महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी कशी करावी, याविषयीचे मार्गदर्शन करणारी साप्ताहिक लेखमालिका..
‘जर लोक तुमच्या ध्येयाकडे पाहून तुमच्यावर हसत नसतील तर तुमचे ध्येय अत्यंत छोटे आहे.’
अझीम प्रेमजी
स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करताना ध्येयाने झपाटलेल्या सर्व मित्रांना हे वाक्य तंतोतंत लागू पडते. राज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर -१ मधील अभ्यासक्रमांत भूगोल या घटकाअंतर्गत भारताचा, महाराष्ट्राचा व जगाचा भूगोल अंतर्भूत केला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना अ‍ॅॅटलास (नकाशा) सोबत असणे आवश्यक आहे. एखादा भाग पाठांतर करण्यापेक्षा तो नकाशात कुठे आहे हे जर शोधले तर अभ्यास लवकर लक्षात राहील व अभ्यास मनोरंजक होईल. भूगोलाचे काही प्रश्न सरळ नकाशावर विचारले जातात, म्हणून नकाशावाचन करण्याची सवय असेल तर असे प्रश्न सोडवणे जास्त सोपे जाते.
उत्तर अमेरिका –
उत्तर अमेरिकेतील प्रमुख पर्वतरांगा
*    रॉकीज पर्वत – ही रांग उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातून आलास्कापासून दक्षिणेकडे पसरलेली आहे. ४८३० किमी लांबीची एवढी रांग आहे. रॉकीज पर्वतातील माउंट मॉकिल्ये (६१९४ मीटर) हे सर्वात उंचीचे शिखर आहे. या पर्वतीय भागात कोलेरॅडोचे पठार आहे. कोलेरॅडो या नदीने जगातील सर्वात मोठी घळई ग्रँड कॅन्यॉन निर्माण केली आहे.
*    अपालीचेन पर्वत श्रेणी – ही पर्वतश्रेणी उत्तर अमेरिकेच्या पूर्वेकडे अटलांटिक महासागराला समांतर अशी जाते. माउंट मिटचेल हे येथील सर्वात मोठे शिखर आहे. या पर्वतश्रेणीत लोखंडाचे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात.
*    मिसीसीपी  मिसुरी – ही नदी जवळजवळ अमेरिकेतील २५ राज्यांतून जाते. या नदीने बर्डफूट डेल्टा तयार केला आहे.
*    सेंट लॉरेन्स नदी :- जगप्रसिद्ध नायगरा धबधबा या नदीवर आहे. उत्तर अमेरिकेतील अंतर्गत जलवाहतुकीसाठी ही महत्त्वाची नदी आहे.
*    कोलंबिया नदी ही अमेरिकेतील सर्वात लांब नदी असून, ही नदी पॅसिफिक समुद्रापर्यंत जाते.
*    ग्रॅड कोली हे महत्त्वपूर्ण धरण या नदीवर आहे.
*    रीओ ग्रँडी नदी ही नदी अमेरिका व मेक्सिको यांची सीमा तयार करते.
*    हवामान – हिवाळ्यात उत्तरेस जानेवारी महिन्यात – २८ अंश इतके तापमाण असते तर नर्ऋत्येकडे अ‍ॅरिझोना वाळवंटी प्रदेशात तापमान जास्त व पाऊस अतिशय कमी अशी परिस्थिती असते. संयुक्त संस्थांच्या पूर्व किनाऱ्याकडे वाहणाऱ्या गल्फ उष्ण प्रवाहामुळे येथील तापमान उष्ण असते. तर पश्चिम किनाऱ्यावरील कॅलिफोíनया थंड सागरी प्रवाहामुळे येथील तापमान पूर्व किनाऱ्यापेक्षा कमी असते.
*    वनस्पती – हवामानातील फरकामुळे या खंडातील उत्तरेकडील व दक्षिणेकडील वनस्पतीमध्ये विविधता आढळून येते. या खंडाच्या उत्तर भागात प्रामुख्याने अलास्का या भागात शेवाळ नेचे इ. टुंड्रा प्रदेशीय वनस्पती आढळून येतात. याच्या दक्षिणेला सूचीपर्णी अरण्य आहेत. जेथे पाईन, स्प्रुस, फर, इ. वनस्पती आढळतात. मध्यवती मदान गवताळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. त्यालाच प्रेअरी प्रदेश म्हणतात. तर दक्षिणेकडे वाळवंटी प्रदेशात काटेरी झुडपे आढळतात.

