एमबीए अभ्यासक्रमातील वित्तीय व्यवस्थापन या विद्याशाखेचा अभ्यासक्रम, अध्ययन आणि करिअर संधी याची सविस्तर माहिती-

एम.बी.ए.च्या सध्याच्या अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार, द्वितीय वर्षांमध्ये स्पेशलायझेशनची निवड करायची असते. काही विद्यापीठांमधून एक स्पेशलायझेशन तर काही विद्यापीठांमधून दोन स्पेशलायझेशनचे विषय घेता येतात.
स्पेशलायझेशनच्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये वित्तीय व्यवस्थापन हा एक पर्याय उपलब्ध आहे. वित्तीय व्यवस्थापन किंवा फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो व तसेच यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या स्पेशलायझेशनमध्ये समाविष्ट असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांचा आता विचार करू.
वित्तीय व्यवस्थापनाची प्रमुख कार्ये म्हणजे सेवा क्षेत्र व उत्पादन क्षेत्र यामधील कंपन्यांना तसेच इतर व्यावसायिक संस्थांना लागणाऱ्या भांडवलांची गरज ठरवणे आणि त्याप्रमाणे विविध मार्गानी, आवश्यक ते भांडवल योग्य त्या ठिकाणी गुंतवणे, ज्यामुळे संस्थांना अधिकाधिक लाभ मिळेल.
यामध्ये  वित्तीय व्यवस्थापनाचे वेगवेगळे  विभाग म्हणजेच खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन (Working Capital Management), भांडवली खर्चाचे नियोजन व मूल्यमापन (Capital Expenditure Planning & evaluation) तसेच भांडवल उभारणीचे वेगवेगळे मार्ग- उदा. भागविक्री, कर्जरोखे विक्री इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय एखाद्या कंपनीच्या नफा-तोटा पत्रक व ताळेबंद यांचे विश्लेषण कसे करावे तसेच वेगवेगळी पत्रके म्हणजे निधी प्रवाह पत्रक (Funds Flow Statement) व रोख प्रवाह पत्रक (cash flow statement) कसे तयार करावे आणि तयार केल्यावर त्यामधून निष्कर्ष कसे काढावेत या अभ्यासाचाही समावेश होतो.
या सर्व अभ्यासक्रमाला वित्तीय व्यवस्थापनाचा गाभा (core) असे म्हणता येईल. यामध्ये महत्त्वाची बाब अशी की, वित्तीय व्यवस्थापनाचा हा गाभा जास्तीत जास्त पक्का कसा होईल याचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांने करायला हवा.
यापैकी कंपन्यांचा ताळेबंद व नफा-तोटा पत्रक याचे मूल्यमापन करण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या वापरून प्रमुख कंपन्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ताळेबंद व नफा-तोटा पत्रक याचे मूल्यमापन करून पाहायला हवे. याशिवाय अभ्यासक्रमाचा इतर भाग, उदा. खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन (Working Capital Management) आणि इतरही महत्त्वाचे विभाग प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कसे हाताळले जातात, याचाही अभ्यास करायला हवा. यासाठी विषयाच्या मुळापर्यंत जाऊन, फक्त परीक्षेपुरता अभ्यास न करता विषय समजून घेऊन तयारी करणे हेच जास्तीत जास्त फायदेशीर ठरते.
वित्तीय व्यवस्थापनाचा मूलभूत गाभा याव्यतिरिक्त, करिअरसाठी आवश्यक असणारे अनेक विषय या  स्पेशलायझेशनमध्ये समाविष्ट असतात. यामधील प्रमुख विषय पुढीलप्रमाणे आहेत-
१) आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन :  आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपन्यांचे वित्तीय व्यवस्थापन कशा पद्धतीने चालते याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच भारतीय रुपया व इतर देशातील चलन यांचा परस्परसंबंध, रुपयाचे मूल्य कशा पद्धतीने ठरते इ. महत्त्वाच्या विषयांसंबंधीचे ज्ञान असायला हवे. इतर देशांच्या चलनाचे मूल्य आपल्या रुपयाच्या तुलनेत वाढले किंवा कमी झाले तर त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर काय होतो याची माहिती असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय भागबाजारामधे भारतीय कंपन्या कशाप्रकारे भांडवल उभारणी करू शकतात, याचाही समावेश या विषयामध्ये होतो. ग्लोबल डिपॉझिटरी रिसीटस् व अमेरिकन डिपॉझिटरी रिसीटस् यामधील फरक व यांचा वापर करून भारतीय कंपन्यांना भाग भांडवलाची उभारणी करणे कसे शक्य आहे, याची माहिती होते. तसेच थेट परकीय गुंतवणूक हाही विभाग समाविष्ट केला जातो.
