स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या प्रिय मित्रांनो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो परीक्षेचा दिवस जवळ आला आहे. आपण यश मिळविण्यासाठी वर्षभर जीवापाड मेहनत केली आहे. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, वेळेचे अचूक नियोजन करा. कारण परीक्षेचे ते चार तासच तुमचे यश किंवा अपयश ठरविणार आहेत. परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा !
चालू घडामोडी हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचा आवाकादेखील फारच मोठा आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी काही महत्त्वाचे िबदू आपणासाठी देत आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी
० भारत-बांगलादेश करार – २४ जानेवारी २०१३ रोजी भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सुधारित व्हिसा करार आणि प्रत्यार्पण करार संमत करण्यात आला. या करारावर भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार िशदे व बांगलादेशचे गृहमंत्री एन. के. आलमगीर यांनी ढाका येथे स्वाक्षऱ्या केल्या. प्रत्यार्पण करारामुळे गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही देशाच्या सुरक्षा संस्थांना मदत मिळेल. त्याचप्रमाणे सुधारित व्हिसा करारात पंचवार्षकि बहुप्रवेश व्हिसा देण्यासंबंधी तरतूद आहे. तसेच पर्यटन व्हिसा व आरोग्य चिकित्सा व्हिसा याबाबत उदार दृष्टिकोन अंगीकारण्यात आला आहे.
० ग्वादार बंदर – पाकिस्तानातील ग्वादार बंदर चीनने विकसित केले आहे. या बंदरात चीन नाविक तळ उभारत आहे. तसेच या बंदराच्या विकासामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून रोज लाखो बॅरल खनिज तेलाच्या वाहतुकीवर चीनचे अप्रत्यक्ष नियंत्रण राहू शकेल.
० मोहम्मद मोर्सी – इजिप्तचे अध्यक्ष, मोहम्मद मोर्सी यांनी प्रमाणापेक्षा जास्त अधिकार ताब्यात घेतल्याने त्यांच्या विरोधात कैरो शहरात आंदोलन करण्यात आले.
० भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचक् आणि त्यांची राणी जेत्सूम पेमा हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे होते.
० अमेरिकेतील सॅण्डी वादळानंतर फिलिपाइन्स येथे बोफा या वादळाने हाहाकार माजविला.
० फेब्रुवारी, २०१३ मध्ये अमेरिकेच्या ईशान्य भागात नेमो या बर्फयुक्त चक्रिवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
० महेंद्रसिंग धोनी यास नेपाळ क्रिकेटचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
० अ‍ॅटलास-५ या प्रक्षेपकाच्या मदतीने, अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्राने ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील केंद्रातून मंगळ ग्रहाच्या अध्ययनासाठी, ‘मार्स सायन्स लॅबोरेटरी’ ही यांत्रिक बग्गी जिचे नाव क्युरिओसिटी हे आहे, ही प्रक्षेपित केली.
० ऑगस्ट, २०१२ मध्ये अमेरिकन उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीने आंतरराष्ट्रीय सायकलिंग क्षेत्रातील दिग्गज खेळाडू लान्स आर्मस्ट्राँग याच्यावर आजन्म बंदी घातली असून, त्याची सर्व अजिंक्यपदे काढून घेण्याचाही निर्णय घेतला आहे.
० मार्च २०१३ मध्ये बांगलादेशातील ढाका विद्यापीठाने प्रणव मुखर्जी यांना मानद डॉक्टरेट बहाल केली.
० ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अ‍ॅण्ड सायन्स’ या अमेरिकन संस्थेद्वारे प्रतिवर्षी देण्यात येणारा ऑस्कर पुरस्कार चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी लॉस एंजिलिस येथे ८५वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बेन अप्लेक यांनी दिग्दíशत केलेला ‘आर्गो’ या चित्रपटास ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला. २०१२ मध्ये ८४वा ऑस्कर पुरस्कार ‘द आर्टस्टि’ या चित्रपटाला मिळाला होता. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ‘िलकन’ या चित्रपटात िलकन याची भूमिका साकारणारा आयरिश अभिनेता डॅनिअल लुईस याला पुरस्कार प्राप्त झाला. ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटाला सर्वाधिक चार ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
० ‘इट इज नॉट अबाऊट द बाइक  माय जर्नी बॅक टू लाइफ’ हे आत्मचरित्र लान्स आर्मस्ट्राँगचे असून त्याने १९९९ ते २००५ या काळात ‘टूर दी फ्रान्स’ ही शर्यत सतत सात वेळा जिंकली होती. मात्र डोिपग प्रकरणी अमेरिकन उत्तेजक प्रतिबंधक समितीने त्याची सर्व पदके काढून घेतली.
० जानेवारी २०१३ मध्ये कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे भारतीय विज्ञान परिषदेचे शंभरावे अधिवेशन पार पडले. या परिषदेत भारताचे चौथे राष्ट्रीय विज्ञान धोरण घोषित करण्यात आले. ‘सायन्स फॉर शेिपग दी फ्युचर ऑफ इंडिया’ ही या परिषदेची मध्यवर्ती कल्पना होती.
० ११वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन, २०१३ – ७ ते ९ जानेवारी २०१३ या दरम्यान कोची (केरळ) येथे ११व्या प्रवासी भारतीय दिवस, संमेलनाचे उद्घाटन डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. यासाठी प्रमुख अतिथी मॉरिशसचे राष्ट्रपती राजकेश्वर पुरियाग हे होते. ‘एंगेजिंग डायस्पोरा : द इंडियन ग्रोथ स्टोरी’ ही या कार्यक्रमाची थीम होती. १०वे संमेलन २०१२ मध्ये जयपूर येथे भरले होते.
० अलिप्त राष्ट्र संघटनेची १६वी शिखर परिषद १६ ते ३१ ऑगस्ट २०१२ या कालावधीत तेहरान (इराण) येथे पार पडली. या परिषदेत मावळते अध्यक्ष मोहम्मद मोर्सी (इजिप्त) यांनी इराणचे राष्ट्रपती मोहम्मद अहमदिनेजाद यांच्याकडे अध्यक्षपदाचा कारभार सुपूर्द केला. सतरावी (१७वी) शिखर परिषद २०१५ मध्ये व्हेनेझुएला येथे होणार आहे.
० ब्रिक्स शिखर परिषद, २०१२ – २९ मार्च २०१२ रोजी ब्रिक्स राष्ट्रसमुहांची चौथी शिखर परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. ब्रिक्सचे सदस्य राष्ट्र – ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे आहेत.
० जी-२० शिखर परिषद – १८ ते २० जून २०१२ दरम्यान लॉस काबोस (मेक्सिको) येथे जी-२० संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांची सातवी शिखर परिषद पार पडली. या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले.
० सेऊल अणुसुरक्षा परिषद २०१२ – मार्च २०१२ मध्ये सेऊल (दक्षिण कोरिया) येथे जागतिक स्तरावरील दुसरी अणुसुरक्षा परिषद पार पडली. २०१४ मध्ये तिसरी अणुसुरक्षा परिषद नेदरलँड येथे होणे नियोजित आहे.
० १९ एप्रिल २०१२ रोजी दक्षिण सुदान हा जागतिक बँकेचा तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा १८८ वा सदस्य देश ठरला.
० २० जुल १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अमेरिकी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचे २५ ऑगस्ट रोजी वयाच्या ८२व्या वर्षी अमेरिकेत सिनसिनाटी येथे निधन झाले. अपोलो-११ या यानातून त्यांनी प्रवास केला होता.
० अमेरिकेत तयार करण्यात आलेला ‘टायटन’ हा महासंगणक जगातील सर्वाधिक वेगवान संगणक ठरला आहे.
० स्वित्र्झलडस्थित ‘युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लिअर रिसर्च’ (सर्न) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ४ जुल, २०१२ रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ‘लार्ज हैड्रॉन कोलायडर’ या यंत्राच्या मदतीने करण्यात आलेल्या प्रयोगातून ‘हिग्ज-बोसॉन’सारखे गुणधर्म दर्शविणारा नवा कण सापडल्याचे घोषित केले. या कणाला वैज्ञानिक पिटर हिग्ज आणि भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरून हिग्ज-बोसॉन हे नाव देण्यात आले. त्याच्या गुणधर्मामुळे त्याला गॉड पार्टकिल म्हणूनही संबोधले जाते.
