ग्रहीय व स्थानिक वारे
पृथ्वीवर नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘ग्रहीय वारे’ असे म्हणतात. या वाऱ्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते- व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे, ध्रुवीय वारे.
व्यापारी वारे / पूर्वीय वारे
उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्षवृत्तांदरम्यान कर्क व मकरवृत्तीय हवेच्या जास्त दाबाचे पट्टे आहेत. येथून विषुववृत्ताजवळील ० ते ५ अंश उत्तर व दक्षिणदरम्यान असणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘व्यापारी वारे’ असे म्हणतात.
व्यापारी वारे १० अंश ते २५ अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान वाहत असतात. पूर्वीच्या काळी व्यापारासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे, म्हणून यांना ‘व्यापारी वारे’ असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून यांना ‘पूर्वीय वारे’ असे म्हणतात.
व्यापारी वाऱ्यांचे दोन उपप्रकार –
० उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे – उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नर्ऋत्येकडे वाहत असल्याने यांना ‘ईशान्य व्यापारी वारे’ असे म्हणतात.
० दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे – दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहत असल्याने यांना ‘आग्नेय व्यापारी वारे’ असे म्हणतात.
व्यापारी वाऱ्यांची वैशिष्टय़े –
* हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात. सागरी प्रदेशातून हे वारे नियमितपणे व वेगाने वाहतात.
* खंडांतर्गत प्रदेशात हे वारे त्या मानाने संथगतीने वाहतात.
* व्यापारी वाऱ्यांचा वेग ताशी सुमारे १६ ते २४ कि.मी. असतो.
* व्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून वाहतात, म्हणून हे उष्ण असतात. त्यांच्यामध्ये बाष्पधारण करण्याची शक्ती वाढल्याने पूर्वेकडे हे वारे अधिक पाऊस देतात. जसजसे हे वारे पश्चिमेकडे जातात, तसा त्यामुळे पाऊस पडत नाही. म्हणूनच खंडाच्या पश्चिम भागात वाळवंटी प्रदेश आढळतो.
प्रतिव्यापारी वारे/ पश्चिमी वारे
उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा आहे. येथून ध्रुव वृत्ताजवळ ६० ते ७० अंश उत्तर व दक्षिणेदरम्यान असणाऱ्या ध्रुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणून यांना ‘पश्चिमी वारे’ असे म्हणतात.
प्रतिव्यापारी वाऱ्यांचे खालील दोन उपप्रकार आहेत.
एमपीएससी (पेपर १) भूगोल
दिवाळीनंतर लगेचच राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१५चे परिपत्रक जाहीर होईल. त्यामुळे २०१५ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या तयारीला लवकरात लवकर सुरुवात केलेली उत्तम.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-09-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc paper 1 geography