फारुख नाइकवाडे

संकल्पनात्मक अभ्यासाइतकेच अर्थव्यवस्था विषयात चालू घडामोडींना महत्त्व आहे. किंबहुना संकल्पनांच्या आधारे चालू घडामोडींचा अभ्यास करणे हाच या विषयाच्या अभ्यासाचा बेस आहे. या घटकविषयाचा अभ्यासक्रम आणि प्रश्नांचे विश्लेषण पाहिले असता लक्षात येते की, पायाभूत संकल्पना पक्क्या असणाऱ्या व चालू घडामोडीचे भान असणाऱ्या उमेदवारांसाठी हा विषय  scoring ठरणारा आहे. त्यामुळे राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या ठळक व महत्त्वाच्या अर्थविषयक घडामोडी, दूरगामी परिणाम करणारे आंतरराष्ट्रीय ठराव, करार, प्रकाशित होणारे नियतकालिक अहवाल, वेगवेगळे जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील निर्देशांक अभ्यासणे अर्थव्यवस्था विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक आहे. याबाबतीत भर द्यायचे मुद्दे कोणते, हे पाहू.

expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
tiger reserve project
विश्लेषण : सरकारला व्याघ्रप्रकल्प नको आहेत का?
Devendra Fadnavis Mahayuti
Devendra Fadnavis : महायुतीत मंत्रिपदाचं समीकरण काय? तीन पक्षांमध्ये कोणाला मिळणार संधी? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…

महत्त्वाचे जागतिक अहवाल व निर्देशांक

विविध आंतरराष्ट्रीय अहवालातील भारताचे, शेजारील देशांचे स्थान (व प्राप्त गुण) आणि या अहवालामधील प्रथम व शेवटच्या स्थानावरील देश माहीत असायला हवेत.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्र या तिन्ही पातळय़ांवरील मानव विकास अहवाल (HDI) माहीत असावेत.

UNO, जागतिक बॅंक समूह व त्यांच्या सहयोगी संस्थांकडून प्रकाशित होणारे जागतिक भूक निर्देशांक, िलगभाव असमानता निर्देशांक, इझ ऑफ डूइंग बिझनेस अहवाल, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशाक, जागतिक जोखीम निर्देशांक अशा निर्देशांकाबाबत अद्ययावत माहिती करून घ्यावी. यासाठी संबंधित संस्थांचे संकेतस्थळ किंवा कोणत्याही चालू घडामोडीवरील पुस्तकाचा वापर करता येईल.

आर्थिक करार

भारताचे इतर देशाशी झालेले महत्त्वाचे आर्थिक करार संबंधित देश आणि मुख्य तरतुदी अशा मुद्दय़ाच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यासावेत.

महाराष्ट्रातील काही प्रकल्प, योजना यांसाठी आंतरराष्ट्रीय संस्था / दुसऱ्या देशांशी करार झालेला असल्यास त्याचाही अभ्यास आवश्यक आहे.

आकडेवारी

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, िलगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल िलगगुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर यांची माहिती असायला हवी.  

यामध्ये २००१ व २०११च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्दय़ांबाबत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेले जिल्हे आणि सर्वाधिक व सर्वात कमी वाढीचे जिल्हे अशा टेबलमध्ये नोट्स काढणे फायदेशीर ठरेल.

परदेशी व्यापारातील सर्वात मोठे व कमी भागीदार, परकीय गुंतवणूक (सर्वात जास्त व कमी गुंतवणूक करणारे देश; तसेच कोणत्या राज्यात सर्वात जास्त/कमी गुंतवणूक व यातील महाराष्ट्राचा क्रमांक, कोणत्या क्षेत्रात सर्वात/जास्त कमी गुंतवणूक इ.) याबाबतची मागील वर्षांची तुलना समजून घेतली तर निश्चितच उपयोगी ठरते.

