महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी कशी करावी, याविषयीचे मार्गदर्शन करणारी साप्ताहिक लेखमालिका..
सामान्य विज्ञान या घटकांतर्गत भारतातील विज्ञान व अभियांत्रिकी प्रगती हा महत्त्वाचा घटक आहे. यात भारतीय संरक्षण तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, अण्वस्त्र धोरण, क्षेपणास्त्र कार्यक्रम, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा व ऊर्जा समस्या या घटकांवर विद्यार्थ्यांनी अधिक भर द्यावा. आज आपण संरक्षण तंत्रज्ञान समजून घेणार आहोत.
१. संरक्षण तंत्रज्ञान : संरक्षक दलाचे सरसेनापती म्हणून भारताचे राष्ट्रपती कार्य करतात. मात्र राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय कॅबिनेटकडे असते. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी सर्व निर्णय ‘कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स’मार्फत घेतले जातात. देशाचे पंतप्रधान हे या कमिटीचे अध्यक्ष असतात. अर्थात राष्ट्रीय सुरक्षेच्या सर्व बाबींबाबतीत संरक्षण मंत्री हे संसदेला जबाबदार असतात.
एकात्मिक मुख्यालय : लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या मुख्यालयांना एकत्रितरीत्या संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय असे म्हणतात. या तिन्ही मुख्यालयांचे अध्यक्ष अनुक्रमे लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाईदलप्रमुख असतात.
भूदल : लष्करप्रमुख नवी दिल्ली येथील लष्कराच्या मुख्यालयातून काम पाहातात. भूदलाचे संघटन एकूण सात विभागांमध्ये करण्यात आले. पश्चिम – चंदिमंदिर (हरियाणा), दक्षिण – पुणे, पूर्व – कोलकाता, उत्तर – उधमपूर, मध्य – लखनौ, दक्षिण पश्चिम – जयपूर, प्रशिक्षण केंद्र – सिमला.
नौदल : भारताला ७,५१७ कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. भारतीय नौदलप्रमुखांचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. नौदलाचे तीन विभाग आहेत : पश्चिम- मुंबई, पूर्व- विशाखापट्टणम, दक्षिण- कोची. विभागप्रमुखांना ‘व्हाइस अॅडमिरल’ असे संबोधले जाते.
आय.एन.एस. अरिहंत – २६ जुल,२००९ रोजी नौदलात दाखल करण्यात आली. ही स्वदेशी बनावटीची औण्विक पाणबुडी आहे.
आय.एन.एस. चक्र – भारताला रशियाकडून १० वर्षांच्या भाडेपट्टी करारानुसार रशियाची नेरपा आण्विक पाणबुडी प्राप्त झाली. तिला भारतात आय.एन.एस. चक्र म्हणून ओळखले जाईल. रशियाने भारतीय नौदलासाठी तयार केलेल्या युद्धनौका – तीन युद्धनौका – आय.एन.एस. तलवार, आय.एन.एस. त्रिशूल व आय.एन.एस. तबार निर्माण केल्या आहेत.
हवाई दल : भारतीय हवाई दल प्रमुखांचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. हवाई दलाचे एकूण सात विभाग आहेत. ते पुढीलप्रमाणे – पश्चिम एअर कमांड- दिल्ली, दक्षिण पश्चिम एअर कमांड – गांधीनगर, मध्य एअर कमांड-अलाहाबाद, पूर्व एअर कमांड – शिलाँग, दक्षिण एअर कमांड- थिरुवनंथपूरम, प्रशिक्षण कमांड- बंगलोर, देखभाल कमांड – नागपूर.
१) भूप्रादेशिक आर्मी – युद्धकाळात जिचा वापर करता येऊ शकेल.
२) नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी) – स्थापना ५ जुल, १९४८. ती देशातील सर्वात मोठी संरचित तरुणांची चळवळ असून ती शाळा व कॉलेज स्तरांवर कार्य करते. एन.सी.सी.चे सीनिअर, ज्युनिअर आणि गर्ल्स असे तीन विभाग आहेत तर लष्कर, नौदल आ िहवाई दल असे तीन प्रकार आहेत. घोषवाक्य – एकता आणि शिस्त.
