संकल्पनात्मक अभ्यासाइतकेच अर्थव्यवस्था या घटकात चालू घडामोडींना महत्त्व आहे. किंबहुना संकल्पनांच्या आधारे चालू घडामोडींचा अभ्यास करत या विषयाच्या अभ्यासाचा मूलभूत पाया पक्का करता येतो. चालू घडामोडींमुळे हा विषय नेहमीच गतिमान व अद्ययावत राहतो. त्यामुळे राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या अर्थविषयक घडामोडी, प्रकाशित होणारे अहवाल अभ्यासणे हे अर्थव्यवस्था विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक आहे. या बाबतीत कुठल्या मुद्दय़ांवर भर द्यावा,
ते पाहूयात.
० विविध आंतरराष्ट्रीय अहवालातील भारताचे, शेजारील देशांचे स्थान (त्यांनी प्राप्त केलेला क्रमांक) आणि या अहवालामधील प्रथम आणि शेवटच्या स्थानावरील देश माहीत असावेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य अशा तिन्ही स्तरांवरील मानव विकास अहवाल (HDI) माहीत असावेत.
० भारताचे इतर देशांशी झालेले महत्त्वाचे आíथक करार संबंधित देश व मुख्य तरतुदी अशा प्रकारे तयार करावेत. महाराष्ट्रातील काही प्रकल्प, योजना यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था/ इतर देशांशी झालेले करार यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे.
० साक्षरता, लोकसंख्येची रचना (वय, िलग, गुणोत्तर), परदेशी व्यापारातील सर्वात मोठे व कमी भागीदार, परकीय गुंतवणूक (सर्वात जास्त व कमी करणारे देश तसेच कोणत्या राज्यात सर्वात जास्त/ कमी गुंतवणूक, कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त/ कमी गुंतवणूक इत्यादी) ऊर्जा, कृषी उत्पादन इत्यादींबाबतची अद्ययावत आकडेवारी माहीत असणे आवश्यक आहे. आयातीच्या आणि निर्यातीमधील सर्वात कमी व जास्त या बाबी, देश, देशांचा समूह, वस्तू, सेवा, उत्पादने या मुद्दय़ांबाबत पाहायला हव्या. जागतिक व्यापारातील वाटा हा मुद्दाही उत्पादन सेवांबाबत महत्त्वाचा ठरतो. ही आकडेवारी भारताचा आíथक पाहणी अहवाल व महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवालात मिळेल. वेगवेगळया क्षेत्रांचा ‘जीडीपी’मधील वाटा याच स्रोतांद्वारे अभ्यासावा.
० नवे करांचे दर, नवे व्याज दर, सार्वजनिक वित्तामधील सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत व त्यांची टक्केवारी आणि खर्चाचे मुद्दे व त्यांची टक्केवारी, परकीय कर्ज इत्यादींबाबत अद्ययावत आकडेवारी अर्थसंकल्पातून गोळा करता येईल.
० प्रस्तावित महत्त्वाकांक्षी योजना, अर्थकारणाच्या सामाजिक पलूंबाबतची चर्चा या गोष्टी आíथक पाहणी अहवालांतून अभ्यासाव्यात. या ठिकाणी आढळणाऱ्या नव्या संकल्पनाही समजून घ्याव्यात.
० विविध आयोगांचे आणि समित्यांचे अहवाल व शिफारशी संकल्पनात्मक प्रश्नांचा विषय होऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात ज्यांच्या शिफारशी सादर झाल्या असतील त्या समित्यांचा व अहवालांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. काही नव्या समित्या, आयोग, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर स्थापन झाल्या असतील तर त्यांचा विषय व कार्यकक्षा माहिती असायला हवी.
आर्थिक घडामोडींचा अभ्यास
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा