‘आंतरवैयक्तिक कौशल्य आणि संभाषण कौशल्य’ या घटकामध्ये उमेदवाराचा स्वभावविशेष आणि व्यक्तिमत्त्वातले बारकावे तपासले जातात. प्रशासकीय सेवेत व्यक्तिमत्त्वातील काही कौशल्यांचा विशेष उपयोग होऊ शकतो, ते उमेदवारामध्ये विकसित झाले आहेत का, हे तपासले जाते.
आजच्या लेखात आपण निर्णयक्षमता चाचणी व समस्या सोडवणूक या घटकापेक्षा वेगळ्या प्रकारे उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पलू तपासणारा ‘आंतरवैयक्तिक कौशल्य आणि संभाषण कौशल्य’ या घटकाबद्दल माहिती करून घेणार आहोत. या घटकामध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या अडथळ्यांवर उमेदवार कशाप्रकारे मात करेल हे बघितले जाते. हे करत असतानाच असे स्वभावविशेष व व्यक्तिमत्त्वातले बारकावे ज्यांचा प्रशासकीय सेवेत विशेष उपयोग होऊ शकतो, ते किती प्रमाणात विकसित झाले आहेत, हे तपासले जाते. जसे की, सहकाऱ्यांशी व कनिष्ठ अधिकाऱ्यांशी मिळून मिसळून वागणे, स्वत:च्या भावना स्पष्टपणे शब्दात व्यक्त करता येणे, स्वत:च्या निर्णयाचे योग्य शब्दात समर्थन करता येणे अशाप्रकारची व्यक्तिमत्त्वातील वैशिष्टय़े तपासली जातात. अशा प्रकारचे गुण असलेल्या व्यक्तिमत्त्वाची आयोग अपेक्षा करत असते याचा अर्थ मितभाषी आणि लोकांत कमी मिळून मिसळून राहणारी व्यक्ती प्रशासकीय सेवेस अपात्र आहे, असा  नाही. परंतु अशा व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीला प्रशासकीय सेवेत स्वत:स जुळवून घेणे थोडे अधिक कष्टप्रद वाटू शकते. कोणतीही व्यक्ती कामाकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि योग्य वेळेस अचूक निर्णय घेण्याची क्षमता या गुणांच्या बळावर प्रशासकीय सेवेत यशस्वीपणे काम करू शकते. याचमुळे या घटकातील प्रश्नांना कोणतेही एक बरोबर उत्तर नसले तरी उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचा कल कोणत्या गुणवैशिष्टय़ांकडे झुकणारा आहे हे तपासले जाते. यातूनच उमेदवार प्रशासकीय सेवेतील जबाबदाऱ्या व आव्हाने पेलण्यास समर्थ आहे किंवा नाही हे पाहिले जाते. म्हणूनच स्वत:ला या सेवेतील कामाच्या व प्रक्रियांच्या योग्यतेचे बनवण्यासाठी विचार करण्याच्या दृष्टिकोनात व  एकंदरीत व्यक्तिमत्त्वात आवश्यक बदल करणे हे उमेदवारांचे ध्येय असले पाहिजे. तसेच हे प्रश्न सोडवत असताना, आयोग या प्रश्नातून माझ्यामधील कोणते गुणवैशिष्टय़ तपासून बघत आहे याचे भान असणे अतिशय गरजेचे आहे. आणि असा दृष्टिकोन अनेकविध गोष्टी व उपक्रमांमधून स्वत:मध्ये बाणवला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, चौफेर अवांतर वाचन, सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये विविध स्तरांवरील रस, देशातील व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींबद्दलची माहिती, स्वतचे अभ्यासपूर्ण बनवलेले मत शब्दांत व्यक्त करण्याचा सराव, या अशा काही गोष्टी आहेत.
