MMRCL Recruitment 2022: अभियांत्रिकी क्षेत्रात सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) ने असिस्टंट जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी इंजिनीअरसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. जे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहेत ते MMRCL च्या अधिकृत वेबसाइट mmrcl.com वर जाऊन अर्ज करू शकतात.
भरतीचा तपशील
सहाय्यक महाव्यवस्थापक – ५
सहाय्यक व्यवस्थापक – २
उपव्यवस्थापक – २
कनिष्ठ पर्यवेक्षक – १
कनिष्ठ अभियंता- १६
असिस्टंट (आयटी) – १
‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) ने जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रसिद्ध झाली आहे. MMRCL ने १५ एप्रिल २०२२ पर्यंत भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावेत.
निवडप्रक्रिया कशी असेल?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतील त्यांना प्रथम शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यासाठी त्यांची पात्रता आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव विचारात घेतला जाईल.
अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mmrcl.com ला भेट द्या.
आता होम पेजवर दिसणार्या करिअर्स टॅबवर क्लिक करा आणि रिक्रुटमेंट पेजवर जा.
आता संबंधित भरतीच्या लिंकवर जा आणि Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
आता अर्ज भरा आणि आवश्यक माहिती भरा.
अर्ज डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.
सरकारी विभागात काम करणाऱ्या अर्जदारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात MMRCL महाव्यवस्थापकांच्या अधिकृत पोस्टल पत्त्यावर पाठवावे. त्यासाठी पत्ता ‘ उपमहाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन ३ ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१’