भूगोल हा विषय केवळ ठरावीक गोष्टींच्या पाठांतरापुरता मर्यादित नाही. हा विषय इतर महत्त्वाच्या समकालीन विषयांच्या अभ्यासाचा संकल्पनात्मक पाया आहे. त्यामुळे या विषयाचे प्रश्न उपयोजित प्रकारचे आणि विद्यार्थ्यांची व्यावहारिक व तार्किक क्षमता तपासणारे असणे स्वाभाविक आहे. मुख्य परीक्षेचा उद्देश हा एखाद्या मुद्दय़ाचा बहुआयामी विचार करण्याची उमेदवाराची क्षमता तपासणे हा असतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप आंतरशाखीय, बहुआयामी असते. कोणत्याही विषयाच्या मूलभूत आयामांमध्ये त्याचे भौगोलिक आयाम महत्त्वाचे असल्याने भूगोल या विषयाची परिपूर्ण तयारी करणे आवश्यक ठरते.
आयोगाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाचा सविस्तर अभ्यास करता यावा, याकरता  खालीलप्रमाणे भाग केले आहेत. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भूगोलाचा अभ्यास करावा.
प्राकृतिक भूगोल : पृथ्वीचे अंतरंग-रचना व प्राकृतिक जडणघडण, भूरूप विकास नियंत्रित करणारे घटक, भूरूपी चक्रांची संकल्पना- नदीसंबंधी, शुष्क, हिम, समुद्रतटीय चक्र यांच्याशी संबंधित भूरूप. भारतीय उपखंडाची उत्क्रांती व भूरूपवर्णन, महत्त्वाचे  प्रदेश- पुरांची समस्या- महाराष्ट्राच्या भूरूपांचा तपशील. महाराष्ट्राची भूरूपी वैशिष्टे, भारताचे त्यांच्या शेजारील राष्ट्राच्या, िहद महासागराच्या, आशियाच्या व जगाच्या संदर्भातील मोक्याचे ठिकाण असा अभ्यास करणे आवश्यक आहे.
हवामान : वातावरण- रचना व संरचना, सौर उत्सर्जन व उष्मा समतोल, हवामानाचे घटक- तापमान, वायुदाब, ग्रहीय व स्थानिक वारे, मान्सून, वायुराशी आणि पुरोभाग व चक्रीवादळे, भारतीय मान्सूनचे तंत्र, पावसाचे पूर्वानुमान, पर्जन्यवृष्टी, चक्रीवादळे, अवर्षण व पूर व हवामान प्रदेश, महाराष्ट्रातील पर्जन्यवृष्टीचे वितरण- अभिक्षेत्रीय व कालिक परिवर्तनशीलता. प्राकृतिक भूगोल व हवामान या घटकांचा एकत्रित अभ्यास केल्याने भौगोलिक संज्ञा व्यवस्थित समजतील.
जल व्यवस्थापन
सद्य परिस्थिती, जल संधारणाच्या पद्धती आणि महत्त्व, पाण्याच्या गुणवत्तेची मानके, भारतातील नद्यांची आंतरजोडणी, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धती, भूजल व्यवस्थापन- तांत्रिक व सामाजिक बाबी, कृत्रिम भूजल पुनर्भरणाच्या पद्धती, पाणलोट क्षेत्राची संकल्पना आणि पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन, महाराष्ट्राचे कृषी हवामान क्षेत्र- अवर्षण आणि टंचाईची समस्या, अवर्षणप्रवण क्षेत्र कार्यक्रम- कृषी, उद्योग व घरगुती क्षेत्रातील पाण्याची आवश्यकता, पिण्याच्या पाण्याची समस्या.
कृषी परिस्थितिकी
खाली नमूद केलेले कृषी विभागातील संबंधित मुद्दे एकत्रित अभ्यासायला हवेत. कृषी परिस्थितिकी व त्याचा मानवाशी, नसíगक साधनसंपत्तीशी संबंध, त्याचे कायमस्वरूपी व्यवस्थापन व संवर्धन, पीक वितरण व उत्पादनाचे घटक म्हणून प्राकृतिक व सामाजिक पर्यावरण, पिकवाढीसाठी आवश्यक ठरणारे म्हणून हवामान घटक, पर्यावरणीय प्रदूषण, पिके, प्राणी व मानव यांच्या संबंधातील धोके. महाराष्ट्राच्या विविध कृषी हवामान क्षेत्रातील पीक प्ररूप, पीक लागवडीच्या पद्धतीतील बदलांवर उच्च उत्पन्नाच्या व कमी कालावधीत होणाऱ्या विविध पिकांचा प्रभाव, बहुविध पीक लागवडीची संकल्पना व आंतरपीक लागवड व त्याचे महत्त्व, सेंद्रिय शेतीची आधुनिक संकल्पना, वर्धनक्षम कृषी. कोरडवाहू जमिनीवरील शेती व त्यातील समस्या, पीक उत्पादनासंबंधात पाणी वापराची क्षमता, जल सिंचनाचे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, ठिबकसिंचन व तुषार जलसिंचन, पाणथळ मृदेचे जलनिस्सारण, कारखान्यातील दूषित पाण्याचा जमीन व पाणी यावर
होणारा परिणाम.