स्वत: अभ्यासपूर्णपणे मत बनवणे व ते उत्तमरीत्या सादर करता येणे ही दोन पूर्णत: भिन्न अशी कौशल्ये आहेत. त्यातील सादरीकरणाचा भाग हा जितका उत्तम आंतरवैयक्तिक कौशल्यांवर आधारित आहे तितकाच, किंवा कांकणभर जास्तच संभाषण कौशल्यावर अवलंबून आहे. कोणत्याही संभाषणाचा मुख्य साचा म्हणजे योग्य शब्द व त्यांचा योग्य ठिकाणी वापर. प्रशासकीय अधिकाऱ्यासारख्या व्यक्तीला राजकारणी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांपासून अतिशय सामान्य नागरिकापर्यंत सर्वाशी संवाद साधण्याचे कौशल्य असावे लागते. म्हणूनच उत्तम संवाद कौशल्य म्हणजे छापील, पुस्तकी भाषा बोलता येणे नव्हे. तर ज्या व्यक्तीशी आपण संवाद साधत आहोत त्या व्यक्तीला चटकन समजेल, संवादादरम्यान अवघडलेपण वाटणार नाही तसेच गरजेनुसार समोरच्या व्यक्तीचे प्रतिसाद देण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखणे होय.
अशाप्रकारचे संभाषण कौशल्य विकसित करण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे उत्तम वक्त्यांच्या शब्द निवडीतील प्राधान्याकडे बारकाईने लक्ष देणे व स्वत: संभाषण करीत असताना अतिशय जाणीवपूर्वक शब्द निवडणे. जिथे-जिथे संवाद औपचारिक स्वरूपाचा असतो, तिथे अभिवादनांची आणि अशा प्रकारच्या संवादामध्ये वापरल्या जाणाऱ्या ठरावीक शब्दसमूहांची ओळख हवी. तसेच मुळातच संभाषणामधील अभिवादनांचे महत्त्व समजून घ्यावयास हवे. रोजच्या आयुष्यात वापरली जाऊ शकणारी इंग्रजी-मराठी अभिवादने (नमस्ते, नमस्कार, गुड मॉर्निग) ही अतिशय उत्तमरीत्या संभाषणांची सुरुवात करून देऊ शकतात. विशेषत: जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला फार चांगले ओळखत नसतो तेव्हा अशा अभिवादनांचा आवर्जून उपयोग करावा. जशी ही अभिवादने संभाषणांच्या सुरुवातीस उपयोगी पडतात तशीच संभाषणांच्या शेवटी देखील त्यांचे विशिष्ट स्थान असते. (पुन्हा भेटू या, शुभेच्छा)
एका व्यक्तीशी संवाद साधणे व अनेक व्यक्ती असलेल्या गटाशी संवाद साधणे ही देखील दोन भिन्न कौशल्ये आहेत. यामध्ये विविध प्रसंगांचा समावेश होऊ शकतो. उदा. गटचर्चा, पत्रकार परिषद, प्रतिनिधी मंडळाबरोबर संवाद, एखाद्या उपक्रमाच्या ठिकाणी किंवा नसíगक आपत्ती ओढवली असेल अशा ठिकाणी लोकांबरोबरचा संवाद. भाषण : समारंभामध्ये दिली जाणारी भाषणे. (स्वागतपर, समारोपपर, उद्घाटन प्रसंगासाठी, कृतज्ञतापर)
गटचच्रेमध्ये दुसऱ्या व्यक्तीने मांडलेल्या मुद्दय़ाला धरून आपले म्हणणे मांडत असताना, दुसऱ्याचे मत पटल्याचे दर्शवणारी वाक्ये जसे की, ‘मला हा मुद्दा पूर्ण मान्य आहे. मला फक्त त्यात छोटीशी भर घालायची आहे..’ अशा प्रकारे मांडणी करावी. किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध मत आपण मांडत आहोत, अशावेळेस ते आदरपूर्वक सांगावे. उदा. ‘मला असे वाटते की, या मुद्दय़ाचा दुसऱ्या बाजूनेही विचार होणे आवश्यक आहे. म्हणूनच..’ या सर्वामधून आपण विषयाशी सुसंगत मुद्दय़ांबरोबरच स्वतच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सकारात्मक भूमिका तयार करू शकतो. असे करण्यासाठी भाषा हा महत्त्वाचा घटक आहे. अशाप्रकारच्या संवादामध्ये एक प्रकारची सहजता असणे अपेक्षित आहे. याच कौशल्याचा सराव म्हणून ठरावीक संवाद प्रत्यक्षात कसे घडतील याचा बारकाईने विचार करणे, ते प्रसंग डोळ्यांसमोर उभे करणे, कल्पणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. अशावेळेस माहिती अथवा भावना पोहचवणे याला प्राधान्य दिल्यास भाषेचे दडपण जाणवणार नाही व योग्य शब्दांचा, वाक्यरचनांचा वापर करणे सरावाचे होऊन जाईल.
