यूपीएससीने २०१३ च्या मुख्य परीक्षेपासून आधुनिक जगाचा इतिहास (१८ व्या शतकापासून ते समकालीन घटनापर्यंत) या पूर्णपणे नव्या घटकाचा समावेश ‘सामान्य अध्ययन पेपर १’ मध्ये केलेला आहे. यावर्षीच्या मुख्य परीक्षेत या घटकावर ४ प्रश्न (४० गुण) विचारण्यात आलेले होते.
प्रश्नांचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन
या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे व्यवस्थित आकलन केल्यास असे दिसून येते की, हे प्रश्न स्वतंत्र्य अशा चार घटनांवर विचारण्यात आलेले आहेत. अमेरिकी राज्यक्रांती, जपानमधील औद्योगिक क्रांती, युरोपीय देशांची आफ्रिका खंडातील साम्राज्यवादी स्पर्धा आणि आíथक महामंदी. यातील जपानमधील औद्योगिक क्रांती आणि आफ्रिका खंडातील साम्राज्यवादाची स्पर्धा हे प्रश्न विद्यार्थ्यांच्या विषयाच्या आकलन क्षमतेची कसोटी पाहणारे होते. कारण उत्तरात जपानमधील औद्योगिकीकरणाची प्रक्रिया कशा प्रकारे घडून आली होती यासह पाश्चात्त्य जगतातील औद्योगिक क्रांती आणि जपानमधील औद्योगिक क्रांतीमधील भिन्नतेचे घटक विश्लेषणात्मक पद्धतीने अधोरेखित करायचे होते. पण शब्द मर्यादाही आखून दिल्यामुळे उत्तरामध्ये नेमकेपणा साधणे क्रमप्राप्त होते. पाश्चिमात्त्यांमध्ये घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीला प्रबोधनाची (Renaissance & Enlightenment) पाश्र्वभूमी होती. तर जपानमधील औद्योगिकीकरण हे पाश्चिमात्याचे अनुकरण होते. त्याला मेइजी पुनस्र्थापनेनंतर (१८६६)(Meiji Restoration) चालना मिळाली.
युरोपमध्ये घडून आलेल्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर युरोपमध्ये राष्ट्रवादाचा उदय झालेला दिसतो. १९ व्या शतकाच्या मध्यानंतर इटली आणि जर्मनी या दोन नवीन राष्ट्रांचा उदय झाला होता. १८८४-८५ साली झालेल्या बíलन परिषदेनंतर पुढील अवघ्या ३० वर्षांत युरोपीय देशांच्या (इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम इ.) साम्राज्यवादामुळे संपूर्ण आफ्रिका खंडाची विभागणी छोटय़ा छोटय़ा राज्यांत घडून आलेली होती. या प्रक्रियेला ‘Scramble for Africal’ असे संबोधले जाते. थोडक्यात वरील दोन प्रश्न सोडविताना उपरोक्त दिलेल्या माहितीचा उत्तरात संदर्भ देणे अपेक्षित होते.
अमेरिकन राज्यक्रांती आणि आíथक महामंदी हे दोन प्रश्न संकीर्ण माहितीच्या आधारे लिहायचे होते. नेव्हीगेशन अॅक्टस्मुळे अमेरिकन वसाहतीवर घडून आलेले आíथक परिणाम स्पष्ट करून अमेरिकन राज्यक्रांतीची कारणमीमांसा करणे अपेक्षित होते. तसेच आíथक महामंदीची पाश्र्वभूमी काय होती आणि यासाठी केलेल्या उपाययोजना वस्तुनिष्ठ पद्धतीने उत्तरात लिहिणे क्रमप्राप्त होते. अर्थात न्यू डील (New Deal)सारखे उपाय इ. उत्तरात नमूद करणे महत्त्वाचे होते.
उपरोक्त प्रश्न व त्यांचे विश्लेषण केल्यानंतर अभ्यासाच्या दृष्टीने जगाच्या आधुनिक इतिहासाची विभागणी पुढीलप्रमाणे करता येऊ शकते.
* प्रबोधन युग
* राजकीय क्रांत्या व चळवळी : अमेरिकी, फेंच, लॅटिन अमेरिकी, १९ व्या शतकातील युरोपमधील क्रांत्या; विसाव्या शतकातील रशियन, चिनी क्रांती आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ इत्यादी.
* औद्योगिक क्रांती व परिणाम
* राजकीय तत्त्वज्ञान-भांडवलशाही, समाजवाद आणि साम्यवाद इत्यादी.
* वसाहतवाद आणि साम्राज्यवाद
* १९ व्या शतकातील जागतिक घडामोडी – व्हिएन्ना काँग्रेस, कर्न्सट ऑफ युरोप, इटली आणि जर्मनीचे एकीकरण, अतिपूर्वेकडे – आधुनिक जपानचा उदय, चीनमधील युद्धे व करार, युरोपमधील पूर्वेचा प्रश्न, याचबरोबर युरोपमधील विविध देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी केलेल्या युती वा आघाडय़ा (Alliances) उदा.- Holi Alliance, Tripple Alliance, Tripple Entente इत्यादी.
* पहिले महायुद्ध व परिणाम, १९१९-१९३८ या कालखंडातील घटना. उदा.- लीग ऑफ नेशन्स्, जागतिक-आíथक महामंदी युरोपमधील र्सवकषशाहीचा उदय – फॅसिझम आणि नाझीवाद इत्यादी.
* दुसरे महायुद्ध व परिणाम, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना, वसाहती मुक्तीची प्रक्रिया.
* शीतयुद्ध व संबंधित मुख्य घटना, अलिप्त राष्ट्र चळवळ, मध्य आशियातील घडामोडी, आफ्रिकेतील वंशवादी राजवट व त्याविरोधी लढा इत्यादी.
उपरोक्त पद्धतीने वर्गीकरण करून एकेका प्रकरणावर सखोल तयारी करणे सुलभ ठरेल. या घटकावर अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. सुरुवातीला एनसीईआरटीची शालेय पुस्तके पायाभूत ठरतात. त्यानंतर व्ही. डी. महाजन, नॉर्मन लोव्ह, जैन आणि माथुर, अर्जुन देव, कॅलव्होकॅरसी यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींची आधुनिक जगाच्या इतिहासावर लिहिलेली पुस्तके उपयुक्त ठरतात. घटकातील विविध घटना व त्यांची पाश्र्वभूमी, संबंधित व्यक्ती, करार, परिषदा इ. संकीर्ण माहितीच्या स्वरूपात नोटस् तयार करून याची विश्लेषणात्मक पद्धतीने उत्तर लिहिण्याच्या सरावाची सांगड घालता येऊ शकते. थोडक्यात २०१३ च्या मुख्य परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे या घटकाचे आकलन करून स्वत:ची अभ्यासपद्धती तयार करता येऊ शकते. उत्तर लिहिण्यासाठी शब्द मर्यादा आखून दिल्यामुळे या विषयाचे व्यवस्थित आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या आकलनावर भर दिला गेला पाहिजे.
admin@theuniqueacademy.co
आधुनिक जगाचा इतिहास
यूपीएससीने २०१३ च्या मुख्य परीक्षेपासून आधुनिक जगाचा इतिहास (१८ व्या शतकापासून ते समकालीन घटनापर्यंत) या पूर्णपणे नव्या घटकाचा समावेश ‘सामान्य अध्ययन पेपर १’ मध्ये केलेला आहे.
आणखी वाचा
First published on: 10-02-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modern world history