उत्तर अमेरिकेची खनिज संपत्ती
*    खनिज तेल, दगडी कोळसा या उत्पादनाबाबत उत्तर अमेरिका हा जगातील अग्रेसर खंड आहे. जगातील एकूण िझक उत्पादनापकी ३५ % उत्पादन उत्तर अमेरिकेत होते.
*    चांदीच्या उत्पादनासाठी मेक्सिको हा प्रमुख देश आहे.
*    जगातील एकूण उत्पादनापकी ५० % उत्पादन एकटय़ा अमेरिकेत होते.
*    गहू हे या भागातील प्रमुख पीक असल्याने या भागाला गव्हाचे कोठार म्हणतात.
*    न्यूफाउंडलँडजवळ उष्ण पाण्याचा व शीत पाण्याचा
प्रवाह एकत्र आल्याने या ठिकाणी माशांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या ठिकाणातील ग्रँड बँक हा मासेमारीसाठी जगप्रसिद्ध प्रदेश तयार झालेला आहे.
महत्त्वाचे मुद्दे
*    अमेरिकेतील सर्वात लहान राज्य – ऱ्होड आयर्लंड
*    अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य – कॅलिफोíनया
*    अमेरिकेतील सर्वात लांब नदी – मिसीसीपी मिसुरी
*    अमेरिका व मेक्सिको यांच्या दरम्यान सीमारेषा तयार करणारी नदी – रीयो ग्रँड
*    संगणक क्षेत्रातील मायक्रोसॉफ्टचे ऑफिस – सियाटेल
*    भूमध्य सागरी हवामान – कॅलिफोíनया
*    जगातील सर्वात जास्त तेलाची आयात करणारा देश -अमेरिका
*    एकूण वीजनिर्मितीत सर्वात जास्त जलविद्युत निर्मितीचा वाटा असणारा देश – कॅनडा
*    अमेरिकेतील सर्वात उष्ण व सर्वात शुष्क ठिकाण – डेथ व्हॅली (Death Valley)
*    कॅनडामध्ये सर्वात मोठे शहर – टोरँटो
*    कॅनडा हा पेपर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
*    वॉिशग्टन डीसी हे पोटोमॅक या नदीकिनारी आहे.
*    प्रसिद्ध वूव्हर धरण हे कोलोरॅडो या नदीवर आहे.
*    पीटस्बर्ग याला लोखंड व स्टील उद्योगाची जगाची राजधानी म्हणतात.
*    अमेरिकेतील सर्वात खोल ठिकाण – डेथ व्हॅली
*    सॅनफ्रॉन्सिस्को या शहराला सिटी ऑफ गोल्डन गेट असे म्हणतात.
*    कापूस उत्पादनासाटी टेक्सास हा प्रांत प्रसिद्ध आहे.
*    हवाई या द्वीपसमूहाची राजधानी होनूलूलू ही आहे
*    न्यूयॉर्क हे शहर हडसन नदीवर आहे. तसेच शिकागो हे शहर शिकागो नदीवर आहे.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
teacher student sweet joke
हास्यतरंग :  मिठाई…
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल

दक्षिण अमेरिका
या खंडाचा उत्तर भाग हा उष्ण कटिबंधीय आहे. विषुववृत्तापासून जसजसे दक्षिणेला जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते.
*    अ‍ॅमेझॉन नदीचे खोरे – या नदीचा उगम अ‍ॅन्डस् (Andes) पर्वतातून पेरू येथे होतो. ही ६५०० कि.मी. लांब नदी पेरूपासून ब्राझीलमधून अटलांटिक समुद्राला मिळते.
*    नाईल नदीनंतर अ‍ॅमेझॉन ही दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे.
*    अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात दाट विषुववृत्तीय वने आहेत. त्याला स्थानिक भाषेत सेल्व्हास (selvas) असे म्हटले जाते. या नदीच्या खोऱ्यात जी शेती केली जाते तिला ग्युकास(Guicas) असे म्हणतात.
*    ऑरनोको नदीचा उगम गयानाच्या पठारावरून होतो.
जगातील सर्वात उंच एंजल धबधबा या नदीवर आहे.
*    पराणा नदीचे खोरे : ही नदी पेरॉग्वे अणि ब्राझील या देशांची सीमा निश्चित करते. दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे धरण इतापो धरण या नदीवर आहे.
*    या खंडात तीन ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत. त्यांची नावे लेनॉज, कंपास, पंपास वाळवंट.
*    आटाकामाचे वाळवंट : चिलीच्या किनाऱ्याला असलेले हे जगातील सर्वात शुष्क वाळवंट आहे. येथे सोने, नायट्रेट आणि कॉपर हे सापडतात.
*    ग्रॅन चॅको पेरॉग्वेच्या पश्चिमेला अणि अर्जेटिनाच्या उत्तरेला अणि बोलिव्हियाच्या दक्षिणेला हा गवताळ प्रदेश आहे.
ग्रॅनचॅकोचा स्थानिक भाषेत अर्थ शिकाऱ्यांची भूमी.

अ‍ॅन्दस् पर्वतश्रेणी :
ही पर्वतश्रेणी व्हॅनेझुएला, कोलंबिया, इडोर, बोलिव्हिया, पेरू, चिली आणि अर्जेटिना या सात देशांतून जाते.
*    सरोवरे – लेक मॅरे कॉबो : हे दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. ते व्हॅनेझुएलाच्या उत्तरेला आहे. या ठिकाणी तेल सापडते.
*    लेक टिटि काका (Lake Titi caca) बोलेव्हिया आणि पेरू या दरम्यान हे सरोवर आहे.
महत्त्वाचे मुद्दे
*    ओपेक या देशांचा समूहात असणारा दक्षिण अमेरिकेतील देश – व्हॅनेझुएला
*    जगातील मोठे तांबे उत्पादन – चिली
*    दक्षिण अमेरिकेतील भूवेष्टित देश – बोलेव्हिया अणि पॅराग्वे
*    दक्षिण अमेरिकेतील लोकसंख्येत आघाडीवर अनुक्रमे – ब्राझील, कोलंबिया, अर्जेटिना, पेरू.
*    अर्जेंटिनात असणारा गवताळ प्रदेश पंपास नावाने ओळखला जातो.
*    एंजल धबधबा हा व्हॅनेझुएलातील ओरिनॅको (Orinaco) या नदीवर आहे.
*    क्रूड तेलासाठी प्रसिद्ध असलेले मॅराव येबो सरोवर व्हॅनेझुएलात आहे.
*    सोडियम नायट्रेट हे आटाकामा वाळवंटात सापडते.
*    दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखर अ‍ॅकोनकासुआ (Aconcasua) हे आहे.
*    दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे शहर साओपॉलो (Saopaulo) आहे.
*    Chuquicamata याला कॉपर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असे म्हणतात.
*    गॅलाकोबस ही बेटे दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेला स्थित आहे. ती एक्वेडीअरच्या ताब्यात आहेत. ही बेटे प्रामुख्याने पशुपक्षी व कासव यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत.

आफ्रिका खंड
*    जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.
*    प्राकृतिक रचना – या खंडाच्या वायव्येस अ‍ॅटलास पर्वत आहे.
*    अ‍ॅटलास पर्वत व इथियोपियाचे पठार यांच्या दरम्यान सहारा वाळवंट पसरलेले आहे.
*    या खंडाच्या मध्यभागी कांगो नदीचे विशाल खोरे आहे.
*    या खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेली सुमारे ५००० कि.मी.ची खचदरी आहे. ही खचदरी झांबियामलावी, टांझानिया, केनिया व इथिओपियापासून तांबडय़ा समुद्रामाग्रे इस्रायल व जॉर्डन समुद्रापर्यंत पसरलेले आहेत.
* या खचदरीत टांगानिका, मालावी ही सरोवरे निर्माण झालेली आहे.
* खचदरीच्या भागात पूर्वेस किलिमांजारो व केनिया हे ज्वालामुखीचे पर्वत आहेत.
* किलिमांजारो या शिखरांची उंची ५,८९५ मीटर असून याला क्युबो असेदेखील म्हणतात. आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर हेच आहे. हे शिखर विषुववृत्तावर असून ते नेहमी बर्फाच्छादित असते. या पर्वताच्या उतारावर कॉफीचे उत्पादन घेतले जाते.
*    आफ्रिका खंडाला खूप लांब सागरकिनारा लाभला आहे.
तरीही तो दंतुर नाही, त्यामुळे येथे नसíगक बंदरे कमी
आहेत.
* हवामान – या खंडातून कर्कवृत्त, मकरवृत्त ही येत असल्याने याचा बराचसा भाग उष्ण कटिबंधात येतो. या खंडातील सर्वसाधारण हवामान उष्ण आहे. या खंडाचा मोठा विस्तार अणि भौगोलिक रचनेतील विविधता यामुळे तापमान व पर्जन्यमान यात विविधता दिसते. या खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कॅनरी व बेंग्युला या शीतप्रवाहांमुळे सहारा व नामेबिया किनारी भागात हवामान सौम्य राहते.
*    नाईल ही जगातील सर्वात लांब नदी व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावते व उत्तरेकडे वाहते. शेवटी ही नदी भूमध्य सरोवराला मिळते.
*    नाईल नदीस दोन उपनद्या आहेत- नील नाईल, श्वोत नाईल
*    नील नाईल व श्व्ोत नाईल या सुदानमधील खारटुम या ठिकाणी एकमेकांस मिळतात. अस्वान डॅम हा नाईल नदीवर बांधलेला आहे.
*    आफ्रिका खंडाच्या मध्यभागी झैर नदीचे खोरे आहे. ही नदी बारमाही आहे. ही नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाते. या नदीवर इंगा धरण बांधले आहे.
*    दक्षिणेकडे झांबेझी नदी आहे. जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा झांबेझी नदीवर आहे. ही नदी झांबिया व झिम्बॉम्वे या दोन देशांची नेसíगक सीमारेषा तयार करते.
*    झांबेझी नदीवर करीबा हे धरण बांधलेले आहे.
*    झांबेझी नदीच्या दक्षिणेला िलपोपो नदी आहे.
*आफ्रिकेतील वाळवंटे – सहारा वाळवंट, लिबिया वाळवंट, नामेबियाचे वाळवंट, कलहारा वाळवंट

आफ्रिकेतील महत्त्वाचे देश :
१)    मोरोक्को (राजधानी रबात) : मोरोक्कोतील मर्राकेश हे ऐतिहासिक शहर असून यास लाल शहर असेदेखील म्हणतात, कारण घरबांधणीसाठी लाल दगड व तांबडय़ा मातीचा वापर करण्यात आला आहे.
२)    इजिप्त (राजधनी कैरो) : कैरो या शहराजवळील गीझा येथील पिरॉमिड जगप्रसिद्ध आहे. आफ्रिका खंडाच्या ईशान्य भागात दाट लोकसंख्या असलेला हा देश आहे. यालाच मित्र असेदेखील म्हणतात. हा देश उष्णकटिबंधातील हवामानाच्या प्रदेशात येतो. येथे उन्हाळा तीव्र तर हिवाळ सौम्य असतो. उन्हाळ्याच्या काळात नाईल नदीच्या प्रदेशात खमसिन हे उष्ण व कोरडे वारे वाहतात. ते वारे मोठय़ा प्रमाणात धूळ व वाळू वाहून आणतात.
३)    अलेक्झांड्रिया : हे इजिप्तमधील महत्त्वाचे शहर असून ते नसíगक बंदर आहे.
४)    पोर्ट सद : हे एक उत्तम बंदर आहे. तसेच व्यापारी दृष्टीने ते महत्त्वाचे मानले जाते. सुएझ कालवा मार्गाने या बंदरातून वाहतूक चालते.

दक्षिण आफ्रिका :
हा देश आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागास असून सोने, हिरे या खनिजांसाठी तसेच प्राणी संपत्तीसाठी हा प्रसिद्ध आहे.
*    हा देश समशीतोष्ण कटिबंधात आल्याने येथील हवामान सौम्य व आल्हाददायक आहे.
*    बेंग्युला हा शीतप्रवाह यांच्या पश्चिम किनाऱ्यावरून जातो.
*    पर्वतीय प्रदेशात रूंदपर्णीय पानझडी वने असून येथील व्हेल्ड पठार गवताळ कुरणांसाठी प्रसिद्ध आहे.
*    या गवताळ प्रदेशामुळे येथे गेंडे, हत्ती, सिंह यांसारख्या प्राण्यांची संख्या विपुल आहे.
*    येथील किंबल्रे हे शहर हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात हिऱ्यांच्या खाणीसाठी खोदलेली विहीर ही भूतलावरील माणसाने खोदलेली सर्वात खोल विहीर समजली जाते.
*    दक्षिण आफ्रिकेत निग्रो वंशाच्या लोकांमध्ये हौसा, झुलू, स्वाझी, सोथो, आदी प्रमुख जाती अहेत.
*    किनाऱ्याजवळील लोकसंख्या दाट असून पठारी भागात व वाळवंटी भागात लोकसंख्या कमी आहे.
*    या देशातील प्रिटोरिया, जोहोन्सबर्ग, केपटाऊन, दरबान ही प्रमुख शहरे आहेत.
महत्त्वाचे मुद्दे –
१) कलहारी वाळवंट हे ऑरेंज नदी व झांबेझी नदी यांच्या दरम्यान आहे.
२)    कलहारी वाळवंटातून भूमध्यसागराकडे वाहणाऱ्या उष्ण स्थानिक वाऱ्यांना सिरॅको असे म्हणतात.
३)    आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीिमजीरो आहे.
४)    सुएझ कालवा हा १७२ किमी. असून भूमध्यसागराला गल्फ ऑफ सुएझ व तांबडा समुद्र या माग्रे जोडतो.
५)    कांगो नदीच्या खोऱ्यात पिग्मी ही जनजाती राहते.
६)    झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांची नसíगक सीमा झांबेझी ही नदी बनवते.
७)    झांबेझी या नदीवर प्रसिद्ध कोबोरा बासा (Cobora Bassa) हे धरण आहे.
८)    व्हिक्टोरिया सरोवर हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर असून ते युगांडा, केनिया आणि टांझानिया या दरम्यान पसरलेले आहे. श्व्ोत नाईल नदी येथून उगम पावते. हे सरोवर खचदरीत येत नाही. या सरोवरातून विषुववृत्त जाते.
९) व्हिक्टोरिया सरोवर हे जगातील क्रमांक तीनचे सरोवर आहे. १) कॅस्पियन समुद्र
    २) लेकसुपेरीयर (उत्तर अमेरिका)
    ३) व्हिक्टोरिया सरोवर
१०) जिब्राल्टरची सामुद्रधुनी ही भूमध्य सागर ते अटलांटिक
समुद्र यांना जोडते, तर युरोप व आफ्रिका यांना वेगळी
करते.
११) तांबडा समुद्र हा आफ्रिका व आशिया खंडास वेगळा करतो.
१२) तांबडा समुद्राला लागून असलेले आफ्रिकेचे देश
    इजिप्त, सुदान, इरीट्रीया (Eritrea) जीबौती (Djibouti)
१३)    सोमालिया (Somalia), जीबौती (Djibouti), इर्रिटीया (Eritrea) आणि इथोपिया (Ethopia) यांना आफ्रिकेचे िशग म्हणतात.
१४)    सहारा वाळवंटातील खडकाळ दगडी वाळवंटी भागास हमादा असे म्हणतात. तर लिबियामधल्या दगडी खडकाळ वाळवंटास सेरीर म्हणतात.
१५)    आफ्रिका खंडातील लोकसंख्येच्या दृष्टीने जास्त लोकसंख्या असलेल्या देशांचा उतरता क्रम –
    १) नायजेरिया
    २) इजिप्त
    ३) इथोपिया
    ४) झेर
१६) सोने हिऱ्यांची भूमी म्हणून दक्षिण आफ्रिकेला ओळखले जाते.
१७)     सिरॅका वाऱ्यांना लिबियात गिब्ली या नावाने ओळखले जाते.
१८)    टांगानिका हे सरोवर टांझानिया, झैर आणि झांबिया देशांदरम्यान आहे.