फारुक नाईकवाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्याआधारे तयारी करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावे लागतील याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. दोन्ही भाषांचा अभ्यासक्रम एकसारखाच असल्याने त्यांच्या तयारीबाबत या लेखामध्ये एकत्रित चर्चा करण्यात येत आहे.

अभ्यासक्रमाचे ढोबळमानाने चार विभाग विचारात घेता येतील –

शब्दसंग्रह, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार आणि उताऱ्याचे आकलन. तयारीसाठी विभागनिहाय मुद्दे पुढीलप्रमाणे –

शब्दसंग्रह

* समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठीचा शब्द हा भाग ‘आकलना’मध्ये समाविष्ट होतो. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधील शब्दसंग्रहावरील प्रश्न हे अगदीच शालेय पातळीवरचे नाहीत. तरी रोजचे काहीना काही वाचन असलेल्या उमेदवारांना त्यांचे संदर्भ सहजपणे लागतील अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे चालू घडामोडींसाठी वृत्तपत्र वाचन करताना त्याचाच भाषिक तयारीसाठी वापर करणे ही वेळेची बचत करण्याची नामी युक्ती आहे.

* समानार्थी/विरुद्धार्थी शब्दांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्नातील शब्दाचा अर्थ नेमकेपणाने माहीत असायला हवा. मराठीतील शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घ वेलांटी/ उकारांमधील बदलामुळे तसेच काना/ मात्रा/ वेलांटीची जागा बदलल्याने शब्दांचे अर्थ बदलतात हे लक्षात ठेवायला हवे. उदा. पाणि (हात) आणि पाणी (जल). इंग्रजीमधील एकसारख्या उच्चाराच्या किंवा स्पेलिंगच्या पण वेगळे अर्थ असणाऱ्या शब्दांच्या बाबतीत किंवा एकसारखा उच्चार पण स्पेलिंगमध्ये थोडय़ाशा बदलामुळे अर्थ बदलतो अशा शब्दांच्या बाबतीत नेमका अर्थ माहीत असणे आवश्यक ठरते. उदा. conform आणि confirm या शब्दांमध्ये गोंधळ उडू शकतो. त्यामुळे प्रश्नातील व पर्यायातील शब्द काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

व्याकरण

* मराठीतील विभक्ती प्रत्ययांचा तक्ताकिंवा इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचे कोष्टक पाठच असायला हवे.

* मराठीतील व्याकरण या व्याख्येत जे येते त्या संधी, समास, अलंकार, शब्दांचे प्रकार, काळ, वाक्यपृथ:करण अशा बाबींचा अभ्यासक्रमामध्ये स्वतंत्र उल्लेख केलेला नाही आणि त्यांवर स्वतंत्रपणे प्रश्न विचारण्यास स्कोपही कमी असला तरी वाक्यरचना, वाक्यपृथ:करण या बाबी व्यवस्थित तयार करायला हव्यात.

* अन्य मुद्दय़ांबाबत नियम व्यवस्थित समजून घेणे आणि त्यांचा काही उदाहरणांमध्ये वापर करून पाहणे पुरेसे आहे.

* इंग्रजीतील वाक्य रूपांतरणाचे प्रश्न वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर नक्कीच सोडवता येतात. शब्दांचा वापर, काळ, प्रयोग, degrees of comparison याबाबतचे नियम तयार करण्यासाठी उदाहरणांमध्ये वापर करायचा सराव करणे परिणामकारक ठरते.

म्हणी व वाक्प्रचार

* म्हणी व वाक्प्रचार यावरील प्रश्न सोडविण्यासाठी अवांतर वाचन हा उत्तम सोर्स आहे. तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे शक्य नसेल तर म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन किंवा बाजारात उपलब्ध पुस्तक वापरावे. त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यायला हवा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे सोपे होते.

उताऱ्याचे आकलन

* दोन्ही भाषांच्या प्रत्येकी ५ गुणांसाठीचे प्रश्न उताऱ्यावर आधारित असतात. हे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या :

* १० गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येणार असले तरी उपलब्ध वेळ आणि उताऱ्याची लांबी काठिण्य पातळी यांचा विचार करता वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरते.

* मराठी उतारा साधारणपणे २५० ते ३०० शब्दांचा असतो. तर इंग्रजी उताऱ्याच्या शब्दमर्यादेमध्ये दरवर्षी बदल झालेला दिसतो.

* उताऱ्याला शीर्षक देणे, उताऱ्यामध्ये स्पष्टपणे सापडतील अशा मुद्दय़ा/ वाक्यांवर आधारित असेच प्रश्न विचारलेले दिसतात. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी आधी प्रश्न पाहून मग उतारा वाचावा. वाचनावेळी प्रश्नाशी संबंधित वाक्ये अधोरेखित करता येतील. जेणेकरून प्रश्न सोडविताना संबंधित वाक्य पटकन सापडेल.

* इंग्रजीच्या तयारीसाठी रोजचे पेपर वाचन किंवा इतर कोणतेही इंग्रजी वाचन (व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवरील पोस्ट्स बिलकुल नाही) उपयोगी ठरेल.

* मराठी वाचनाची सवय कमी झाली असेल तर वाचनाचा वेग कमी होऊन उत्तरे शोधायला जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे परीक्षा द्यायचा निर्णय घेतल्यापासून रोज मराठी वाचनाचा सराव सुरू करणे आवश्यक आहे.

* याचा अभ्यास प्रभावीपणे करण्यासाठी आणि संदर्भासाठी वापरणे उपयुक्त ठरेल. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांची उजळणी केल्यास आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा अभ्यास शक्य होईल.

संदर्भ पुस्तके

* मराठीसाठी लीला गोविलकर यांची व्याकरण व शब्दसंग्रहावरील पुस्तके तसेच मो. रा. वाळिंबे यांचे मराठी व्याकरण हे पुस्तक.

* इंग्रजी व्याकरणासाठी रेन अ‍ॅण्ड मार्टिन किंवा  पाल अ‍ॅण्ड सूरी यांची पुस्तके किंवा के सागर प्रकाशनाचे संपूर्ण इंग्रजी हे पुस्तक.