० ऑस्ट्रेलियातील न्यु साऊथ वेल्स युनिव्‍‌र्हसिटी, सिडनी येथे महात्मा गांधीजींचा पुतळा बसविण्यात आला आहे.
० अमेरिकेचे अफगाणिस्तान व पाकिस्तानसाठी विशेष दूत म्हणून मार्क ग्रोजमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
० संयुक्त राष्ट्रसंघाने २०१०-२०२० हे दशक जैविक बहुविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.
० पोर्तुगालमध्ये जवळजवळ ७५ हजार भारतीय लोक काम करतात. दोन्ही देशांतील संबंध अधिक वृिद्धगत व्हावेत, या दृष्टीने भारत व पोर्तुगाल दरम्यान सामाजिक सुरक्षा करार र्रूं’ रीू४१्र३८ अॠ१ीेील्ल३ (ररअ) झाला. भारताने आतापर्यंत १७ देशांबरोबर असा करार केला आहे.
० आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा प्रकल्प जोधपूर (राजस्थान) येथे वेलस्पून (ही’२स्र्४ल्ल एल्ली१ॠ८ छ३.ि) ने विकसित केला. त्याची क्षमता ५० मेगाव्ॉट इतकी आहे.
० जगातील सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प फिनलँडच्या पश्चिम किनाऱ्याजवळ विकसित करण्यात आला आहे. त्याची क्षमता १४० मेगाव्ॉट इतकी आहे.
० २०१२ सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार युरोपियन युनियनला तर साहित्याचा पुरस्कार चीनच्या मो यांग यांना प्राप्त झाला.
० २०१२ चा अर्थशास्त्राचा पुरस्कार अमेरिकेच्या अल्विन रॉय, अमेरिकेच्या लॉइड शिपले यांना प्राप्त झाला.
० २०१२ चा रसायनशास्त्राचा पुरस्कार शरीराबाहेरील सिग्नल स्वीकारणाऱ्या आणि त्याला प्रतिसाद देणाऱ्या शरीरातील पेशींमधील ‘जी प्रोटीन’च्या संशोधनाबद्दल अमेरिकेच्या रॉबर्ट लेफ्कोवित्झ व ब्रायन कोबिल्का यांना प्राप्त झाले.
० २०१२ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पुंजभौतिकी (क्वान्टम फिजिक्स) मधील संशोधनाबद्दल सर्ज हारोश (फ्रान्स) व डेव्हिड वाइनलँड (अमेरिका) यांना हा पुरस्कार देण्यात आला. या संशोधनातील निष्कर्षांंच्या मदतीने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानातून आणखी वेगवान आणि शक्तिशाली क्वान्टम कम्प्युटर विकसित करणे शक्य होणार आहे.
० वैद्यकशास्त्रातील २०१२ चा पुरस्कार स्टेम सेल्सच्या संशोधनाबद्दल म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या पेशींमधील जैविक माहिती पुसून टाकून त्या जागी नवी माहिती टाकून पूर्ण वाढ झालेली पेशी तयार करता येते या संशोधनाबद्दल ब्रिटनच्या जॉन गुरडॉन व जपाच्या शिन्या यामानाका यांना प्राप्त झाला.
० भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (उअ‍ॅ) विनोद रॉय यांची आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (कअएअ) व विश्व बौद्धिक संपदा (हकढड) यांच्या बाह्य़लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती.
० युनोचे महासचिव बान-की-मून यांची कारकीर्द ३१ डिसेंबर २०११ रोजी संपली. मात्र पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे २०१२ ते २०१६या काळासाठी त्यांचीच बिनविरोध फेरनिवड झाली आहे. युनोचे महासचिव बान-की-मून यांनी भारतीय उच्चायुक्त अतुल खरे यांची युनोच्या शांतता मोहिमेच्या उपमहासचिवपदी नियुक्ती केली आहे.
० वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन ३ ते १४ डिसेंबर २०१२ या काळात दुबई येथे भरले.
० अमेरिकेच्या कॅलिफोíनया या राज्याने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास मान्यता दिली.
० २०१२ ची मिस युनिव्हर्स स्पर्धा डिसेंबर २०१२ मध्ये लासवेगास (अमेरिका) येथे पार पडली. २०१२ च्या ६१व्या स्पध्रेत मिस युनिव्हर्स हा किताब अमेरिकेच्या ऑलिव्हिया कल्पो यांना मिळाला. १९९४ मध्ये भारताच्या सुश्मिता सेन व २००० मध्ये लारा दत्त यांना मिस युनिव्हर्स हा किताब मिळाला होता.
० ६२वी मिस वर्ल्ड स्पर्धा १८ ऑगस्ट २०१२ रोजी ओरदोस (चीन) येथे संपन्न झाली. या स्पध्रेत २०१२ च्या मिस वर्ल्ड हा किताब चीनच्या वेन झिया यु यांना मिळाला. आतापर्यंत भारताच्या एकूण पाच सौंदर्यवती मिस वर्ल्ड किताबाच्या मानकरी ठरल्या आहेत. १९६६ मध्ये रीटा फारिया, १९९४ मध्ये ऐश्वर्या रॉय, १९९७ मध्ये डायना हेडन, १९९९ मध्ये युक्ता मुखी, २००० मध्ये प्रियांका चोप्रा.
० समाजोपयोगी सामाजिक क्षेत्रात केलेल्या असाधारण कामगिरीसाठी फिलिपाइन्स सरकारमार्फत ‘रॅमन मॅगसेसे’ हा पुरस्कार दिला जातो. यालाच ‘आशियाचे नोबेल’ म्हणूनही संबोधले जाते. आचार्य विनोबा भावे यांना १९५८ मध्ये हा पुरस्कार प्राप्त झाला होता. ग्रामीण भारतातील महिला व त्यांच्या कुटुंबाचे आíथक जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या कुलंदी फ्रान्सिस (तामिळनाडू) यांना २०१२ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला.
० शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास यासंबंधी आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमोल योगदानासाठी, इंदिरा गांधी मेमोरिअल ट्रस्टतर्फे देण्यात येणारा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार २०१२ या सालासाठी लायबेरियाच्या अध्यक्षा एलिन जॉन्सन सरलिक यांना प्राप्त झाला.
० राष्ट्रकुल संघटनेतील देशांतर्गत इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी ग्रेट ब्रिटन शासनामार्फत देण्यात येणारा व अतिशय प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कार २०१२ सालचा ‘िब्रग अप दी बॉडीज’ या साहित्यकृतीसाठी हिलरी मॅटल यांना प्राप्त झाला.
० न्या. उषा मेहरा आयोग – स्त्रियांची विशेषत: दिल्लीतील स्त्रियांची सुरक्षितता व संरक्षण याबाबत योजावयाच्या उपायययोजनांसंदर्भात डिसेंबर २०१२ मध्ये या आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. या आयोगाने फेब्रुवारी २०१३ मध्ये केंद्र सरकारला आपला अहवाल सादर केला.
० राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम – महाराष्ट्र शासनाने २००८ साली सुरु केलेला बाल आरोग्य तपासणी कार्यक्रम केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बाल आरोग्य अभियान’ म्हणून स्वीकारला आहे. ६ फेब्रुवारी २०१२ रोजी पालघर (ठाणे) येथून या कार्यक्रमास सुरुवात झाली. सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला असून त्यासाठी शाळा, अंगणवाडय़ा आदींशी आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे जोडण्यात येणार आहे. आदिवासी खेडीपाडी तसेच वाडय़ा-वस्त्यांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहचवला जाणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ देशातील २७ कोटी बालकांना होणार आहे.
