रोहिणी शहा
पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाचे ढोबळमानाने तीन भाग आहेत. मात्र प्रत्येक भाग — उपविभागाच्या प्रश्नांची संख्या निश्चित असल्याने प्रत्येकाच्या तयारीसाठी एक निश्चित नियोजन करणे आवश्यक आणि शक्यही आहे. भाषा विभागामध्ये मराठी आणि इंग्रजीसाठी प्रत्येकी दहा गुणांसाठी दहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या लेखामध्ये सन २०१७पासून पूर्वपरीक्षेमध्ये मराठी भाषेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्या आधारे तयारीसाठी लक्षात घ्यायचे मुद्दे याबाबत चर्चा करण्यात येत आहे. मागील प्रश्नपत्रिकांमधील काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू. (योग्य उत्तरांचे पर्याय ठळक केले आहेत.)
प्रश्न १. समानार्थी शब्दांच्या जोडय़ा लावा:
‘अ’ ‘ब’
अ. फूल I. एकाक्ष
ब. कावळा II.. अंडज
क. डोळा III. सुम
ड. पक्षी IV चक्षू
पर्यायी उत्तरे
(१) अ— IV; ब— I;; क— II; ड— III
(२) अ— II; ब— III; क— I; ड— IV
(३) अ— III; ब— I; क— IV; ड— II
(४) अ— I; ब— II; क— III; ड— IV
प्रश्न २. संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत?
(१) आणि व (२) म्हणून यास्तव
(३) परंतु पण (४) जर तर
प्रश्न ३. ‘अं’ आणि ‘अ:’ या दोन वर्णाना ——— असे म्हणतात.
अ. अनुस्वार ब. स्वर क. स्वरादी इ. व्यंजने
(१) अ आणि ब बरोबर
(२) क आणि ड बरोबर
(३) फक्त क बरोबर
(४) फक्त ड बरोबर
प्रश्न ४. ‘अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
(१) अतिखाणे नुकसानकारक असते.
(२) आरशात तोंड पाहून रूप न्याहाळणे.
(३) स्वत:ची चूक लपविण्याचा प्रयत्न करणे,
(४) अतिशय उतावळेपणाची कृती.
प्रश्न ५. ‘न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
- a. कर्मकर्तरी प्रयोग b. कर्मभाव संकर प्रयोग
- c. कर्मणी प्रयोग . d भावे प्रयोग
(१) फक्त d बरोबर बाकी सर्व चूक
(२) b आणि c बरोबर बाकी सर्व चूक
(३) a आणि c बरोबर बाकी सर्व चूक
(४) फक्त a बरोबर बाकी सर्व चूक
प्रश्न ६. ‘बाजीरावाचा नातू असणे‘ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
१) श्रीमंत माणूस
२) वशिल्याचा माणूस
३) मिजासखोर माणूस
४) अति लांबचा किंवा दूरचा माणूस
प्रश्न ७. ‘वशिला असलेली माणसं मोठय़ा पदावर सहज जातात.‘ या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा.
अ. माणसं मोठय़ा पदावर
ब. वशिला असलेली माणसं
क. वशिला
ड. वशिला असलेली
पर्यायी उत्तरे:
(१) फक्त ड बरोबर
(२) फक्त ब बरोबर
(३) ब आणि ड बरोबर
(४) फक्त क बरोबर
वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे पुढील मुद्दे लक्षात येतात.
व्याकरण, म्हणी आणि वाक्प्रचार यांवर एकूण पाच प्रश्न विचारलेले आहेत. तर उताऱ्यावरील प्रश्न पाच गुणांसाठी विचारण्यात आलेले आहेत.
व्याकरणावरील प्रश्नांची काठिण्य पातळी ही अभ्यासक्रमामध्ये नमूद केल्याप्रमाणे बारावीच्या स्तराची आहे.
व्याकरणावरील प्रश्न हे बहुविधानी असले तरी व्याकरणाचे नियम सरळसोट पद्धतीने विचारलेले आहेत. त्यामुळे बारावीपर्यंतच्या व्याकरणाचा व्यवस्थित अभ्यास झालेला असेल तर सहजपणे सोडविता येतात.
म्हणी आणि वाक्प्रचार यांवरील प्रश्नांचे पर्याय पाहता नेमके उत्तर माहीत नसेल किंवा भाषेवर चांगली पकड नसेल तर एकसारख्या अर्थाचे किंवा गोंधळात टाकणारे असे वाटू शकतात. अभियांत्रिकीच्या अभ्यासादरम्यान साहित्यिक भाषा किंवा अशा प्रकारच्या आलंकारिक लेखनाशी, बोलण्याशी फारसा संबंध उरलेला असायची शक्यता कमी असते. त्यामुळे हे प्रश्न काहीसे आव्हानात्मक ठरू शकतील. म्हणून या भागाची तयारी करण्यासाठी थोडेसे जास्त प्रयत्न करावे लागतील.
उताऱ्यांची शब्दमर्यादा प्रत्येक वर्षी वेगळी असलेली दिसते. मात्र दिलेले उतारे हे तुलनेने सोप्या अनलंकारिक अशा भाषेमध्ये असल्याने वेगाने वाचन शक्य आहे. प्रश्नही खूप कठीण किंवा गुंतागुंतीचे नाहीत. उत्तरांचे पर्याय पाहून लगेच योग्य उत्तर सापडू शकेल असे प्रश्न असले तरी त्यासाठी मराठी भाषेची समज असणे आवश्यक आहे. यासाठी मराठी वाचन आणि आकलन याची सवय आणि सराव आवश्यक आहे.