यश मिळविण्यासाठी यशस्वी होण्याची इच्छाशक्ती ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.’’
७ एप्रिल २०१३ मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत पेपर १मध्ये पर्यावरण हा स्वतंत्र घटक अंतर्भूत केला आहे. हा विषय यूपीएसीच्या पेपर १च्या अभ्यासक्रमात होताच. गेल्या दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यास एक गोष्ट लक्षात येते- हा घटक पास होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण जवळजवळ २० ते २५ प्रश्न या घटकावर विचारले गेले आहेत. आज आपण या घटकातील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबी समजून घेणार आहोत.
पर्यावरण :- पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापी आहे. पर्यावरण या संकल्पनेत जैविक, अजैविक घटकांचा समावेश होतो.
पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या संघटना :-
१) संयुक्त राष्ट्र संघटनेचा पर्यावरण कार्यक्रम [United Nations Environment Programme (UNEP)] :-
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रमाची सुरुवात १९७२मध्ये स्टॉकहोम येथे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत झाली. याचे प्रमुख कार्यालय केनियाची राजधानी नरोबी येथे आहे. याचे प्रमुख कार्य म्हणजे- संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मार्फत पर्यावरणावर विविध परिषदांचे आयोजन करणे, त्यातून येणाऱ्या शिफारसींना व्यावहारिक रूप देते.
दोहा परिषद :-
कतारची राजधानी दोहा येथे ८ डिसेंबर २०१२ रोजी वातावरण बदलासंदर्भात महत्त्वपूर्ण परिषद झाली. यामध्ये क्योटो प्रोटोकॉलच्या जागी जागतिक सहमती असलेल्या करारास २०१५ पर्यंत अंतिम रूप देण्यात येईल हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. ( ही उडढ 18 – उटढ 8 परिषद होती.)
वातावरण बदलासंदर्भात सविस्तर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी <http://www.unep.org/> हे संकेतस्थळ पाहावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा