राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर १ मध्ये भूगोल या घटकाच्या अंतर्गत दूरसंवेदन (Remote Sensing) हा उपघटक येतो. आयोगाने गेल्या दोन मुख्य परीक्षांमध्ये या उपघटकावर विशेष भर दिला आहे. या उपघटकाची तयारी करताना सर्वप्रथम संकल्पना समजून घ्याव्यात. त्यानंतर इंटरनेटवरून दूरसंवेदनासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचा अभ्यास गुगल इमेजसवरून केल्यास सोपा जातो. त्याचप्रमाणे ‘एनसीईआरटी’ भूगोलातील प्रात्यक्षिक भूगोलात दूरसंवेदन हा स्वतंत्र घटक दिला आहे, तो वाचावा. दूरसंवेदन हा उपघटक राज्यसेवा मुख्य परीक्षेप्रमाणे यूपीएससीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. यूपीएससी परीक्षेत विज्ञान या घटकाअंतर्गत हा उपघटक येतो.
दूरसंवेदन (रिमोट सेन्सिंग)
कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्षात संपर्कात न येता, त्यासंबंधी माहिती मिळवणे म्हणजे दूरसंवेदन. आपण जेव्हा एखाद्या कॅमेऱ्याने फोटो घेतो, तेव्हा तोदेखील दूरसंवेदनाचाच एक प्रकार आहे. अशा प्रकारे पृथ्वीवरील माहिती संकलित करण्यासाठी दूरसंवेदनाच्या माध्यमातून ज्या उपग्रहांची मदत घेतली जाते, त्यांना सुदूर संवेदी उपग्रह (रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट) असे म्हणतात. दूरसंवेदन तंत्रामुळे भौगोलिक, भूगर्भविषयक, सागरविषयक, हवामान व पर्यावरणविषयक माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे.
दूरसंवेदन तंत्राची वैशिष्टय़े आणि उपयोग
० पृथ्वीवरील वस्तूंनी परावर्तित केलेल्या, पसरवलेल्या किंवा पुनर्परावर्तित केलेल्या सूर्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांच्या मोजमापावरून असे आकलन होते. इलेक्ट्रो-मॅग्नेटिक पट्टय़ातील दृश्य प्रकाश, इन्फ्रारेड किरण आणि मायक्रोवेव्ह किरणांचा त्यासाठी वापर केला जातो.
० दूरसंवेदनासाठी विमान व कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो.
० १९९०नंतर मानवरहित दूरसंवेदनाची सुरुवात झाली.
० दूरसंवेदनामार्फत मिळवलेल्या माहितीचा वापर लगेच केला जात नाही. ती माहिती सर्वप्रथम बेस स्टेशनकडे पाठवली जाते. तिथे त्या माहितीचे विश्लेषण होते आणि नंतर माहिती वापरली जाते.
० हवाई छायाचित्रणापेक्षा उपग्रहाद्वारे केले जाणारे भूसर्वेक्षण आíथकदृष्टय़ा स्वस्त असल्यामुळे अलीकडच्या काळात त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे.
० सुदूर संवेदनामार्फत मिळणारी माहिती मानवी हस्तक्षेपाशिवाय असल्याने पूर्वग्रहरहित व पूर्ण विश्वासार्ह असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे.
० टोपोशिट तयार करण्यासाठी (नकाशा) दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा वापर होतो.
० भूपृष्ठावरील व भूपृष्ठांतर्गत खनिजे, पाण्याचा साठा, धरणातील पाणीसाठा, धरणाची उंची, खोली व पाणी साठवण क्षमता सुदूर संवेदनाचा वापर करून सांगता येते.
० वन्यप्राण्यांचे सर्वेक्षण, जीवपुरात्व विषयांसाठी सुदूर संवेदनाचा वापर केला जातो.
० सुदूर संवेदनामुळे व्यापक व दुर्गम भागाची व्यवस्थित माहिती मिळवता येते. वलीकरण व प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या भूवैशिष्टय़ांचा अभ्यास करता येतो. शिवाय भूकंप, ज्वालामुखी, वणवा, महापूर, वादळे इ. नसíगक आपत्तींचा अभ्यास करता येतो.
उपग्रह पृथ्वीपासून ज्या उंचीवर स्थिर केले जातात, त्यांना कक्षा असे म्हणतात. कक्षा दोन प्रकारच्या असतात – सूर्यस्थिर कक्षा आणि भूस्थिर कक्षा.
० सूर्यस्थिर कक्षा / उपग्रह
* या कक्षेत मुख्यत (IRS) उपग्रह सोडले जातात.