२) भारतीय भांडवल बाजार (Indian Capital Market) :
कंपन्यांना भाग-भांडवल सुलभरित्या उभे करता यावे, यासाठी सक्षम भांडवल बाजार असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्या देशातील भांडवल बाजाराची रचना कशा पद्धतीची आहे या भागाचा समावेश या विषयामध्ये होतो. याशिवाय भांडवल बाजाराची नियंत्रक म्हणून सेबीची भूमिका, सेबीने घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, भांडवल बाजारातील इतर घटक, कंपन्यांना भागबाजारामध्ये (Stock Exchange) नोंदणी करण्यासंबंधीचे नियम, मनीमार्केट व कॅपिटल मार्केट यांमधील फरक आदी महत्त्वाचे विषय यामध्ये समाविष्ट केलेले असतात. विद्यार्थ्यांना भांडवल बाजाराची ओळख व्हावी व त्यामधील वेगवेगळ्या घटकांची माहिती व्हावी हा या विषयाचा प्रमुख उद्देश आहे. यामध्येच भारतातील बँकिंग प्रणालीची ओळखसुद्धा विद्यार्थ्यांना होते.
३) मर्चन्ट बँकिंग व फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस : विशेषत: १९९१ नंतर या क्षेत्राचा विस्तार आपल्या देशामध्ये मोठय़ा प्रमाणावर झाला. मर्चन्ट बँकर्सची कामे, उदा. भाग विक्रीमध्ये रजिस्टर म्हणून काम करणे इ.  माहिती या विषयाद्वारे होते. तसेच वेगवेगळ्या वित्तीय सेवा यांची माहिती होते. ट्रेझरी मॅनेजमेंटचाही यामध्ये समावेश होतो.
४) वित्तीयविषयक कायदे : आपल्या देशामधे अनेक कायदे आहेत. यामध्ये वित्तीय क्षेत्राशी संबंधित असलेले प्रमुख कायदे म्हणजे कंपनी कायदा, सेबी कायदे, परकीय चलन व्यवस्थापन कायदा, बँकिंगविषयक कायदे, कामगारविषयक कायदे इ. याव्यतिरिक्त सेबीने घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, कॉर्पोरेट गव्हर्नन्सविषयक तरतुदी यांचाही समावेश होतो.
५) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर : वित्तीय व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना देशातील करप्रणालीची माहिती  होण्यासाठी या विषयाचा समावेश होतो. यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर (Direct & Indirect Tax) कायद्यातील तरतुदींबरोबरच करांचे नियोजन (Tax Planning) व करांचे व्यवस्थापन (Tax management) याचाही समावेश होतो.
६) फायनान्शिअल इंजिनीअरिंग : (Financial Engineering) तुलनात्मकदृष्टय़ा बघितल्यास हा विषय काहीसा नवीन आहे. भांडवल उभारणीसाठी नवनवीन इंस्ट्रुमेन्टस्चा वापर कसा करावा, हा महत्त्वाचा भाग या विषयामध्ये समाविष्ट होतो. याचबरोबर डेरिव्हेटिव्हज्, फ्युचर्स व ऑप्शन्स यांचाही समावेश होतो.
    ६) जोखमीचे व्यवस्थापन : (Risk Management) – आजकालच्या अनिश्चित परिस्थितीमध्ये रिस्क मॅनेजमेंट हे अतिशय महत्त्वाचे ठरते. कोणत्याही व्यवसायामध्ये धोका पूर्णपणे टाळता येत नाही, पण त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यापासून होणारा तोटा कमी करता येतो. यामध्येसुद्धा रिस्क मॅनेजमेंटची वेगवेगळी तंत्रे, उदा. फ्युचर्स व ऑप्शन्स इत्यादींचा समावेश होतो.
याशिवाय वित्तीय व्यवस्थापनामध्ये अलीकडेच समाविष्ट केलेला मानसशास्त्राचा भाग- ज्याला Behavioral Finance म्हटले जाते, याचेही महत्त्व वाढले आहे. आपण करीत असलेल्या गुंतवणुकीवर मानसशास्त्राचा प्रभाव हा कशाप्रकारे असतो याचा अभ्यास या विषयात केला जातो.
वित्तीय व्यवस्थापन घेणाऱ्या व घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वरील विषयांचा सखोल अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. तसेच प्रत्येक विषयाचे व्यवहारामधे application कसे होते, हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. याशिवाय एम.बी.ए. करताना काही सर्टिफिकेशन्स उदा. अ‍ॅम्फी (AMFI), स्टॉक एक्सेंजतर्फे चालवले जाणारे अभ्यासक्रम, वेल्थ मॅनेजमेंट संबंधीचे अभ्यासक्रम केल्यास त्याचा उपयोग होतो.
वित्तीय व्यवस्थापन घेऊन एम.बी.ए. झाल्यानंतर, औद्योगिक क्षेत्र व सेवा क्षेत्र तसेच बँका, सरकारी व निमसरकारी संस्था यांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग आहेच. मात्र या सर्व संधींचा फायदा घेण्यासाठी विषयाची सखोल तयारी करणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा परीक्षेच्या आदल्या दिवशी गाइड वाचून अभ्यास करणे व परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे आपल्याच हाताने आपले नुकसान करून घेणे. म्हणूनच असा मार्ग सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनीवाचक टाळतील, अशी आशा करू या.              

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?