upscमध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून आणल्या आणि नवमूल्यावर आधारित नव्या समाजव्यवस्थेची, राज्यव्यवस्थेची व अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. सामंतशाही व्यवस्थेचा ऱ्हास, प्रबोधन, वैज्ञानिक व भौगोलिक शोध, राष्ट्र-राज्यांचा उदय या घटकांमुळे मध्ययुगीन कालखंडावर पडदा पडतो व आधुनिक कालखंडाची पहाट होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा ‘आधुनिक जगाचा इतिहास’ या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.
अठराव्या शतकातील घटनांची पाश्र्वभूमी ठरलेले प्रबोधन, अमेरिकन राज्यक्रांती (१७७६), फ्रेंच राज्यक्रांती (१७८९), नेपोलियनचा उदय व अस्त, औद्योगिक क्रांती या घटकांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. या घटनांमागील कार्यकारणभाव, महत्त्वाचे विचारप्रवाह व या घटनांचा परिणाम नि परस्परसंबंध या अंगांचे आकलन आवश्यक आहे. ‘व्यापारवादाने प्रेरित’ अमेरिकन राज्यक्रांतीवरील प्रश्न या विवेचनाला अधोरेखित करतो. फ्रेंच राज्यक्रांतीला अमेरिकन राज्यक्रांतीची पाश्र्वभूमी, तत्त्वज्ञांचे योगदान, राज्यक्रांतीद्वारे उद्घोषित मूल्ये, तिचे यशापयश व जागतिक प्रवाहावरील परिणाम यांचे आकलन आवश्यक ठरते.
औद्योगिक क्रांती, तिचे मानवी जीवनावरील राजकीय, सामाजिक, आíथक परिणाम, वसाहतवाद, जपानचे औद्योगिकीकरण व आशियाई सत्ता म्हणून उदय, युरोपिअन राष्ट्रांमध्ये वसाहतीसाठी तीव्र स्पर्धा ही १९ व्या शतकाची महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. वसाहतींसाठीच्या स्पध्रेतून तसेच अनेक प्रादेशिक कारणांतून युरोपिअन राष्ट्रांमध्ये आघाडय़ांचे/ युतीचे राजकारण, गुप्त करार, यातून निर्मित परस्पर विश्वासार्हतेचा अभाव यामुळे युरोपमध्ये राजकीय अस्थर्याचे वातावरण तयार झाले. वसाहतींसाठीची स्पर्धा, राजकीय अस्थर्य व राजनयाचे अपयश यांची परिणती पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये (१९१४-१९१८) झाली. या महायुद्धातील संहारामुळे अशी युद्धे भविष्यात टाळण्याची व शांतता टिकवून ठेवण्याची भाषा बोलली गेली. ‘लीग ऑफ नेशन्स’ची निर्मिती व त्याद्वारे शांतता टिकविण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु, राष्ट्रीय हितसंबंधांवर कोणत्याही राष्ट्राने तडजोड केली नाही. व्हर्सायच्या करारातून जर्मनीवर अपमानास्पद व जाचक अटी लादल्या गेल्या. १९२९च्या आíथक महामंदीमुळे जर्मनीची परिस्थिती बिकट झाली. जर्मनीचा राष्ट्रवाद व नव्या आशा-आकाक्षांचे स्वप्न यावर आधारित हिटलर व नाझीवादाचा उदय झाला व दुसऱ्या जागतिक महायुद्धाची बीजे पेरली गेली.

दुसऱ्या जागतिक महायुद्धात (१९३९-१९४५) प्रथमच अण्वस्त्रांचा वापर झाला व मानवी इतिहासातील सर्वात मोठा संहार झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली या महासत्तांचा अस्त झाला व अमेरिका, सोवियत युनियन या दोन महासत्तांचा उदय बघायला मिळाला.
१९४५ पासून १९९० पर्यंतचा काळ ‘शीतयुद्धाचा’ काळ म्हणून ओळखला जातो. या दोन महासत्तांच्या राजकीय विचारप्रणाली भिन्न होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर सोवियत युनियनच्या प्रभावाखालील पूर्व युरोपमध्ये साम्यवादी व्यवस्था, तर अमेरिकेच्या प्रभावाखालील पश्चिम युरोपमध्ये भांडवलवादी व्यवस्था प्रस्थापित झाली. जर्मनीची दोन भागांत विभागणी झाली. पूर्व जर्मनीमध्ये साम्यवाद व पश्चिम जर्मनीमध्ये भांडवलवाद प्रस्थापित झाला. या काळात जागतिक राजकारणात प्रचंड तणाव निर्माण झाला होता, युद्धसदृश परिस्थिती अनेक वेळा निर्माण झाली, पण प्रत्यक्ष युद्धाचा भडका उडाला नाही, म्हणूनच याला ‘शीतयुद्ध’ म्हणतात. ‘बíलनची िभत’ या शीतयुद्धाचे प्रतीक मानता येईल. शीतयुद्धातील दोन्ही गटांनी (अमेरिकाप्रणीत भांडवलवादी गट व सोवियत युनियनप्रणीत साम्यवादी गट) आपले प्रभाव क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न केले. निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला महायुद्धांच्या पूर्वीच सुरुवात झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर या प्रक्रियेला वेग प्राप्त झाला आणि आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेत अनेक स्वतंत्र राष्ट्र-राज्यांचा उदय झाला. या राष्ट्र-राज्यांना आपल्या गटात सामील करून घेण्याची स्पर्धा निर्माण झाली.
नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांसमोर दारिद्रय़ाचे, मागासलेपणाचे, बेरोजगारीचे प्रश्न होते, विकासाचे आव्हान होते. अशा परिस्थितीमध्ये शीतयुद्धाच्या स्पध्रेत सामील होणे योग्य नाही असा विचार करणाऱ्या इजिप्तचे नासेर, युगोस्लाव्हियाचे टिटो, इंडोनेशियाचे सुहार्तो व भारताचे नेहरू या नेत्यांनी अलिप्ततावादी धोरण स्वीकारले. यातून अलिप्ततावादी चळवळीचा जन्म झाला. या चळवळीने शीतयुद्धाच्या कोणत्याही गटात सामील न होता शीतयुद्धाचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
प्रभावक्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नातून महासत्तांवर निर्माण झालेला आíथक ताण, विशेषत: सोवियत युनियनचे आíथक संकट, पूर्व व पश्चिम युरोपमधील विकासातील व स्वातंत्र्यविषयक विरोधाभास, सोवियत युनियनचे प्रमुख मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीयवादाचा संदेश देणारा नवराजकीय विचार, गोर्बाचेव्ह यांचे सोवियतअंतर्गत उदारमतवादी धोरण, सोवियत युनियनचे विघटन, बíलन िभतीचा पाडाव यातून शीतयुद्धाचा अंत होतो व जग एकध्रुवीय होते. शीतयुद्धोत्तर १९९० च्या दशकात अमेरिकेची मक्तेदारी प्रस्थापित होते. तसेच या काळात जागतिकीकरणाचे, उदारीकरणाचे वारे वाहू लागतात. ९/११ च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याने सर्व संदर्भ बदलतात. अमेरिकेचे इराकवरील आक्रमण, अफगाणिस्तानातील हस्तक्षेप, जागतिक मंदी (२००७-२००८), चीन, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांचा जागतिक सत्ता म्हणून उदय यामुळे आजचे जग बहुध्रुवीय झाले आहे.
विसाव्या शतकातील वरील मुख्य धाग्याव्यतिरिक्त रशियामधील बोल्शेविक क्रांती ‘लीग ऑफ नेशन्स’चे अपयश, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना व यशापयश, चीनची क्रांती, जपानचा आíथक महासत्ता म्हणून उदय, नवीन आंतरराष्ट्रीय संघटना (नाटो, वर्साव पॅक्ट, युरोपियन संघ, आसियान, जागतिक बँक, नाणेनिधी संघटना (IMF), जागतिक व्यापार संघटना (WTO) इत्यादी.. यांचा अभ्यास आवश्यक ठरतो. याव्यतिरिक्त महत्त्वाचे करार (व्हर्सायचा करार, अटलांटिक चार्टर इ.) महत्त्वाचे सिद्धांत (Truman Doctrine) व अठरावे शतक, १८९० ते पहिले महायुद्ध, दोन महायुद्धांमधील काळ, शीतयुद्धाचा काळ, या काळामधील वेगवेगळ्या खंडांतील महत्त्वाच्या घटना यांचा अभ्यास आवश्यक ठरतो. जागतिक इतिहासाच्या प्रवाहातील एक महत्त्वाचा व त्या प्रवाहावर प्रभाव टाकणारा घटक म्हणून राजकीय विचारप्रणालींचा अभ्यास महत्त्वाचा आहे. उदारमतवाद, समाजवाद, साम्यवाद यांसारख्या राजकीय विचारप्रणालींचा आवश्यक अभ्यास व त्यांचा जागतिक इतिहासावरील परिणाम असा अभ्यासाचा रोख असावा.
आपल्या इतिहासावरील लेखमालेचा हा शेवटचा लेख. आयोगाच्या परीक्षेतील ‘इतिहास’ या घटकाबाबत व त्यावरील प्रश्नांबाबत अनेक गरसमज आढळतात. मागच्या आठवडय़ात पार पडलेल्या मुख्य परीक्षेतील व यापूर्वी विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर नजर टाकली असता प्रश्नांचे स्वरूप स्पष्ट होते. या प्रश्नांमध्ये बहुशाखीय आकलन व त्यावर तयार केलेले विचार महत्त्वाचे ठरतात. इतर विषयांतील संकल्पनांचे आकलन व इतिहास समजावून घेतानाचे त्यांचे उपयोजन अत्यंत आवश्यक ठरते.
या लेखमालेमध्ये याचा वारंवार उल्लेख केला गेला. या वर्षीची मुख्य परीक्षा या दृष्टिकोनाला अधोरेखित करते.          
admin@theuniqueacademy.com

Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
Story img Loader