राज्य सरकारच्या उच्च-शिक्षण विभागातर्फे राज्यातील अल्पसंख्याक अशा मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारशी व जैन समुदायांमधील विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षेनंतरच्या विविध शिक्षणक्रमांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येतात. त्याकरता अर्हताप्राप्त  विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-शिष्यवृत्तीचा तपशील : या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी ते पीएच.डी.पर्यंतच्या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाईल.
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी नमूद केलेल्या अल्पसंख्याक वर्गातील असावेत आणि त्यांची अर्हता खालीलप्रमाणे असावी-
अर्जदार महाराष्ट्र राज्याचे निवासी असावेत.

त्यांनी आधीच्या वर्षांची परीक्षा किमान

५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

ते इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत.

नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरच्या वर्गात प्रवेश घेतलेला असावा.

अधिक माहिती : शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत राज्य सरकारच्या उच्चशिक्षण विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेली  या संदर्भातील जाहिरात पाहावी. उच्चशिक्षण विभागाच्या http://www.scholarships.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत : नव्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असल्यास तो संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर
१५ सप्टेंबर २०१५ पर्यंत करावा. सध्या या शिष्यवृत्तीचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्तींचे संगणकीय पद्धतीने नुतनीकरण
१० ऑक्टोबर २०१५ पर्यंत करावे.