० सहकार चळवळ अधिक पारदर्शक व्हावी यासाठी केंद्र सरकारने ९७वी घटनादुरुस्ती दिनांक १३ जानेवारी २०१२ रोजी जाहीर केली आहे. यानुसार देशातील सर्व राज्यांना व सहकारी संस्थांना दिनांक १५ फेब्रुवारी २०१३ पासून सहकार कायद्यात योग्य तो बदल करून त्यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक केले आहे. यातील महत्त्वपूर्ण तरतुदी म्हणजे संचालक मंडळाची सदस्यसंख्या २१ पेक्षा जास्त नसावी, २१ संचालकांखेरीज दोन तज्ज्ञ संचालक स्वीकृत करता येतील. मात्र त्यांना पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. संचालकांच्या जागा रिक्त झाल्यास व निवडणुकींना अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी असेल. तेवढय़ा जागा निवडणुकीच्या माध्यमातून भरण्याची तरतूद आहे, मात्र महाराष्ट्रात शासनाने या जागा निवडणुकीऐवजी तेवढे सदस्य स्वीकृत केले जाणार असा निर्णय घेतला आहे. सहकार संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या धर्तीवर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद.
० गोवा राज्य शासनाने राज्यातील स्त्री-भ्रूण हत्या रोखण्याच्या उद्देशाने ‘लाडली लक्ष्मी’ ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आखली असून त्या अंतर्गत १८ वष्रे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीच्या विवाहासाठी एक लाख रुपयांचा निधी देण्याची तरतूद आहे.
० केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने २०४५ पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचे ठरविलेले उद्दिष्ट आता २०७० पर्यंत वाढविले आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० मध्ये लोकसंख्या स्थिरिकरणाचे उद्दिष्ट २०४५ पर्यंत ठरविले होते. परंतु, जनन दर अद्यापही २.८% ने चालू असल्याने हे उद्दिष्ट २०७० पर्यंत वाढविण्यात आले आहे.
० हरियाणा सरकारने लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘समाधान’ ही वेब पोर्टल आधारित प्रणाली सुरू केली आहे. अशा प्रकारे आपल्या तक्रारी ऑनलाइन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे हे पहिले राज्य ठरले आहे.
० ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे हिशोबाचे काम आता ऑनलाइन सुरू होणार असून त्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रिया’ पंचायतराज इन्स्टिटय़ूशन अकाऊंटस् या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.
० मध्यप्रदेश शासनाने राज्यातील ग्रामपंचायतींना अधिक बळकट करण्यासाठी दिनांक १ जानेवारी २०१२ पासून ‘पंच परमेश्वर’ योजना कार्यान्वित केली आहे.
० २०१२ मध्ये आसाम या राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे काझिरंगा या राष्ट्रीय उद्यानातील अनेक प्राण्यांचा बळी गेला.
० ग्रामीण विकास मंत्रालय आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने देशात स्वच्छता आणि निर्मलता यांच्या प्रति जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्या बालन हिला आपली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
० ३ फेब्रुवारी, २०१३ रोजी हवाई दलात वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘पीसी-७ व एमके-२’ ही विमाने हैद्राबादजवळील डूंडिगल येथील हवाई दलाच्या अकादमीत दाखल झाली आहेत. स्वित्र्झलडमधील विलाटस एअरक्राफ्ट कंपनीने ती तयार केली आहेत.
० ८ मार्च २०१३ रोजी दिल्ली येथे देशातील पहिले महिला टपाल कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयात महिला कर्मचारी असतील.
० केंद्र शासनाने ७ जून २०१२ रोजी संपूर्ण स्वच्छता अभियानाचे नामकरण ‘निर्मल भारत अभियान’ असे केले आहे. याशिवाय केरकचऱ्याचे व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गावाला एकरकमी किमान सात लाख व कमाल २० लाख रुपयांची वित्तीय मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्रामीण भागात शौचालयाच्या निर्मितीसाठी १० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
० अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी २०१० मध्ये भारत सरकारने इटलीच्या ‘फिनमेकानिका’ या कंपनीची उपकंपनी असलेल्या ‘ऑगस्टा वेस्टलँड’ या कंपनीसोबत ३,६०० कोटी रुपयांचा सौदा केला होता. या कराराअंतर्गत भारतास १२ ‘एडब्ल्यू-१०१’ हेलिकॉप्टर मिळणार होती. इटलीच्या तपास संस्थांच्या अहवालात या खरेदी व्यवहारात माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांना त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून लाच देण्यात आल्याचा आरोप आहे.
० भारतातील पहिले मेगा फूड पार्क चित्तुर, आंध्रप्रदेश येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यास ‘श्रीनी मेगा फूड पार्क’ असे संबोधले जाते.
० केंद्रीय जलसंसाधान मंत्रालयाच्या वतीने १० -१४ एप्रिल २०१२ या कालावधीत नवी दिल्ली येथे पहिला भारतीय जलसप्ताह साजरा करण्यात आला. या जल कार्यशाळेची संकल्पना ‘पाणी, ऊर्जा आणि अन्नसुरक्षा : उपाय’ अशी आहे.
० २५ फेब्रुवारी २०१३ रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पीएसएलव्ही-सी २० या प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी सात उपग्रह श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले आहेत. पीएसएलव्ही या उपग्रह प्रक्षेपकाची ही सलग २२वी यशस्वी मोहीम ठरली. या मोहिमेत भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी अभ्यासासाठी तयार करण्यात आलेला सरल (रअफअछ) या उपग्रहासह अन्य सहा परकीय उपग्रह यांचा समावेश आहे. सरल या उपग्रहाचा उपयोग सागरी हवामान अभ्यास, सागरी हवामान अंदाज, वातावरण निरीक्षण, पर्यावरण निरीक्षण, जैवविविधता संरक्षण, सागरी सुरक्षेत होणार आहे.
नवे विज्ञान तंत्रज्ञान धोरण
देशाचे चौथे विज्ञान तंत्रज्ञान धोरण २६ डिसेंबर २०१२ रोजी मंजूर करण्यात आले. हे धोरण १ जानेवारी २०१३ पासून लागू करण्यात आले. ‘विज्ञानासाठी माणूस आणि माणसासाठी विज्ञान’ हे या धोरणाचे ध्येय आहे. ‘संशोधन आणि विकास’ यांच्यावरील खर्चात वाढ करून तो स्थुल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) २ टक्क्यांपर्यंत नेणे. तसेच ‘स्मॉल आयडिया, स्मॉल मनी’ व रिस्की आयडिया फंड या दोन योजनांद्वारे नव्या शोधांना पाठबळ देणे हे या धोरणाचे प्रमुख वैशिष्टय़े आहेत.
० फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार फेब्रुवारी २०१३ मध्ये प्रसिद्ध अर्थशस्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांना घोषित झाला. हा पुरस्कार ‘कमांडर डी लॉ लॉजियन डी ऑनर’ हा आहे.
० १५व्या मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे लेफ्टनंट नवदीपसिंग यांना मरणोत्तर ‘अशोकचक्र’ या शांततेच्या काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्काराने २६ जानेवारी २०१२ रोजी सन्मानित करण्यात आले.
० ‘संरक्षण संशोधन आणि विकास’ संस्थेने (ऊफऊड ने) निर्मित केलेले, ‘अ‍ॅडव्हान्स एअर डिफेन्स ०५’ (एएडी-०५) या इंटरसेटवर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी चंडिपूर (ओडिशा) येथे १० फेब्रुवारी २०१२ रोजी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र संपूर्ण देशी बनावटीचे असून ते शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत नष्ट करू शकते.
० ‘लक्ष्य’ हे वैमानिकविरहित विमान असून २७ जानेवारी २०१२ रोजी ‘लक्ष-२’ या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
० इस्त्रोची शंभरावी अंतराळ मोहीम – ९ सप्टेंबर २०१२ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पीएसएलव्ही सी-२१ द्वारे फ्रान्सचा ‘स्पॉट-६’ व जपानचा ‘प्रोइटर्स’ हे उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
० २३ डिसेंबर २०१२ रोजी सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सर्वाधिक एकदिवसीय सामने ४६३ हे खेळले असून, त्यात त्याने ४९ शतके व ९६ अर्धशतके झळकावली आहेत. बांगलादेशमध्ये झालेल्या आशियाई चषक स्पध्रेत १८ मार्च २०१२ रोजी पाकिस्तानवरुद्ध त्याने अखेरचा सामना खेळला.    ० अर्जेटिनाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी याने सलग चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेचा (फिफा) सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू हा पुरस्कार सलग चार वेळा पटकावला.
० पाचवी ट्वेंटी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०१४ मध्ये बांगलादेश येथे नियोजित आहे. तसेच विसावी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा २०१४ मध्ये ब्राझिल येथे नियोजित आहे.
० २०१३ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेतील महिला  एकेरी विजेती बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेन्का असून, पुरुष एकेरीचा विजेता सर्बयिाचा नोवाक जोकोविच आहे.
० ऑगस्ट २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या विश्वचषक युवा क्रिकेट स्पध्रेचे अजिंक्यपद भारताने पटकाविले. भारतीय युवा संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद हा होता. या स्पध्रेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार विल्यम बॉसिस्टो हा मालिकावीर ठरला व ऑस्ट्रेलिया उपविजेता संघ होता.
० ३१ जानेवारी ते १७फेब्रुवारी २०१३ या दरम्यान महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मुंबई आणि कटक येथे पार पडली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर विजय मिळवून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. या स्पध्रेत आठ देशांनी भाग घेतला होता. भारताला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
० २८ जानेवारी २०१३ रोजी अंतिम सामन्यात मुंबई संघाने कर्णधार अजित आगरकर याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्राचा पराभव करून रणजी करंडक स्पर्धा ४० व्या वेळी जिंकली.
० इंडियन प्रीमिअर लीग (आय.पी.एल.) च्या सहाव्या हंगामासाठी झालेल्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल हा ठरला. मुंबई इंडियन्सने त्याला ५.३ कोटी रुपयांत विकत घेतले.
० इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर ‘हॉकी इंडिया लीग’ ही स्पर्धा १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१३ दरम्यान भारतात पार पडली. रांची ऱ्हायनोज व दिल्ली वेव रायडर्स यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत रांची ऱ्हायनोज संघाने बाजी मारून हॉकी इंडिया लीगच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकाविले.
० २०१२ मध्ये झालेल्या एकविसाव्या सुलतान अझलनशहा चषक हॉकी स्पध्रेचा विजेता न्युझीलंडचा संघ असून या स्पध्रेत भारतास तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
० २०१२ मध्ये भरलेली इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा ही पाचवी स्पर्धा होती. यात कोलकाता नाईट रायडर्स हा विजेता संघ होता तर चेन्नई सुपर किंग्ज हा उपविजेता संघ ठरला. या स्पध्रेत कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू सुनील नारायण यास सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार तर या स्पध्रेत सर्वाधिक धावांची ऑरेंज कॅप रॉयल चॅलेंजर्स, बंगळुरुचा ख्रिस गेल याला मिळाला.
० एम. थिरुष कामिनी ही आयसीसी महिला विश्वचषक स्पध्रेत (२०१३) शतक साकार करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.
० १९८५-८६ साली सुरू झालेल्या इंदिरा आवास योजनेच्या अनुदानात १ एप्रिल २०१३ पासून वाढ करण्यात आली आहे. केंद्राकडून देण्यात येणारे हे अनुदान ४५ हजारांवरून आता ७५ हजारांपर्यंत वाढविण्यात आले आहे. डोंगरी व नक्षलग्रस्त भागातील लोकांना हे अनुदान ४७.५०० वरून ८० हजारांपर्यंत वाढविण्यात आले आहे.
० ‘आपका पसा आपके हाथ’ ही केंद्र सरकारची योजना लाभार्थ्यांना अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना आहे. या योजनेची सुरुवात १ जानेवारी २०१३ पासून करण्यात आली.
० ‘लेक सोनियाची’ योजना – दारिद्य्ररेषेखालील मुलींना विशेष आíथक लाभ देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २०१२ पासून ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत दारिद्रयरेषेखालील प्रत्येक मुलीच्या नावावर २१,२०० रुपये जमा करण्यात येणार असून मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये देण्यात येतील.
० घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर देण्यात येणारे अनुदान आता ६ ऐवजी ९ सिलेंडरवर देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. ही सुविधा पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांनाच मिळणार आहे.
० १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील  सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर, बलात्कार व शारीरिक शोषणाविरोधातील कायदे कडक करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश जे. के. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीत माजी मुख्य न्यायाधीश लीला सेठ व माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम् यांचादेखील समावेश होता. या समितीने आपला अहवाल २३ जानेवारी २०१३ रोजी केंद्र सरकारला सादर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा