फारुक नाईकवाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध तांत्रिक पदांवर भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात येतात. यापैकी त्या त्या क्षेत्रातील उमेदवारांमध्ये सर्वाधिक जागरूकता असलेल्या दोन परीक्षा आहेत – प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा. राज्यातील पाच कृषी विद्यापीठे आणि त्यांना संलग्न कृषी महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार व त्यांच्या तयारीसाठी पोषक वातावरण दोन्ही लक्षणीय प्रमाणात आहेत. त्यामुळे कृषी सेवांच्या परीक्षांमध्ये अत्यंत स्पर्धात्मकतेने भाग घेतला जातो. सन २०१७ मध्ये कृषी क्षेत्रातील गट अ आणि ब संवर्गातील पदांसाठी एकत्रित परीक्षेचा नवा पॅटर्न लागू करण्यात आला आहे. त्यानंतर २०१७ व २०१८ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली असली तरी २०१९ मध्ये घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सन २०२०मध्ये या परीक्षेच्या जाहिरातीची अपेक्षा करण्यास हरकत नाही. या लेखापासून महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेबाबत चर्चा करण्यात येत आहे.

संवर्ग व पदे याबाबतचा तपशील

राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र कृषी सेवेतील पदे शासनाच्या मागणीनुसार व पदाच्या उपलब्धतेनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात.

* संवर्ग –  गट- अ आणि गट -ब

* नियुक्तीचे ठिकाण –

महाराष्ट्रात कोठेही

* वेतनबँड व ग्रेड वेतन

* कृषी अधिकारी, गट अ – रुपये १५,६००- ३९,१००; ५,४००

अधिक नियमानुसार देय भत्ते

* कृषि अधिकारी गट ब – रुपये ९,३०० 2    ३४,८००;  ४,६०० अधिक नियमानुसार देय भत्ते

* कृषि अधिकारी गट ब (कनिष्ठ)- रुपये ९,३०० – ३४,८००; ४,४०० अधिक नियमानुसार देय भत्ते

* उच्च पदावर बढतीची संधी – ज्येष्ठता आणि पात्रतेनुसार महाराष्ट्र कृषि सेवेतील वरिष्ठ पदावर

अर्हता

* मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्यात विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता.

* प्रस्तुत भरतीसाठी खालील शैक्षणिक अर्हता शासनाने बी.एस.सी (कृषि)/बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केल्या आहेत.

१) बी.एस.सी (कृषी तंत्रज्ञान)

२) बी.एस.सी (कृषी व्यवसाय व्यवस्थापन)

३) बी.एस.सी (गृह विज्ञान)

४) बी.टेक (अन्नतंत्र)

५) बी.एफ.एस.सी.

६) बी.एस.सी(उद्यानविद्या)

* मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

* पदवीच्या शेवटच्या वर्षांत

असणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क

सादर करायच्या अंतिम दिनांकापर्यंत

पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

* ज्या पदवीसाठी अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील अनुभव आवश्यक

असतो अशा पदवीधारकाने मुख्य

परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असणे आवश्यक असते.

परीक्षेचे टप्पे

परीक्षा एकूण तीन टप्प्यांत घेण्यात येते.

*    पूर्व परीक्षा

एकूण गुण २००

*    प्रश्नपत्रिकेचे स्वरूप –

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

*    विषय – मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन व कृषीविषयक घटक

*    मुख्य परीक्षा

*    एकूण गुण – ४००

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

*    प्रश्नपत्रिका  –  दोन

*    पेपर एक (अनिवार्य)

विषय : कृषी- विज्ञान (२०० गुण)

*    पेपर दोन  (वैकल्पिक)

विषय : कृषी किंवा कृषी अभियांत्रिका

या दोन विषयांमधून कोणलाही एक विषय

(२०० गुण)

*    मुलाखत

*    एकूण गुण – ५०

उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे त्याची मानसिक कुवत किती आहे. ते अजमावणे हा मुलाखतीचा उद्देश असतो.

*    मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादित सीमित करण्यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येते. पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते.

पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत. तसेच, पूर्व परीक्षेचे गुण उमेदवारांना कळविले जात नाहीत.

*    मुख्य परीक्षेकरिता आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात. जाहिरातीतील तरतुदीनुसार विहित अटींची पूर्तता करणाऱ्या व मुलाखतीच्या वेळी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सादर

करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते.

पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, गुणांकन इत्यादी बाबत पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येईल.