पदवीनंतर एमबीए करण्याकडे अनेकांचा कल असतो.  व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. व्यवस्थापनाच्या अशा काही अभिनव अभ्यासक्रमांची ओळख..
असा एक क्षण येतो, जेव्हा तुमच्या आयुष्याला महत्त्वाचे वळण मिळते अथवा तुम्हाला ते वळण घ्यावे लागते.. अनेकांच्या आयुष्यात हे महत्त्वाचे वळण म्हणजे पदवी-पदव्युत्तर शिक्षणाची विद्याशाखा निवडण्याचा कालावधी असतो. आज पदवीनंतर एमबीए करण्याकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. त्यातही वाणिज्य आणि अभियांत्रिकी शाखेत शिकलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीनंतर एमबीए करण्याकडे अधिक कल असतो. मात्र, बहुसंख्य विद्यार्थी एमबीएची पारंपरिक विद्याशाखा निवडताना दिसतात, जेणेकरून नोकरीच्या बाजारपेठेत आपले नाणे खणखणीत राहील. खरे तर पारंपरिक विद्याशाखांच्या पलीकडेही एमबीएचे आणखीही काही नवे पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. या स्पेशलाइज्ड एमबीए शाखांची थोडक्यात ओळख करून घेऊयात-

पेट्रोलियम एनर्जी
देहराडून येथील द युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम एनर्जी स्टडीजमध्ये काही अभिनव पद्धतीचे एमबीए अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यांत एमबीए इन ऑइल अ‍ॅण्ड गॅस मॅनेजमेन्ट, एमबीए इन एनर्जी ट्रेडिंग, एमबीए इन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेन्ट, एमबीए इन पोर्ट अ‍ॅण्ड शिपिंग मॅनेजमेन्ट, एमबीए इन इंटरनॅशनल बिझनेस, एमबीए इन बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एमबीए इन पॉवर मॅनेजमेन्ट, एमबीए इन अ‍ॅसेट मॅनेजमेन्ट आणि अ‍ॅव्हिएशन मॅनेजमेन्ट यांसारखे इतर अभ्यासक्रमही या ठिकाणी शिकता येतात. कॅट आणि मॅट या प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर संस्थेतील या दर्जेदार अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. त्याचसोबत या विद्यापीठामध्ये ‘एक्झिक्युटिव्ह एमबीए प्रोग्रॅम’ही उपलब्ध आहेत.
वेबसाइट –  http://www.upes.ac.in

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण

कन्स्ट्रक्शन मॅनेजमेन्ट
द नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेत अ‍ॅडव्हान्स्ड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेन्ट या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. दोन वर्षांचा आणि चार सत्रांत विभागलेला हा अभ्यासक्रम पुणे, गोवा, इंदूर आणि हैदराबाद येथे उपलब्ध आहे. तसेच या संस्थेत प्रोजेक्ट इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेन्टमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम (पुणे) आणि रिअल इस्टेट अ‍ॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेन्टमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम (पुणे)
उपलब्ध आहे.
वेबसाइट- http://www.nicmar.ac.in

इंडस्ट्रियल मॅनेजमेन्ट
मुंबईच्या द नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगतर्फे इंडस्ट्रियल मॅनेजमेन्ट, सेफ्टी अ‍ॅण्ड एन्व्हायरॉन्मेन्टल मॅनेजमेन्ट आणि इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेन्टमधील पदव्युत्तर पदविका हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमांचे प्रवेश कॅट प्रवेश परीक्षेतील मार्क्‍स आणि समूहचर्चा याद्वारे होतील.
वेबसाइट –  http://www.nitie.edu

इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेन्ट
 आयआयआयटीएम- ग्वाल्हेर येथे काही वेगळ्या वाटेचे एमबीए अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
यात एमबीए इन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेन्ट, पब्लिक सव्‍‌र्हिस अ‍ॅण्ड गव्हर्नन्समधील एमबीए आणि नॉन फॉर्मल सेक्टर मॅनेजमेन्टमधील एमबीए अशा वेगळ्या शिक्षणक्रमांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या संस्थेत पाच वर्षांचे एकात्मिक अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. यात बी.टेक्. (माहिती तंत्रज्ञान) आणि एमबीए या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यात व्यापार आणि माहिती-तंत्रज्ञानाचा अभ्यास करून उत्तम बिझनेस व्यवस्थापक कसा तयार होईल, याचे प्रशिक्षण दिले जाते. मार्केटिंग, वित्त, मनुष्यबळ, व्यापारविषयक कामकाजासोबत सप्लाय चेन मॅनेजमेन्ट, एन्टरप्राइज रिसोअर्स प्लानिंग, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेन्ट, आयटी स्ट्रॅटेजी आणि ई-कॉमर्सविषयक प्रशिक्षणाचा या अभ्यासक्रमात समावेश असतो.
संपर्क – http://www.iiitm.ac.in

ई-बिझनेस मॅनेजमेन्ट
पुण्याच्या द इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इ बिझनेस मॅनेजमेन्टमध्ये व्यवस्थापनाचा आगळावेगळा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. या संस्थेत दोन वर्षांचा आणि चार सत्रांत विभागला गेलेला  एमईबीए हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा अभिमत अभ्यासक्रम असून अभ्यासक्रमाची रचना- विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने करण्यात आली आहे.  
वेबसाइट-    http://www.iiebm.com
नमूद केलेल्या या क्षेत्रांचा केवळ देशभरातच नाही तर जगाच्या पाठीवर सर्वत्र होत असलेला विस्तार लक्षात घेता नेहमीच्या रुळलेल्या, पारंपरिक एमबीएच्या विद्याशाखांखेरीज काही वेगळ्या अभ्यासक्रमांच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना या अभिनव  अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. या साऱ्या विषयशाखा चाकोरीबद्ध क्षेत्रांच्या पलीकडे झेपावणाऱ्या आणि नवनव्या करिअरची ओळख करून देणाऱ्या आहेत.