मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ उप मुख्य लेखा अधिकारी, सल्लागार, मटेरियल मॅनेजर, वरिष्ठ उप मुख्य वैद्यकीय अधिकारी, आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा, वरिष्ठ उप सचिव या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना http://www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती बोर्ड , मुंबई ने सप्टेंबर २०२१ च्या जाहिरातीत एकूण १६ हून अधिक रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख पदानुसार ३० सप्टेंबर आणि ९ ,२२, २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
या पदांसाठी होणार भरती
वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी, सल्लागार, साहित्य व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी, आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा, वरिष्ठ उपसचिव या पदांसाठी भरती होणार आहे.
पात्रता काय ?
लक्षात घ्या संबंधित पदानुसार शिक्षणा आणि अनुभव आवश्यक आहे.
पगार किती?
पदानुसार ३२,९०० ते २,६०,००० रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळेल.
या पदभरतीसाठी ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी http://onlinevacancy.shipmin.nic.in/ या लिंकवर जा.