३)अर्ध सन्यदल – विविध राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. केंद्र सरकारमार्फत कार्य करते व गृहमंत्रालयामार्फत त्यांची व्यवस्था बघितली जाते. अर्धसनिक दलामध्ये पुढील दलांचा समावेश होतो – राष्ट्रीय रायफल, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, होम गार्ड, भारतीय तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस इ.
४) तटरक्षक दल – स्थापना १९ ऑगस्ट १९७८ रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली. कामाचे स्वरूप – एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनवर कायम लक्ष ठेवून त्यातील तस्करी आणि इतर घडामोडींवर लक्ष ठेवणे. कृत्रिम बेटे, ऑफ शोअर ऑइल टर्मिनल्स इत्यादीची सुरक्षा, भारतीय मच्छीमारांचे संरक्षण व त्यांना बिकटप्रसंगी मदत, सागरी पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण, कस्टम आणि इतर अधिकाऱ्यांना तस्करीविरुद्ध मदत करणे.
संरक्षण दलांच्या प्रशिक्षण संस्था
इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, स्थापना – १३ मार्च १९२२ .
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), खडकवासला, पुणे.
तीन वर्षांचे प्रशिक्षण दिल्यानंतर ते आपापल्या सेवा अकॅडमी (इंडियन मिलिटरी अकॅडमी, नेव्हल अकॅडमी आणि एअर फोर्स) प्रवेश करतात. या अकॅडमी पुढीलप्रमाणे आहेत – ऑफिसर्स ट्रेिनग अकॅडमी- चेन्नई, कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट- सिंकदराबाद, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअिरग- दापोडी, पुणे नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी)- नवी दिल्ली, स्कूल ऑफ आर्टलिरी- देवळाली, आर्मर्ड कोअर सेंटर अॅण्ड स्कूल- अहमदनगर.
इंडियन नेव्हल अकॅडमी – एझिमला, कुन्नरजवळ, केरळ. अकादमीला प्रशासकीय आणि इतर सुविधा पुरविण्यासाठी आय.एन.एस. झामोरिन नावाचा जहाज तळ कार्य करतो.
एअर फोर्स टेक्निकल कॉलेज – जल्हाली, बेंगलोर.
एअर फोर्स अकादमी – दुंडीगल, हैद्राबाद.
भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम
भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमास ‘इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ असे म्हणतात. त्याची सुरुवात १९८३ साली डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कॅटऊढ अंतर्गत पृथ्वी, आकाश, त्रिशूल, अग्नी व नाग या पाच क्षेपणास्त्रांचा विकास केला जात आहे. त्यांची व इतर क्षेपणास्त्रांची माहिती पुढीलप्रमाणे –
१) पृथ्वी – कमी पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. पृथ्वी क्षेपणास्त्र हे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित विकसित करण्यात आलेले पहिले क्षेपणास्त्र. पल्ला – एक हजार कि.गॅ्र. वजन वाहून नेत असताना कमाल १५० कि.मी., तर ५०० कि.ग्रॅ. वजन वाहून नेत असताना कमाल २५० कि.मी., वजनवाहून क्षमता – ५०० ते १००० कि.गॅ्र.
पृथ्वीचे प्रकार : पृथ्वीचे भूदल, नौदल आणि हवाई दलासाठी तीन प्रकार विकसित केले जात आहेत.
अ) पृथ्वी १ : भूदलासाठी. पल्ला १५० कि.मी. वजनवाहू क्षमता – एक हजार कि.गॅ्र.
ब) पृथ्वी २ – हवाई दलासाठी. पल्ला ३५० कि.मी. वजनवाहू क्षमता – ५०० कि.गॅ्र.
क) पृथ्वी ३ – नौदलासाठी- या क्षेपणास्त्राचे धनुष असे नाव आहे. पल्ला ३५० कि.मी. वजनवाहू क्षमता – ५०० कि.ग्रॅ.
