श्रीकांत जाधव

आपण आधुनिक जगाच्या इतिहासाची दोन लेखांमध्ये चर्चा करणार आहोत. अभ्यासक्रमामध्ये – १८ व्या शतकातील घटना उदा. औद्योगिक क्रांती, जागतिक महायुद्धे, राष्ट्रांच्या सीमारेषांची पुनर्रचना, वसाहतीकरण व निर्वसाहतीकरण, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद यासारखे राजकीय विचारप्रवाह/ तत्त्वज्ञान व त्याचे प्रकार आणि त्याचा समाजावरील प्रभाव अशा पद्धतीने आधुनिक जगाचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे. प्रस्तुत लेखामध्ये १८ व्या आणि १९ व्या शतकातील घटनांची माहिती घेणार आहोत आणि त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन याची तयारी कशी करावी, याबाबत चर्चा करणार आहोत. या विषयाची तयारी करताना आपणाला साधारणत: युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडातील देशांमध्ये १८ व्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटना व त्यांचे परिणाम आणि यामुळे घडून आलेले बदल यांसारख्या विविधांगी पैलूंची माहिती अभ्यासणे महत्त्वाचे ठरते.

Avimukteshwaranand Saraswati Criticized mohan bhagwat
Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
History of Geography How Big is the Universe
भूगोलाचा इतिहास: विश्वाचा आकार केवढा?
Laxman Savadi
Karnataka : “मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा”, कर्नाटकच्या आमदाराची विधानसभेत मागणी; म्हणाले, “आमचे पूर्वज…”
Bahadur Shah Zafar
Red Fort:लाल किल्ल्यावर हक्क कोणाचा; निर्वासित सम्राटाची शोकांतिका काय सांगते?
Ministers profile Pankaja Munde Pankaj Bhoyar Sanjay Rathod Akash Fundkar Ashok Uike
मंत्र्यांची ओळख : पंकजा मुंडे, पंकज भोयर, संजय राठोड, आकाश फुंडकर, अशोक उईके
Ministers profile Atul Save Sanjay Shirsat Babasaheb Patil
मंत्र्यांची ओळख : अतुल सावे, संजय शिरसाट, बाबासाहेब पाटील
Indian players chess
सोव्हिएत वर्चस्वाचे भारतीय प्रारूप?

आधुनिक जगाचा इतिहास – परीक्षाभिमुख समाज निर्माण करण्यासाठी लागणारे आकलन आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात साधारणत: १५ व्या शतकापासून झाली, असे समजले जाते. युरोपमधील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये प्रबोधन युगामुळे एक मूलभूत बदल होण्यास प्रारंभ झालेला होता. तर्कशक्ती, बुद्धिप्रामाण्यवाद यांसारख्या तत्त्वांना अनुसरून विचारप्रक्रियेला सुरुवात झालेली होती.

शतकानुशतके अस्तिवात असणाऱ्या परंपरांना चिकित्सक पद्धतीने स्वीकारणे सुरू झालेले होते ज्यामुळे वैज्ञानिक विचारप्रक्रियेला अधिक चालना मिळालेली होती आणि याच्या परिणामस्वरूप अनेक वैज्ञानिक शोध लावण्यात आलेले होते. अनेक भौगोलिक शोध लावले गेले आणि या शोधांमुळे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद याची सुरुवात झालेली दिसते.

युरोपमध्ये १८ व्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि यामुळे जगाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात झालेली होती. अनेक राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान उदयाला आलेले होते आणि या राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञानामध्ये भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद हे महत्त्वपूर्ण मानले जातात व यांचा सद्य:स्थितीमध्येही प्रभाव दिसून येतो. अशा पद्धतीने एक व्यापक समाज आपणाला करून घ्यावी लागते.

१८ व्या शतकातील महत्त्वाच्या घटना उदा. राजकीय क्रांती – अमेरिकन व फ्रेंच क्रांती, औद्योगिक क्रांती, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकन खंडामधील युरोपियन साम्राज्यवाद; राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान – भांडवलवाद, साम्यवाद आणि समाजवाद इत्यादी. तसेच १९ व्या शतकातील युरोपातील राज्यक्रांती व राष्ट्रवादाचा उदय आणि जर्मनीचे व इटलीचे एकीकरण, आधुनिक जपानचा उदय, अमेरिकेतील गृहयुद्ध इत्यादी महत्त्वाच्या घटना या काळाशी संबंधित आहेत व सर्वाधिक प्रश्न या घटनांना गृहीत धरून विचारले जातात.

मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न आणि या प्रश्नांची उकल करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन

*   ‘उशिराने सुरू झालेल्या जपानमधील औद्योगिक क्रांतीमध्ये निश्चित काही असे घटक होते जे पश्चिमेतील देशांच्या अनुभवापेक्षा खूपच भिन्न होते.’ विश्लेषण करा.

*   ‘युरोपीय प्रतिस्पर्धीयांच्या आक्रमणामुळे आफ्रिकेचे छोटय़ा छोटय़ा कृत्रिमरीत्या निर्मित राज्यामध्ये तुकडे करण्यात आले.’ विश्लेषण करा.

*   ‘अमेरिकन क्रांती वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता.’ सिद्ध करा.

*    सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का झाली? तेथील लोकांच्या औद्योगिकीकरणाच्या काळातील जीवनाच्या गुणवत्तेची चर्चा करा. भारताच्या सद्य:स्थितीमधील जीवन गुणवत्तेशी ती कशी तुलनात्मक आहे?

*   अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीने कशा प्रकारे आधुनिक जगाचा पाया रचला, स्पष्ट करा.

-उपरोक्त प्रश्न हे औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद या दोन महत्त्वाच्या घटनांशी संबंधित आहेत. या प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हे नेमके काय होते आणि याची सुरुवात कशी झाली तसेच यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत होते आणि औद्योगिक क्रांतीला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यामुळे कसा फायदा झाला, याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

आपणाला प्रबोधन युग आणि या युगाचे परिणाम, स्वरूप, युरोपमधील समाजजीवनामध्ये घडून आलेले बदल याचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय वसाहतवाद आणि साम्राज्यवाद ही युरोपमधील देशांनी सुरू केलेली प्रक्रिया आणि तिच्याअंतर्गत त्यांनी आशिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडामध्ये कशा प्रकारे वसाहती स्थापन करून साम्राज्यवाद निर्माण केला, याचे योग्य आकलन करता येत नाही.

अमेरिकन क्रांतीसंबंधीचा प्रश्न समजून घेण्यासाठी सर्वप्रथम वाणिज्यवाद काय होते आणि इंग्लंड या देशाने वाणिज्यवादाद्वारे अमेरिकन वसाहतीची आर्थिक नाकेबंदी कशी केलेली होती, याबाबत माहिती असणे गरजेचे आहे आणि या माहितीचा वापर करून अमेरिकन क्रांती ही वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता हे आपणाला सोदाहरण स्पष्ट करता येते. अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीने आधुनिक जगाचा पाया निर्माण करण्यात कोणते योगदान दिलेले आहे, हे मुद्देनिहाय अधोरेखित करून स्पष्ट करावे लागते. हे सर्व प्रश्न विषयाची सखोल माहिती गृहीत धरून विचारण्यात आले आहेत.

या घटकाची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शालेय पुस्तकांमधून मूलभूत माहिती अभ्यासावी आणि या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘अ हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’ हा राजन चक्रवर्ती लिखित संदर्भ ग्रंथ वाचवा. तसेच बाजारामध्ये या विषयावर अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत, तीदेखील पाहावीत.

Story img Loader