अशाप्रकारच्या संवादकौशल्याची तयारी म्हणून इंग्रजी टी.व्ही. वाहिन्यांवर होणाऱ्या गटचर्चा पाहाव्यात. औपचारिक भाषेसाठी नाही तर उत्तर-प्रत्युत्तर कसे दिले जाते याच्या निरीक्षणाकरता या माध्यमाचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच वृत्तपत्रे, मासिके यांमधून येणाऱ्या मुलाखती वाचणे देखील फायद्याचे ठरू शकते. यांमध्ये प्रश्न विचारणाऱ्याची शैली, उत्तर देताना वापरली जाणारी भाषा याचा अभ्यास करावा. तसेच उत्तर देणारी व्यक्ती एखाद्या मुद्दय़ावर भर देण्यासाठी कोणत्या शब्दसमूहांचा वापर करते, याचे निरीक्षण करावे. नसíगक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या व्यक्तीबद्दल सहानभूती, स्वतच्या चुकीबद्दल दिलगिरी, दुसऱ्याच्या यशाबद्दल निखळ आनंद, पाल्याच्या भवितव्याची चिंता, प्रतिनिधी मंडळाबरोबर बोलताना मुद्देसूदपणा या सर्व संवादांचे अनेकपदरी पण साध्या, वापरातील इंग्रजी-मराठीमधून सादर करता येणे, हे संवादकौशल्याचे खरे उद्दिष्ट आहे.
संवाद कौशल्ये व आंतरवैयक्तिक कौशल्य या घटकाची बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ परीक्षापद्धतीमधून चाचणी घेणे हेच एक आव्हान आहे. परंतु वरील चच्रेतील मुद्दय़ांचा खोलात जाऊन विचार केल्यास प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला कोणत्या गुणसमूहाची चाचणी अपेक्षित आहे हे निश्चितपणे समजू शकते.
या घटकासाठी प्रत्यक्षपणे प्रश्न विचारले गेल्यास त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असू शकते. जसे की, गटकामातील प्राधान्य ठरवण्याकरिता गटातील प्रत्येकाचे मत विचारात घेणे आवश्यक आहे का? पर्याय – १. पूर्ण अमान्य २. पूर्ण मान्य ३. कामाच्या संदर्भावर अवलंबून ४. सांगू शकत नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय १ किंवा ३ आहे, असे अनेक जणांना वाटू शकते. परंतु या प्रश्नामधून उमेदवार म्हणून खालील गुण व्यक्तीकडे आहेत का नाही, याचा शोध घेतला जात आहे. उदा. दुसऱ्याच्या मताला किंमत देणे, गटातील सर्वाना समान वागणूक देणे.  एखाद्याचे मत विचारात घेणे आणि दुसऱ्याच्या मतानुसार निर्णय घेणे
यातील फरक उमेदवारास माहीत आहे का? या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केल्यावर आपल्या लक्षात येते की, पर्याय २ योग्य आहे.
या घटकासाठीची अत्यंत महत्त्वाची तयारी म्हणजे आपल्या सभोवतालचे खोलात जाऊन निरीक्षण करण्याची क्षमता अंगी बाणवणे. समस्या सोडवण्याकरिता त्या विषयातील ज्ञानाबरोबरच मनुष्य म्हणून संवाद साधण्याचे जे कौशल्य आपल्याकडे आहे त्याचा प्रभावी पद्धतीने वापर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Success Story Of Safin Hasan In Marathi
Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
indian express thinc our cities event
सहज, स्वस्त तंत्रज्ञानाची गरज ; इंडियन एक्सप्रेसच्या ‘थिंक – सिटीज’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
success story Of IPS Shakti Awasthi In Marathi
कोण आहे ‘हा’ आयपीएस अधिकारी? ज्यांना मुलाखतीत विचारला होता ‘3 Idiots’ चित्रपटाशी संबंधित प्रश्न
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
Story img Loader