२) आकाश – मध्यम पल्ल्याचे, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. पल्ला – २५ कि.मी. मात्र आता पल्ला २७ कि.मी.पर्यंत वाढविण्यात आला आहे. ते बहुलक्ष्य क्षेपणास्त्र असून एकाच वेळी चार ते पाच शत्रू विमानांवर हल्ला करू शकते. आकाश क्षेपणास्त्रावर राजेंद्र नावाचे रडार बसविण्यात आले आहे.
३) त्रिशूल – कमी पल्ल्याचे, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र. पल्ला – ५०० मीटर ते ९ कि.मी., सरकाराने डिसेंबर २००६ पासून त्रिशूल क्षेपणास्त्र कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधित मार्गदर्शन आणि नियंत्रण व्यवस्थेचे अपयश आणि इस्रायलशी बराक क्षेपणास्त्रविरोधी संयुक्त कार्यक्रमाबाबत झालेला करार यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
४) नाग – तिसऱ्या पिढीचे, रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र. पल्ला – चार कि.मी. या क्षेपणास्त्रातील रडारला लक्ष्य दिसताच क्षणी क्षेपणास्त्र त्यावर हल्ला करते.
५) अग्नी – जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. अग्नी क्षेपणास्त्राच्या पाच श्रृंखला आहेत. अग्नी १ – हे अग्नी क्षेपणास्त्राचे कमी पल्ल्याचे (७०० कि.मी.) संस्करण आहे. त्यास सेवेत सामील करून घेण्यात आले आहे. अग्नी २ – या संस्करणाचा पल्ला एक हजार कि.गॅ्र.पर्यंत परंपरागत किंवा अण्वस्त्रांसहित दोन हजार कि.मी.पर्यंत आहे. अग्नी २ ला सेनेत सामील करून घेण्यात आले आहे. अग्नी ३ – या संस्करणाचा पल्ला ३००० कि.मी.पर्यंत असेल. हे भारताचे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ठरणार आहे. अग्नी ४ – या संस्करणाचा पल्ला ३००० कि.मी. पेक्षाही अधिक असेल. हे भारताचे खरेखुरे अंतर्देशीय पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ठरणार आहे. अग्नी ४ चे प्रकल्प संचालक श्रीमती टेसी थॉमस होत्या. त्यांना मिसाइल वुमन म्हणून ओळखले जात आहे. अग्नी ५ – हे क्षेपणास्त्र आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणून विकसित केले आहे. त्याचा पल्ला पाच हजार कि.मी. आहे. १९ एप्रिल, २०१२ रोजी ओरिसातील व्हीलर बेटातून याची चाचणी घेण्यात आली. २०१४ ते २०१५ पर्यंत हे सन्यात दाखल होईल.
६) अस्त्र – हवेतून हवेत मारा करणारे दृष्टिपल्ल्यापलीकडील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. पल्ला – शत्रूच्या विमानावर समोरासमोरील स्थितीमध्ये ८० कि.मी. अंतरावरून, तर पाठलाग करताना २० कि.मी. अंतरावरून हल्ला करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. १५ कि.गॅ्र.पर्यंतचे पारंपरिक शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले हे डीआरडीओद्वारा विकसित सर्वात छोटे क्षेपणास्त्र आहे.
७) सूर्या – हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. पल्ला – सूर्या १ – पाच हजार ते आठ हजार कि.मी. सूर्याच्या विकासात्मक चाचण्या अजून सुरू झाल्या नाहीत.
८) सागरिका – हे भारताचे पाण्याखालून मारा करणारे, अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र के-१५ या कार्यक्रमाने विकसित करण्यात आलेले आहे. २६ फेब्रुवारी, २००८ रोजी भारताने त्याची पहिली यशस्वी चाचणी विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावरून केली. ते एक पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पल्ला – ७०० कि.मी.
९) शौर्य – शौर्य हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध – बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा वापर भूदलामार्फत केला जाईल. पल्ला – ७५० कि.मी. वजनवाहू क्षमता – शौर्य क्षेपणास्त्र एक टन वजनाची पारंपरिक व आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. त्याची पहिली चाचणी चांदीपूर येथील अंतरिम टेस्ट रेंज येथून १२ नोव्हेंबर २००८ रोजी करण्यात आली. या क्षेपणास्त्राचे दुसरे परीक्षण २४ सप्टेंबर, २०११ रोजी चांदीपूर येथून करण्यात आले.
