Ministry of Defence Recruitment 2022: ट्रान्झिट कॅम्प / मूव्हमेंट कंट्रोल ग्रुप / मूव्हमेंट कंट्रोल / मूव्हमेंट फॉरवर्डिंग डिटेचमेंट्सने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध गट सी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसांच्या आत सिव्हिलियन ग्रुप सी भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भरतीचे तपशील
अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे एकूण ४१ रिक्त पदांची भरती केली जाईल. त्यामध्ये सफाई कर्मचारी १० पदे, वॉशर मॅन ३ पदे, मेस वेटर ६ पदे, मसालची २ पदे, कुक १६ पदे, हाऊस किपर २ पदे आणि न्हावी २ पदे समाविष्ट आहेत. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे केली जाईल.
(हे ही वाचा: IOCL Recruitment 2022: ५७० पदांसाठी भरती! अर्ज प्रक्रिया जाणून घ्या)
पात्रता काय?
या गट क पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय या पदांसाठी भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता असेल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
(हे ही वाचा: BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दलातील ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, दहावी पासही करू शकतात अर्ज)
अर्ज कसा करायचा?
सर्व पात्र उमेदवार ट्रान्झिट कॅम्प ग्राउंड सी भरती २०२२ साठी विहित नमुन्यात त्यांचे अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रे विहित वेळेत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. याशिवाय मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MIRC) अहमदनगर, महाराष्ट्र यांनी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या प्रक्रियेद्वारे, गट क च्या ४५ रिक्त पदांची भरती केली जाईल. सर्व इच्छुक उमेदवार HQ MIRC भरती २०२२ साठी १२ फेब्रुवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.