तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रातील प्रगती आणि यश यांची श्रेणी ठरविण्यासाठी तुम्ही वापरू शकाल, असं एकक निश्चित करा. त्याचा दररोज वापर करा.
तुमच्या उत्पन्नावर परिणाम करणारे तुमच्या कामातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र ठरवा आणि तुमच्या त्या क्षेत्रातील दैनंदिन कामाचे मोजमाप करा.
बचत आणि गुंतवणुकीसाठी किमान विशिष्ट रक्कम ठरवा आणि ती रक्कम बाजूला ठेवण्याची शिस्त लावा.
प्रत्येक मोठे ध्येय मोजता येईल. नियंत्रित करता येतील अशा भागात विभाजित करा आणि प्रत्येक भाग अशा कालमर्यादेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा.
प्रत्येक ध्येयासाठी बेंचमार्क, एकक, प्रगतिपुस्तक, लक्ष्य आणि कालमर्यादा ठरवणे हा स्वत:शी खेळता येईल असा खेळ हवा आणि त्यानंतर त्या संख्या आणि तारखांवर लक्ष केंद्रित करा. ध्येये स्वत:ची काळजी स्वत: घेतील.
मोठय़ा ध्येयाचा दररोज कमीतकमी एक विशिष्ट भाग प्राप्त करण्याचा संकल्प करा आणि एकही दिवस चुकवू नका.
जे मोजले जाते ते केले जाते, अशी एक म्हण आहे. जर तुम्ही मोजू शकत नसाल तर तुम्ही त्याचे व्यवस्थापन करू शकत नाही, अशी आणखी एक म्हण आहे. ध्येयाचे मोजमाप ठेवण्यासाठी तुम्ही अचूक नोंदी ठेवा आणि त्यामुळे तुमचं तुमच्या कामगिरीवरही लक्ष राहील.
त्यामुळे आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रातील तुमच्या कामगिरीचे काळजीपूर्वक विश्लेषण करा आणि त्या क्षेत्रात कुठवर यश मिळवायचे आहे, ते निश्चित करा. म्हणजे ते ध्येय साध्य करण्यासाठी तुमचे लक्ष केंद्रित होईल आणि तुमच्या हातून उत्तम कामगिरी घडेल.
‘गोल्स’ – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन, पृष्ठे २५६, किंमत – २२५ रु.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा