या मॅनेजमेन्ट केस स्टडीज. जसे मुंबईचे डबेवाले समजायला सोपे असते. १९६०च्या दशकात तयार झालेल्या जुनाट संकल्पनांपेक्षा भगवद्गीता, चाणक्य, महाभारत, विदुरनीती अशा अनेक भारतीय तंत्रांनी आजच्या व्यवस्थापनाच्या जगतात प्रवेश केला आहे. छत्रपती शिवरायांचे चरित्र, दासबोध यांतूनही व्यवस्थापनाची तत्त्वे सहजपणे व व्यवस्थित कळतात. अभ्यासक्रम व शिक्षण पद्धती (pedagogy) याचा विद्यार्थ्यांची घडण होण्यामध्ये मोलाचा वाटा असतो.
एमबीए पदवी प्राप्त झालेला विद्यार्थी केवळ नोकरी मिळवण्यासाठी नव्हे तर स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठीसुद्धा सक्षम ठरायला हवा. त्यासाठी अभ्यासक्रमाद्वारे उद्योजकतेचे प्रशिक्षणही मिळणे आवश्यक आहे. व्यवसायाची निवड कशी करावी?, नवी बाजारपेठ कशी जोखावी?, व्यवसाय वाढविण्याच्या स्ट्रॅटेजी काय असू शकतात?, स्पर्धात्मकता कशी टिकवावी?, फॅमिली बिझनेसचे फायदे काय?, एकत्रित येऊन (Collaboration) स्पर्धेला कसे तोंड द्यावे असे अनेक विषय उद्योजकतेमध्ये येतात. त्याचा अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा.
व्यवस्थापन विषयातील संशोधन हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. वित्तीय क्षेत्रात होणाऱ्या उलथापालथी, आर्थिक मंदी यासारख्या समस्यांना उत्तर देणारे नवे मार्ग, मार्केटिंगच्या नव्या संधी, ई-बिझनेस, मोबाईल ट्रान्झ्ॉक्शन यामुळे व्यवसाय जगत बदलत आहे. मनुष्यबळ विकासाच्या (human resource management) क्षेत्रात मानवी मनाचे अनेक पलू समोर येत आहेत. केवळ पसा नव्हे तर समाधान, स्वास्थ्य, काम आणि व्यक्तिगत जीवनाचा समतोल, इनर इंजिनीअरिंग, योग फॉर मोटिव्हेशन असे अनेक फंडे आज पुढे आले आहेत. या व अशा अनेक विषयांवर व्यवसायोपयोगी संशोधन करणे व त्याचा अंतर्भाव अभ्यासक्रमात होणे आवश्यक आहे.
आयआयएम, आयआयटीसारख्या संस्था सोडल्यास बरीचशी व्यवस्थापन महाविद्यालये या बदलत्या वातावरणाची दखल घेण्यात फारच मागे आहेत. महाविद्यालयाची निवड करताना तेथील प्राध्यापकांनी केलेले संशोधन, प्रकाशित झालेले संशोधनपर प्रबंध, कन्सल्टन्सी असायन्मेन्ट याबाबतची माहितीही विद्यार्थ्यांनी आवर्जून अभ्यासावी.
भारतातील प्रत्येक व्यवस्थापन अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था (AICTE) ची मान्यता असणे आवश्यक आहे. आपला अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहे का, ते विद्यार्थ्यांनी जरूर लक्षात घ्यावे. प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयात गरप्रकार आढळल्यास ते ‘एआयटीटीई’ला नक्की कळवावे. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांची फसवणूक टळेल. महाविद्यालयात गरप्रकार होत असतील तर अशा महाविद्यालयांना वेसण घालण्याचे काम ‘एआयसीटीई’ करत असते. उदा. ठाण्यातील पाश्र्वनाथ आणि के.सी. महाविद्यालयांना प्रवेशबंदीचे आदेश ‘एआयसीटीई’ने दिले आहेत. ‘एआयटीटीई’ व तंत्रशिक्षण परिषदेच्या (DTE) च्या वेबसाइट जरूर पाहाव्यात. ज्या विद्यार्थ्यांना नोकरी/ व्यवसाय न सोडता व्यवस्थापन शिक्षण घ्यायचे असेल ते अर्धवेळ अभ्यासक्रमांची निवड करू शकतात. मात्र, अशा अनेक अर्धवेळ अभ्यासक्रमांना रीतसर मान्यता नसते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (CMOU) आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे (IGNOU) एमबीए अभ्यासक्रमही चांगले आहेत. मात्र असे अभ्यासक्रम नोकरीसाठी नव्हे, तर ज्ञानवृद्धीसाठी करावे.
एमबीए शिक्षणाचे चित्र काहीसे धूसर वाटले तरी निराशाजनक मात्र नक्कीच नाही. भारतीय अर्थव्यवस्था जगात तृतीय क्रमांकावर पोहोचत आहे. भारतीय बुद्धिमत्तेला जगभरात मान्यता मिळत आहे. भारतीय व्यवस्थापन तंत्राचा अभ्यास जगातील अग्रगण्य विद्यापीठात होत आहे. अशा पाश्र्वभूमीवर आगामी काळात एमबीएनासुद्धा वाढत्या संधी आहेत. मात्र, आपण योग्य प्रशिक्षण संस्था निवडत आहोत ना, याबाबत व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने जागरूक राहायला हवे.