१०) निर्भय – निर्भय हे भारताचे सबसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला एक हजार कि.मी. असेल.
११) धनुष – धनुष हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राचे नौदलासाठीचे बॅलिस्टिक संस्करण आहे.
१२) इंटरसेप्टर मिसाइल – प्रगत हवाई संरक्षणासाठी उपयुक्त. शत्रूच्या आक्रमक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रास त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच आकाशातच नष्ट करण्याची क्षमता असलेला स्वदेशी अॅडव्हान्स एअर डिफेन्स इंटरसेप्टर क्षेपणास्त्राच्या विकासाचे कार्य चालू आहे.
१३) प्रहार – डी.आर.डी.ओ.मार्फत विकसित करण्यात आलेल्या प्रहार या नव्या क्षेपणास्त्राचे पहिले परीक्षण २१ जुल, २०११ रोजी ओडीसाच्या बालासोरजवळील चांदीपूर किनाऱ्यावरील एकीकृत टेस्ट रेंज येथून करण्यात आले.
१४) अर्जुन – अर्जुन हा मुख्य लढाऊ रणगाडा आहे. ५० टन वजनापेक्षा जास्त वजनाच्या रणगाडय़ाला मुख्य लढाऊ रणगाडा असे म्हणतात. हे रणगाडे आवडी (तामिळनाडू) येथील कारखान्यात तयार केले जातात. वेग – ताशी ७० कि.मी., खडकाळ प्रदेशात ताशी ४० कि.मी. अर्जुन रणगाडय़ावर कांचन नावाचे स्वदेशी कवच आहे. ते रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा मारा सहन करू शकते.
१५) पिनाक – हे एक बहू-नलिका रॉकेट प्रक्षेपक आहे. याच्या साहाय्याने एकाचवेळी १२ रॉकेटस्चे प्रक्षेपण करण्यात येते. पल्ला ३९ कि.मी. त्यांचा आराखडा व निर्मिती पुण्याच्या ए.आर.डी.ई.मार्फत करण्यात आली आहे.
१६) लक्ष्य – हे एक वैमानिकरहित लक्ष्य विमान आहे. हवाई हल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांचा वापर सुमारे १० वेळा केला जाऊ शकतो. त्यांची निर्मिती बंगलोरच्या ए.डी.ई.मार्फत करण्यात आली आहे.
१७) निशांत – हे एक आर.पी.व्ही. (रिमोटली पायलटेड वेहिकल) आहे. युद्धभूमीवरील पाहणीसाठी प्रामुख्याने त्याचा वापर केला जातो.
१८) सारथ – हे एक पायदळ लढाऊ विमान आहे. ते भारतीय बनावटीचे असून त्रिशूल, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
१९) तेजस – तेजस हे भारत विकसित करीत असलेल्या हलके लढाऊ विमानाचे नाव आहे. तेजस हे सर्वात लहान, खूप हलके, एक व्यक्ती बसू शकेल असे, एक इंजिन सुपरसोनिक, बहुआयामी, चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे. एल.सी.ए.साठी भारतीय बनावटीच्या कावेरी इंजिनाची निर्मिती केली जात आहे. एल.सी.ए.ची पूर्ण निर्मिती झाल्यानंतर ते जुन्या झालेल्या रशियन मी २१ विमानांच्या ऐवजी वापरण्यात येतील.
२०) सुखोई – ३० एम.के.आय – २००१ मध्ये रशिया आणि भारत यांच्यात झालेल्या कराराच्या आधारे भारताने रशियन बनावटीची ५० सुखोई ३० लढाऊ विमाने विकत घेतली.