सामाजिक भूगोल
यामध्ये वसाहती, स्थलांतर तसेच लोकसंख्येची रचना व वैशिष्टय़े अभ्यासावी लागतात. त्यामुळे महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल   हे अभ्यासघटक एकत्रितपणे अभ्यासायला हवेत.
महाराष्ट्राचा मानवी आणि सामाजिक भूगोल
जनतेचे स्थलांतर, त्यामागची कारणे व परिणाम, ऊसतोडणी कामगार, साधनसंपत्ती व ज्या प्रदेशात स्थलांतर होते त्या प्रदेशावर होणारा स्थलांतराचा परिणाम, महाराष्ट्रातील ग्रामीण वस्त्या, शहरी व ग्रामीण वस्त्यांमधील समस्या-पर्यावरण, गृहनिर्माण, झोपडपट्टी, पाणीपुरवठा व स्वच्छता, शहरी वाहतूक व प्रदूषण.
लोकांच्या स्थलांतराची कारणे आणि परिणाम, ग्रामीण व शहरी वसाहती- ठिकाण, परिस्थिती, प्रकार, आकारमान, मोकळ्या जागा व भूरूपांचे स्वरूप, शहरीकरण- प्रक्रिया व समस्या, ग्रामीण-शहरी तफावत, शहरी प्रभावाचे क्षेत्र, प्रादेशिक असमतोल.
महाराष्ट्राचा आíथक भूगोल
याचा अभ्यास करताना कृषिक्षेत्राचे आíथक आयाम  अंतर्भूत करावेत. खनिजे व ऊर्जा साधनसंपत्ती- महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे वितरण, महत्त्व व विकास, महाराष्ट्रातील पर्यटन- धार्मिक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, पर्यावरणभिमुख पर्यटन व सांस्कृतिक वारसा, महाराष्ट्रातील संरक्षित वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, किल्ले आणि व्याघ्र प्रकल्प.
पर्यावरणीय भूगोल  
परिस्थितीविज्ञान व परिस्थितिकी व्यवस्था- ऊर्जा प्रवाह, वस्तू चक्र, अन्न श्रृंखला व जाळे, पर्यावरणीय अवनती व संवर्धन, जागतिक पारिस्थितिकी असमतोल- प्रदूषण व हरितगृह परिणाम, हरितगृह परिणामातील कार्बन डायऑक्साइडची व मिथेनची भूमिका, जागतिक तापमानातील वाढ, जैवविविधतेतील घट आणि वनांचा ऱ्हास, पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे व पर्यावरणीय प्रभावाचे परीक्षण, क्योटो प्रोटोकॉल व कार्बन क्रेडिटस्, शहरी कचरा व्यवस्थापन, सागरी संरक्षित क्षेत्र एक व सागरी संरक्षित क्षेत्र दोन.
सुदूर संवेदना
सुदूर संवेदन ही संकल्पना, भारतीय सुदूर संवेदना उपग्रह कल्पनाचित्र, भारतीय सुदूर संवेदना उपग्रह निर्मिती, एमएसएस बॅन्ड- निळा, हिरवा, लाल व लालसर रंगाच्या जवळचा, आभासी रंग मिश्रक (फास्ट कलर कॉम्पझिट -एफसीसी). नसíगक साधन संपत्तीसह सुदूर संवेदनेचा वापर करणे. भौगोलिक माहिती यंत्रणा (जीआयएस) व जागतिक स्थाननिश्चिती यंत्रणा (जीपीएस) सुरू करणे.
मृदा
मृदेचे प्राकृतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, मृदा तयार होण्याची प्रक्रिया व घटक, खनिजे आणि मातीचे सेंद्रिय घटक आणि मातीची उत्पादकता कायम ठेवण्यामधील त्यांची भूमिका, वृक्ष लागवडीसाठी मातीतील पोषक घटक, समस्याग्रस्त जमिनी व तिथे योग्य लागवड करण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील मृदा अपरक्षण व जमीन ओसाड होण्याची समस्या, जल विभाजकाच्या आधारे मृत संधारणाचे नियोजन, डोंगराळ, डोंगराच्या पायथ्यावरील व दरीतील जमिनीची धूप व भूपृष्ठीय व्यवस्थापन, त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या कार्यपद्धती व घटक यांचा अभ्यास कसा करता येईल,याविषयी पुढील लेखात सविस्तर चर्चा करू.
thesteelframe@gmail.com

wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
Dhirendrakrishna Shastri makes unscientific claims promote superstition under guise of spirituality
धीरेंद्रकृष्ण यांच्या कार्यक्रमास अंनिसचा विरोध, अंधश्रध्देस खतपाणी घालणाऱ्यांना परवानगी दिल्याबद्दल नाराजी
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