आयात व निर्यातीच्या बाबतीत सर्वात कमी व जास्त या बाबी देश, देशांचा समूह, वस्तू, सेवा, उत्पादने या मुद्दयांबाबत पाहायला हव्यात. जागतिक व्यापारातील वाटा हा मुद्दाही उत्पादन सेवांबाबत महत्त्वाचा आहे.

ही सर्व आकडेवारी भारताचा आर्थिक पाहणी अहवाल व महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल यातूनच पाहायची आहे. वेगवेगळया क्षेत्रांचा GDP मधील वाटा याच स्रोतांमधून अभ्यासायचा आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या प्रस्तावित नव्या योजना त्याच्या उद्देश व विषयाप्रमाणे consider करता येतील. उदा. रोजगारासाठीच्या योजना एकत्रितपणे अभ्यासल्यास त्यांच्यातील साम्य फरकाचे मुद्दे लक्षात येतील. यामुळे बहुविधानी प्रश्नांची तयारी चांगल्या रीतीने होईल. योजनांसाठी पुढील मुद्दे पाहावेत-

सुरू झाल्याचे वर्ष, कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत सुरू, असल्यास कायद्याचे नाव, ध्येय, हेतू, स्वरूप, असल्यास लाभार्थ्यांचे निकष, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, कुठल्या योजनेत विलीन झाली असेल तर त्या योजनेचे नाव, मूल्यमापन, राजकीय आयाम (कोणते शासन)

आयोग व समित्यांचे अहवाल

केंद्र, राज्य शासन, सर्वोच्च न्यायालय, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, निती आयोग यांच्याकडून नेमण्यात आलेले विविध आयोग व समित्यांचे अहवाल व शिफारशी संकल्पनात्मक प्रश्नांचा विषय होऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात ज्यांच्या शिफारशी सादर झाल्या असतील त्या समित्यांबाबतचा व अहवालांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

काही नव्या समित्या किंवा आयोग राज्यस्तर वा राष्ट्रीय स्तरावर स्थापन झाल्या असतील तर त्यांचा विषय व कार्यकक्षा इत्यादी माहिती असायला हवी. राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेल्या मुद्दय़ाबाबत दुसऱ्या राज्याकडून स्थापन करण्यात आलेली समिती/आयोग माहीत असणे फायद्याचे ठरेल. बाकीच्या वेळी राज्य स्तर याचा अर्थ महाराष्ट्रातील समिती/ आयोग एवढय़ापुरताच मर्यादित आहे.

महाराष्ट्राचा विशेष संदर्भ

आयोग जेव्हा महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणतो तेव्हा याबाबतीतल्या महाराष्ट्रविषयक अद्ययावत गोष्टी उमेदवाराला माहीत असणे अपेक्षित आहे. याचयरोबर काही मूलभूत गोष्टींबाबत महाराष्ट्राची माहिती/ अभ्यास गरजेचा आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्टय़े, पंचवार्षिक योजनांमधील महत्त्वाचे मुद्दे व पारंपरिक बाबी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पारंपरिक अभ्यास करताना तुलनात्मक पध्दतीने पाहाव्यात.

महाराष्ट्रातील कृषीविषयक बाबी, ग्रामीण, नागरी, पायाभूत सुविधा इ. बाबीसुद्धा चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यासणे आवश्यक आहे.

स्वच्छ सर्वेक्षणातील महाराष्ट्राचा परफॉर्मन्स माहीत असायला हवा. राष्ट्रीय स्तरावरील उत्पादने, सेवा, परकीय गुंतवणूक, आयात, निर्यात इ. बाबतीतील महाराष्ट्राचा क्रमांक दरवर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालातून माहीत करून घ्यावा. त्याचबरोबर राज्याच्या बरोबर मागील व पुढील तसेच क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरील राज्ये इ. बाबी तुलनात्मक तक्त्यामध्ये नोंदवून पक्क्या कराव्यात.

Story img Loader