२१) ब्रह्मोस : ब्रह्मोस हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. पुढील १० वर्षांत अशी एक हजार क्षेपणास्त्रे निर्माण केली जाणार आहेत. ब्रह्मोस म्हणजे ब्रह्मपुत्रा + मॉस्कोव्हा. ब्रह्मोस या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग २.८ मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा २.८ पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी ३,४०० कि.मी. इतका असेल. त्याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल. ते मुख्यत: जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारतीय लष्कर आणि नौसेनेमध्ये सामील करून घेण्यात आले आहे. मात्र, वायुसेनेसाठी त्याच्या हवेतून मारा करणाऱ्या संस्काराच्या विकासाची प्रक्रिया चालू आहे.
२२) हॉक्स (ऌं६‘२) – हॉकस् हे ब्रिटनचे अॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स आहेत. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात येईल.
२३) फाल्कन – फाल्कन हे इस्त्रायलने निर्माण केलेले मोबाइल रडार आहे.
२४) बराक क्षेपणास्त्र – बराक हे इस्रायलचे क्षेपणास्त्र आहे. ही निर्मिती इस्रायली एअरक्राफ्ट इंडिया आणि हैद्राबादची डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी यांच्यामार्फत संयुक्तरीत्या केली जाईल.
२५) सी-१३० जे सुपर हक्र्युलस विमान – ५ फेब्रुवारी, २०११ रोजी अत्याधुनिक सी-१३० जे सुपर हक्र्युलस विमान वायुसेनेत सामील करण्यात आले. अमेरिकेच्या लोकहीड मार्टनि कंपनीशी पाच विमानांसाठी केलेल्या करारानुसार हे पहिलेच विमान प्राप्त झाले आहे. वायुसेनेच्या गाझियाबाद येथील िहडन एअरबेस येथे नुकत्याच स्थापन झालेल्या ७७ वील्ड वायपर्स स्कॅड्रन मध्ये हे विमान सामील करण्यात आले आहे. ही विमाने अमेरिकन वायुसेनेचा कणा मानली जातात.
२६) आय.एन.एस. विक्रमादित्य – आय.एन.एस. विक्रमादित्य हे अॅडमिरल गोर्शकोव्ह या रशियन विमानवाहू युद्धनौकेचे भारतीय नाव आहे. २००४ मधील करारानुसार ही नौका भारत विकत घेणार आहे.
२७) शिवालीन – ही स्टेल्थ युद्धनौका नुकतीच भारतीय नौदलात दाखल करण्यात आली.
महत्त्वाच्या घडामोडी
ऑपरेशन थ्री स्टार : भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफझल गुरु यास ९ फेब्रुवारी, २०१३ रोजी फाशी देण्यात आली.
ऑपरेशन एक्स : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात सापडलेला पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ राजी फाशी देण्यात आली.
इंद्र : २०१२ : भारत रशिया यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ऑगस्ट २०१२ मध्ये रशिया-मंगोलियाच्या सीमेजवळ पार पडला.
जिमेक्स-१२ : भारत-जपान नौदलाचा संयुक्त सराव टोकियोच्या किनारपट्टीवर जून २०१२ मध्ये पार पडला.
संपृती-२ : भारत-बांगलादेश संयुक्त लष्करी सराव सिल्हेट (बांगलादेश) येथे पार पडला.
सुदर्शन शक्ती : भारतीय लष्कर, हवाईदल व नौदलाचा संयुक्त सराव राजस्थानच्या वाळवंटात पार पडला. (नोव्हेंबर – डिसेंबर २०११).
स्लायनेक्स-२ : भारत-श्रीलंकेच्या नौदलाचा संयुक्त सन्य सराव (सप्टेंबर २०११).
मलबार – भारत-अमेरिकेच्या नौदलाने अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर संयुक्त सन्य सराव केला. (एप्रिल-मे २०१०).
ऑपरेशन इराकी फ्रीडम : सद्दाम हुसेनची इराकमधील राजवट संपवण्यासाठी सात वर्षांपूर्वी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकमध्ये सुरू
केलेले ‘ऑपरेशन इराकी फ्रीडम’ एक सप्टेंबर, २०१० रोजी समाप्त झाल्याचे
घोषित केल्याची अधिकृतपणे घोषणा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली. याबरोबरच इराकी सन्यांना सल्ला व साहाय्य करण्यासाठी ‘ऑपरेशन न्यू डॉन’
सुरू केले.