* ही कक्षा जवळजवळ वर्तुळाकार अशी धुव्रीय कक्षा असते.
* या कक्षेतील उपग्रह उत्तर ते दक्षिण असे भ्रमण करतात.
* हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० ते १२०० कि.मी. एवढय़ा निश्चित उंचीवर सोडले जातात.
* या उपग्रहाची व्याप्ती क्षेत्र ८१N ते ८१0S इतके असते.
भारतीय सुदूर, संवेदन उपग्रह जवळजवळ वर्तुळाकार अशा धुव्रीय सूर्यस्थिर कक्षेत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ९०० ते १२०० किमी अंतरावर सोडले जातात. ते उत्तर ते दक्षिण या दिशेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतात.
० भूस्थिर कक्षा / उपग्रह
* ही कक्षा वर्तुळाकार अशी विषुववृत्तीय कक्षा असते.
* या कक्षेतील उपग्रह पश्चिम ते पूर्व असे भ्रमण करतात.
* हे उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३५,७८६ किमी अंतरावर सोडले जातात.
* या उपग्रहास पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास २४ तास लागतात.
दूरसंवेदनाचे प्रकार
० साधनांवर अवलंबून असलेले प्रकार
* हवाई वाहक जनित दूरसंवेदन (Air Borne) – यात प्रामुख्याने दूरसंवेदनासाठी विमानांचा व हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. पूर्वी त्यासाठी बलूनचा वापर केला जात असे.
* उपग्रह जनित दूरसंवेदन (Space Borne) – यात प्रामुख्याने उपग्रहांचा विशेषत: दूर संवेदन उपग्रहांचा वापर केला जातो. यातून डिजिटल प्रकारच्या प्रतिमा प्राप्त केल्या जाऊ शकतात.
० पद्धतींवर अवलंबून असलेले प्रकार
* क्रियाशील दूरसंवेदन – या क्रियाशील दूरसंवेदनात जी साधने वापरली जातात, ती स्वत: ऊर्जानिर्मिती करतात व त्याचा मारा करून परत आलेल्या ऊर्जेच्या सहाय्याने प्रतिमा निर्माण करू शकतात. रडार हे त्याचे एकमेव उदाहरण मानता येईल.
* निष्किय दूरसंवेदन – यांत पदार्थापासून उत्सर्जति झालेल्या ऊर्जेचा वापर करून प्रतिमा निर्माण केल्या जातात.
संवेदकांवर आधारित प्रकार
* छायाचित्रण दूरसंवेदन – यांत दृक्प्रकाशाचा वापर करून छायाचित्रे काढली जातात, त्याला प्रकाशीय (Optical) किंवा छायाचित्रीय (Photographic) दूरसंवेदन असेही म्हटले जाते.
* अवरक्त तरंग दूरसंवेदन – या प्रकारात साध्या प्रकाशाऐवजी अवरक्त तरंगाचा (Infrared) वापर केला जातो व चित्रण केले जाते.
छायामिती
जेव्हा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचे सर्वेक्षण कॅमेऱ्याच्या सहाय्याने फोटो घेऊन केले जाते, तेव्हा त्याला छायामिती (Photogrammetry) असे म्हणतात. याचे दोन प्रकार होतात- जेव्हा कॅमेऱ्याच्या सहाय्याने पृथ्वीच्या एखाद्या ठिकाणाहून छायाचित्रे घेतली जातात, तेव्हा त्याला भूछायाचित्रण असे म्हणतात. जेव्हा विमानातून कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे घेतली जातात, तेव्हा त्याला हवाई छायाचित्रण असे म्हणतात.
हवाई छायाचित्रणासाठी विमानात विशिष्ट प्रकारचे कॅमेरे बसवलेले असतात. विमानाचा वेग जास्त असल्यामुळे कॅमेरे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या कॅमेऱ्यात अतिजलदतेने उघडझाप करणारी झडप असते आणि वेगाने छायाचित्रे घेणारी िभगे असतात. जलद परिणाम होणारी अतिसंवेदक फिल्म असते, तसेच कॅमेऱ्यात जास्तीत जास्त छायाचित्रे सामावून घेणारे कप्पे असतात. ( पूर्वार्ध)
grpatil2020@gmail.com
एमपीएससी (मुख्य) परीक्षा दूरसंवेदन
राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर १ मध्ये भूगोल या घटकाच्या अंतर्गत दूरसंवेदन (Remote Sensing) हा उपघटक येतो. आयोगाने गेल्या दोन मुख्य परीक्षांमध्ये या उपघटकावर विशेष भर दिला आहे.
आणखी वाचा
First published on: 12-05-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc main examination remote sensing