पदवीनंतर एमबीए करण्याकडे अनेकांचा कल असतो. व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. व्यवस्थापनाच्या अशा काही अभिनव अभ्यासक्रमांची ओळख..
असा एक क्षण येतो, जेव्हा तुमच्या आयुष्याला महत्त्वाचे वळण मिळते अथवा तुम्हाला ते वळण घ्यावे लागते.. अनेकांच्या आयुष्यात हे महत्त्वाचे वळण म्हणजे पदवी-पदव्युत्तर शिक्षणाची विद्याशाखा निवडण्याचा कालावधी असतो. आज पदवीनंतर एमबीए करण्याकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. त्यातही वाणिज्य आणि अभियांत्रिकी शाखेत शिकलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीनंतर एमबीए करण्याकडे अधिक कल असतो. मात्र, बहुसंख्य विद्यार्थी एमबीएची पारंपरिक विद्याशाखा निवडताना दिसतात, जेणेकरून नोकरीच्या बाजारपेठेत आपले नाणे खणखणीत राहील. खरे तर पारंपरिक विद्याशाखांच्या पलीकडेही एमबीएचे आणखीही काही नवे पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. या स्पेशलाइज्ड एमबीए शाखांची थोडक्यात ओळख करून घेऊयात-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा